राष्ट्रीय सेवा योजनेमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो…
अक्कलकोट – राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयं सेवकांना श्रम संस्काराचे धडे मिळतात, त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो. असे मत रा से योजनेचे विद्यापीठ संचालक डॉ राजेंद्र वडजे यांनी व्यक्त केले. मातोश्री गुरुबंसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयाने मैंदर्गी येथे आयोजित केलेल्या विशेष श्रम संस्कार शिबिरात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रतिष्ठीत नागरिक श्री अनिल पाटील होते. व्यासपीठावर रा से यो विभागीय समन्वयक डॉ जवाहर मोरे, प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे, दयानंद बमनळ्ळी हे उपस्थित होते. जवाहर मोरे म्हणाले की , ग्राम- शहर विकासात रा से यो स्वयंसेवकांचा सहभाग वाढत आहे. त्यामुळे नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत आहे. हीच रा से यो विभागाच्या कार्याची पोच पावती आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा राजशेखर पवार यांनी केले, सूत्रसंचालन स्वयंसेवक समर्थ पवार यांनी केले तर आभार स्वयंसेविका कु तेजश्री विभुते व पायल कांबळे यांनी मानले.