बाबासाहेबांना एकाच चौकटीत बांधू नका : सागर सोनकांबळे
पुणे ( प्रतिनीधी )
“बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य फक्त दलितांपुरते नाही तर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य बहूआयामी आहे बाबासाहेब आंबेडकरांनी शेतीविषयक धोरणात्मक कार्य केले पुस्तके लिहिली, स्त्री उद्धाराचे कार्य केले, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, शेती विषयक क्षेत्रामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा मोलाचा वाटा आहे आणि बाबासाहेबांचे कार्य तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम आपल्यासारख्या विद्यार्थ्यांवर आहे,” असे प्रतिपादन युवा प्रबोधनकार सागर सोनकांबळे केले.
चतु: शृंगी येथील नालंदा बुद्ध विहार येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्र उभारणीतील कार्य या विषयावर ते बोलत होते.
या कार्यक्रमाचे आयोजन नालंदा बुद्ध विहार समिती यांच्या वतीने करण्यात आलेले होते. सकाळी ध्यानधारणा व वंदना घेऊन व्याख्यान सुरू करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रा. राजाभाऊ भैमुले राहुल रुही , राहुल ससाणे, अक्षय कांबळे, दगडू सोनकांबळे, शकील शेख, मयूर जावळे, औंध रोड येथील युवाशक्ती संघटनेचे सर्व पदाधिकारी, विहार समितीचे मिलिंद मोरे, पंजाबराव वानखेडे, हृतिक भालेराव
अनिकेत अहिरे, रोहित भालेराव,
अनिकेत जगताप तसेच बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राची गायकवाड यांनी केले. रोहन देसाई यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिली.