24.3 C
New York
Wednesday, July 24, 2024

Buy now

spot_img

स्वामी समर्थांच्या पावन नगरी अक्कलकोटच्या विकासाची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निधीचा पाऊस

स्वामी समर्थांच्या पावन नगरी अक्कलकोटच्या विकासाची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निधीचा पाऊस

देवेंद्र एक विकास महापुरुष

स्वामी समर्थांच्या पावन नगरी अक्कलकोटच्या विकासाची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सचिन दादा कल्याणशेट्टीवर विकासाचा आशीर्वाद
कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर दुर्लक्षित असलेले तालुका म्हणजे अक्कलकोट तालुका अनेक दशकांपासून अक्कलकोट तालुका विकासापासून वंचित असलेले तालुक्याला विकासाचा नवीन पर्व मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांच्या काळात सुरू झाले आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी हे भाजपा तालुकाध्यक्ष झाल्यापासून अक्कलकोटच्या विकास कामासाठी भरपूर निधी खेचून आणले त्याच्या कामाचे सपाटा बघून अक्कलकोट विधान सभेच्या निवडणुकीत सन 2019 मध्ये मतदारांनी मोठ्या मतधिक्याने निवडून दिले, हन्नूर सारख्या एका ग्रामीण भागातील सरपंचाला थेट आमदारपदी तालुक्यातील जनतेने निवडून दिल्या बद्दल पुन्हा जोमाने तालुक्याच्या विकास कामाला सुरुवात केले सुरुवातीचे दोन वर्ष हे कोरोनाच्या काळात गेले त्यावेळी तालुक्यातील लोकांचे जीव वाचले पाहिजे यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकोट येथे ऑक्सीजनसह हॉस्पिटल चालू करण्यात आले होते त्यामुळे गोर गरीब लोकांना उपचार घेण्यास मोठी सोय झाली, लोकांचे आरोग्याची काळजी घेत तालुक्यातील रस्त्याचे कामास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून मंजुरी आणले त्यामुळे अनेक वर्षापासून रस्त्याचे काम मार्गी लागले
अक्कलकोटची नगरी श्री स्वामी समर्थांची गेल्या चार दशकामध्ये विकासापासून वंचित असणारा विधानसभा मतदारसंघ अशी राज्याच्या पटलावरच चर्चा याच तालुक्यामध्ये विधानसभा मतदारसंघांमध्ये. राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपद भूषवले तरीही विकास काही झाला नाही. तालुक्यामध्ये विधानसभा मतदारसंघांमध्ये असंख्य प्रश्न असताना. नव्या उमेदीचा नवा नेतृत्व 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तालुक्यातील जनतेने 37 हजार मताने आमदार सचिन दादा कल्याणशेट्टींना निवडून दिल, तालुक्याच्या मरगळलेल्या विकास कामांना नवा मार्ग मिळाला. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनातून. आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी नी विधानसभा मतदारसंघातील विकासाचा आराखडा उभा केला. श्री स्वामी समर्थ तीर्थक्षेत्र विकास व शहराचा विकास शासनाकडून निधी मंजूर करून घेतले आहे . शहरातील जनतेच्या सुरळीत रस्ता व्हावे यासाठी शहरातील मेन रस्त्याचे सिमेंट काँक्रिट करण्यात आले आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून. शहरातील नागरिकांना नवी दिशा प्राप्त झाली. शहरातील जनतेच्या असंख्य प्रश्न सुटले. समर्थाच्या नगरीमध्ये बस स्थानकाची होणारी दुरावस्था पाहून. चार दशकापासून प्रलंबित असणारा प्रश्न. नवीन बस स्थानकाची निर्मिती करण्याचे ठरवले. