युवक काँग्रेस अक्कलकोट तालुका अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांचे राजीनामा
अक्कलकोट ( प्रतिनिधी ) अक्कलकोट तालुक्याचे युवक काँग्रेस तालुका अध्यक्षपदी असताना युवकांना सोबत तालुक्यातील युवा फळी एकत्र संघटित करून तालुक्यात मरगळलेल्या अवस्थेत असलेले काँग्रेस पक्षला ऊर्जा निर्माण करण्यासाठी रात्र दिवस लोकाचे काम करत सतत जनतेत वावरणारे, युवक काँग्रेस चा एक लिंगायत चेहरा,युवक नेतृत्व म्हणून बाबासाहेब पाटील यांचे तालुक्यात सगळीकडे परिचित आहेत तालुक्यातील युवक व काँग्रेसचे प्रेमी तरुणाने भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून बाबासाहेब पाटील कडे बघत असतानाच अचानक तालुकाध्यक्ष पदाचा राजनामा दिल्यामुळे सध्या तालुक्यात उलट सुलट चर्चा चालू आहे
अक्कलकोट तालुक्यामध्ये युवकांची एक फळी निर्माण करून काँग्रेसला पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील, आंदोलन, युवकांचे प्रश्न हिरहिरेने मांडणारे युवा नेतृत्व असलेले सलगर जिल्हा परिषद इच्छुक उमेदवार म्हणूनही ज्यांचे नाव चर्चेत आहे अशा युवा नेता बाबासाहेब पाटील यांनी काँग्रेस युवक पदाचा तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यामुळे अक्कलकोट तालुक्यात चर्चे चा विषय झाला आहे.
बाबासाहेब पाटील यांनी राजीनामा देत असताना वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे कबूल करून यापुढेही काँग्रेस हाच माझा पक्ष आणि मा.सिद्धाराम म्हेत्रे हेच आमचे नेते असल्याचे सांगितले आहे परंतु तालुक्यात सर्वच राजकीय पक्षांमध्ये बाबासाहेब पाटील यांच्या राजीनामाचा चर्चाला जोर धरत आहे