20.3 C
New York
Sunday, September 15, 2024

Buy now

spot_img

म्हेत्रे नगर गट नं ७०८ मधील अतिक्रमण कारवाई स्थगित बाबत रिपाईचे तहसिलदार यांना निवेदन

म्हेत्रे नगर गट नं ७०८ मधील अतिक्रमण कारवाई स्थगित बाबत रिपाईचे तहसिलदार यांना निवेदन

अक्कलकोट ( प्रतिनीधी )
रिपाइं आठवले गटाच्या वतीने म्हेत्रे नगर गट नं ७०८ मधील अतिक्रमण कारवाई स्थगित करण्यासाठी अक्कलकोटचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
अक्कलकोट ग्रामीण येथिल गट नंबर ७०८ मधिल म्हेत्रे नगर येथे अनेक वर्षांपासून नागरिक राहतात त्या ठिकाणी नगरपरिषदेच्या वतीने अनेक सोयी सुविधा देखील पुरवण्यात आल्या आहेत उदाहरणार्थ गटारी, लाईट, सार्वजनिक शौचालय अशा सार्वजनिक सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. अक्कलकोट नगरपरिषदेला ते घराचा टॅक्स देखील भरत आहे, नळाचा टॅक्स देखील भरत आहे असे सर्व टॅक्स भरत असताना व त्यांची घरं नियमात असताना त्यांना शासनाकडून अतिक्रमणाच्या नावाखाली घर पाडण्याची नोटीस वजा सुचना देने हे न्यायाला धरून नसून या गोष्टीचा तीव्र निषेध रिपाइं च्या वतीने करण्यात आला व सध्याला दसरा व दिवाळी सण असल्याने शासनाने अतिक्रमण मोहीम राबवून लोकांच्या सणाच्या आनंदात विरजण घालण्याचे काम करू नये. अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने आमरण उपोषणाचा इशारा रिपाइं तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांंबे यांनी दिला. यावेळी रिपाइं अक्कलकोट शहर अध्यक्ष अजय मुकणार, प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष अमर शिरसाट, रिपाइं शहर कार्याध्यक्ष सचिन बनसोडे, रिपाइं शहर उपाध्यक्ष सुरेश गायकवाड , दस्तगीर मुजावर,हमिद शेख, नुरदिन शेख,अयाज चंदनवाले, नागू कुंभार,नजिर बागवान,राजू पवार,शिवम्मा कुंभार, फरजाना गंवडी,खाजाभाई बागवान,अजिम बागवान यांच्यासह म्हेत्रे नगरमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -spot_img

Related Articles

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img