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या समोर ठेवून त्याला मंजुरी मिळून आणले. या कामास सुरुवात करण्याआधी अनेक अडचणी आले यासाठी काही लोकांनी जातीय रंग देण्याचे प्रयत्न केले परंतु विकास कामासाठी एक पाऊल ही मागे न हटता न्यायालयीन लढा लढून आज मोठ्या दिमाखात बसस्थानक भूमिपूजन होत आहे हे तालुक्यातील जनतेला आनंदाचे बाब आहे, नव्याने होणाऱ्या बस स्थानकाचे हे शहरासाठी नवसंजीवनीच आहे. अक्कलकोट शहरातील धार्मिक तीर्थक्षेत्र असताना. ग्रामदैवत म्हणून ओळख असणारे श्री मल्लिकार्जुन मंदिराची पुनर्बांधणीचा निर्णय घेतला त्या कामासाठी ही कोट्यवधी निधी मंजुर करून आणण्यात आले आहे त्याचीही पायाभरणी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे. विकास कामाबरोबर धर्म ही महत्त्वाचा आहे धर्माची विकास ही महत्त्वाची आहे. असा असताना वंचित मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी सामाजिक न्याय विभागाचे माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विकास निधी अक्कलकोट तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये बुद्ध विहाराची निर्मिती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भावनांची निर्मिती. डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, अभ्यासिका केंद्र या बरोबर सिमेंट काँक्रिट रस्ता, पेव्हर ब्लॉक, गटार यासाठी करोडो रुपयांची निधी मंजूर करून आणण्यात आली आहे . अक्कलकोट स्टेशन, दुधनी स्टेशन, येथे सव्वाशे कोटीची उड्डाणपुलाची निर्मितीसाठी निधी मंजूर केले आहे . दुधनीसाठी अत्यंत महत्त्वाचा हा विषय असताना उड्डाणपुलाची निर्मिती हा विकासाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे असं समजला जाईल.कारण सदर रस्ता अक्कलकोट गाणगापूर या तीर्थक्षेत्र जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे, अक्कलकोट विधानसभा क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे. एकरुख जलसिंचन उजनी धरणाचे पाणी कुरनुर धरणाला आणण्यासाठी अधिवेशामध्ये आवाज उठवून ते काम फायनल केले आहे व गेल्या अधिवेशनात लक्षवेधी विषय मांडून पुरवणी कामास मंजुरी करून घेतले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली. कोट्यावधी रुपयाची निधी उपलब्ध करून. तालुक्याचा अत्यंत कळीचा विषय मार्गी लावण्यात आला. केवळ निधी उपलब्ध केलं नाही. तर आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांनी हा विषय विधानसभेमध्ये मांडला. म्हणून कुरनूर धरणाला उजनी धरणाचे पाणी येऊ शकले. या विकासाच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विकास महापुरुष म्हणूनच तालुक्यामध्ये त्यांची गणना होऊ लागली. आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांच्या माध्यमातून अक्कलकोट तालुक्यातील व विधानसभेतील रस्त्याचे प्रश्न पूर्णपणे चित्र पालटले आहे. कोट्यावधीची निधी उपलब्ध करून. विधानसभा क्षेत्रातील संपूर्ण शहर व ग्रामीण उत्कृष्ट रस्त्याची सोय झालेली आहे. याचे पूर्ण श्रेय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस अक्कलकोटचे आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांना जाते. श्री स्वामी समर्थांच्या या नगरीचा विकास कामांमध्ये लागलेली प्रगती ती उत्तर उत्तर वाढत जाऊ. असंच म्हणावे लागेल. हे होणारच कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एक विकास महापुरुष आहेत. त्याला जोड आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी आहेत. यापुढे ही दादा अक्कलकोटच्या विकास कामासाठी प्रयत्नशील असणारच आहेत परंतु अक्कलकोट तालुक्याच्या औद्योगिक विकासाच्या प्रगतीसाठी अक्कलकोट येथे औद्योगिक विकास महामंडळ ( एमआयडीसी ) हे आणल्यास अक्कलकोट तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांना स्थानिक ठिकाणी रोजगार उपलब्ध होऊ शकतो यासोबत मेडिकल कॉलेज,इंजिनिअरिंग कॉलेज हे देखील चालू करण्यासाठी भविष्यात दादा प्रयत्न करावे अशी तालुक्यातील जनतेची भावना आहे
दादा आपल्या पुढील विकास कामासाठी व वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.

लेखक
गौतम बाळशंकर ( उपसंपादक दैनिक यश सिध्दी न्युज )
ग्रामपंचायत सदस्य हन्नूर

- Advertisement -spot_img

Related Articles

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img