श्री स्वामी समर्थांच्या सेवा कार्यातून अक्कलकोटचा विकास हे माझे ध्येय : नरेश श्रीमंत मालोजीराजे भोसले
अक्कलकोट ( प्रतिनीधी )
श्री स्वामी समर्थांच्या सेवा कार्यातून अक्कलकोटचा विकास हे माझे ध्येय आहे असे प्रतिपादन अक्कलकोट संस्थान नरेश श्रीमंत मालोजीराजे भोसले यांनी श्री स्वामी समर्थ दिव्य दर्शन प्रकल्प सादरीकरणप्रसंगी व्यक्त केले.
राजघराण्याच्या राम तलाव या निसर्गरम्य परिसरात ३५ एकरात हा प्रकल्प साकारला जाणार असून या ठिकाणी १०८ फूट उंचीची श्री स्वामी समर्थांची मूर्ती स्थापना केली जाणार आहे.
नवीन राजवाडा प्रांगणात शानदार समारंभात राजेशाही थाटात हा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून श्रीमंत छत्रपती वृषाली राजे शिवाजी राजे भोसले (सातारा) या होत्या.
कार्यक्रमाचा शुभारंभ श्री स्वामी समर्थांचे प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आला यावेळी सिने अभिनेते अशोक कुलकर्णी यांनी श्री स्वामी समर्थांची भूमिका साकारली आणि मनोगत व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर श्रीमंत मालोजीराजे भोसले, श्रीमंत छत्रपती वृषाली शिवाजी राजे भोसले,श्रीमंत गोपाळ राजे पटवर्धन (मिरज), श्रीमंत नंदिता राजे घाटगे (कागल), श्रीमंत पद्मजाराजे पटवर्धन (मिरज) हे होते.
श्रीमंत मालोजीराजे भोसले म्हणाले विख्यात शिल्पकार भगवान रामपुरे यांना श्री स्वामी समर्थांचा दृष्टांत झाला आणि तो दृष्टांत स्वामी नगरी अक्कलकोट मध्ये भव्य प्रमाणात साकारला जाणार आहे यासाठी सर्व स्वामी भक्तांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.
याप्रसंगी अक्कलकोट संस्थानचे मानकरी बाबासाहेब निंबाळकर, श्रीमंत गोपाळराजे पटवर्धन, भगवान रामपुरे महेश नामपुरकर यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी अनुभूती या पुस्तकाचे प्रकाशन आणि अक्कलकोट राजघराण्याचा इतिहास या संकेतस्थळाचे उद्घाटन देखील करण्यात आले.
या कार्यक्रमाला ॲड सयाजीराजे भोसले,ॲड जयाजीराजे भोसले, जयहिंद शुगर चेअरमन गणेश माने- देशमुख, जयप्रभादेवी राजे भोसले, सत्यशिल ढमाले मधुवंती ढमाले, सभापती संभाजी इंदलकर (सातारा) उद्योगपती श्रीधर कंगराळकर, आशिष कदम मानकरी मुकुंद घाटगे,व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मल्लिनाथ साखरे मल्लम्मा पसारे, सोनल जाजू , उन्नती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील.इतिहासकार डॉ.सतिश कदम, आकाशवाणी निवेदक मारूती बावडे,जयसिंह पाटील, जितेंद्र जाजू ,लक्ष्मण रामपूरे, डॉ विपुल शहा स्वामीराज रामदे, रोहन जिरोळे, सिद्धार्थ बिंदगे , रोहित जिरोळे, अनिल जाविया. आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनश्री दामले (मुंबई) यांनी केले.