-2.5 C
New York
Sunday, February 25, 2024

Buy now

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने डॉ रवींद्र बनसोडे यांचा सत्कार

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने डॉ रवींद्र बनसोडे यांचा सत्कार

अक्कलकोट प्रतिनिधी :-

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयाचे नूतन अधीक्षकपदी डॉ रवींद्र बनसोडे यांचा नियुक्ती झाल्याबद्दल संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष कमलाकर सोनकांबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.सत्कार प्रसंगी बोलताना डॉक्टर बनसोडे म्हणाले की अक्कलकोट ग्रामीण भागातील व शहरातील नागरिकांना सुसज्ज्ञ आरोग्यवा देणे अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयातील अत्यंत महत्त्वाची समजले जाणारी ट्रॉमा केअरचे सुरुवात करून त्याला प्राधान्य देण्यात येईल गोरगरीब जनतेला मोफत सुविधा मिळाव्यात त्यासाठी माझे प्रयत्न असेल असे डॉक्टर बनसोडे म्हणाले.याप्रसंगी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सचिव विश्वनाथ चव्हाण, कार्याध्यक्ष गौतम बाळशंकर, उपाध्यक्ष महेश गायकवाड, सदस्य निगपा निंबाळ, धोंडूराज बनसोडे, गणेश भालेराव , यांच्यासह महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी, ग्रामीण रुग्णालयातील, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार उपाध्यक्ष महेश गायकवाड यांनी केले

- Advertisement -spot_img

Related Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest Articles