20.3 C
New York
Wednesday, September 18, 2024

Buy now

spot_img

संघर्षयोद्धा :-आपला माणूस पाणीदार आमदार मा. सचिन दादा कल्याणशेट्टी

संघर्षयोद्धा :-आपला माणूस पाणीदार आमदार मा. सचिन दादा कल्याणशेट्टी

आपला लोकप्रतिनिधी कार्यतत्पर आमदार, संघर्ष योद्धा,पाणीदार आमदार (सचिन दादा) कल्याणशेट्टी ज्यांनी आपल्या साडेचार वर्षांच्या कारकिर्दीत मतदार संघातील तीस वर्षापासून न सुटलेल्या पाणी, वीज, बिकट रस्ते व तीर्थक्षेत्र विकास असे प्रश्न योध्याप्रमाणे लढून बरेचसे प्रश्न मार्गी लावली तर काही कामे अंतिम टप्प्यात आहेत.आता सुद्धा नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये संघर्ष योद्धा आ. सचिन दादा कल्याणशेट्टी आणखी विविध प्रलंबित सोडण्याकरिता व्यस्त असताना… तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे एकरुख उपसा सिंचन योजनेसाठी उजनीचे पाणी अक्कलकोट,दक्षिण सोलापूर तालुक्यास त्वरित मिळण्यासाठी सर्वात महत्त्वपूर्ण अशी तांत्रिक अडचण म्हणजे सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवून व दोन टप्प्यात 50 कोटी व 30 कोटी निधी मंजूर करून घेतली आणि योजना कार्यान्वित होण्याचा व दोन्ही तालुक्याला पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. गेल्या चार किंवा साडे चार वर्षात सातत्याने पाठपुरावा करीत 1996 ला युती शासनाच्या काळात मंजूर झालेली योजना योगायोगाने नाहीतर युती सरकारच्या भाजपा च्या लोकप्रतिनिधीनी विषय गांभीर्याने हाताळल्यामुळे दोन्ही तालुक्याला पाणी मिळण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे… विधानसभेत 1996 ला या प्रश्नासाठी उठलेला आवाज त्यानंतर आता सुद्धा युती सरकारच्याच काळात आमदार सचिनदादा ने गांभीर्याने उठवलेल्या आवाजामुळे व केलेल्या सातत्याने प्रयत्नाने आज हे फळ सध्या मिळत आहे.
असे असताना आपला संघर्षयोद्धा सचिन दादा कल्याणशेट्टी नागपूर हिवाळी अधिवेशनात मतदारसंघातील आणखीन विविध प्रश्नासाठी झगडत असताना इथे काही मंडळी आमदार दादांनी केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचे केविलवाणे प्रयत्न करीत आहेत. योद्धा लढतोय आणि काही मंडळी येथे श्रेय लाटण्यासाठी पेपरबाजी व बॅनर बाजी, फोटो सेशन, त्यांनी दिलेले स्टंट निवेदन त्याने पेपरला आलेल्या बातम्यामचे जाहिरात करण्यात गुंग आहेत हे दोन्ही तालुक्याच्या संस्कृतीला कदापी शोभणारे नाही.जनता व इथला मतदार राजा इतका विसरभोळा नाही कि 26 -27 वर्षे ज्या प्रश्नावर राजकारणाच झाले तो प्रश्न कोणी सोडवला हे सुद्धा जनतेला ज्ञात आहे. त्यामुळे आपला संघर्ष योद्धा अधिवेशनामध्ये व्यस्त असताना चालू असलेला हा प्रकार सुज्ञ जनता कदापि खपवून घेणार नाही त्यांना त्यांची जागा त्यांना 2024 च्या विधानसभा निवडणुकीत नक्कीच दाखवून देतील आणि संघर्ष योद्धा आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी हेच फिक्स आमदार असतील यात तिळमात्र शंका नाही.

✍️बलवान गोतसुर्वे तालुकाध्यक्ष भाजपा अनु जाती दक्षिण सोलापूर

- Advertisement -spot_img

Related Articles

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img