नामांतर लढा,चळवळीतील एक रक्तरंजित ऐतिहासिक दिन रिपाईच्या वतीने चैतन्यपूर्ण उत्साहात साजरा
चळवळीसाठी आत्मबलिदानाची तयारी ठेवावी – राजाभाऊ सरवदे
सोलापूर ( प्रतिनीधी )
नामांतर लढा,चळवळीतील एक रक्तरंजित ऐतिहासिक दिन रिपाई आठवले पक्षाच्या वतीने लोकनेते राजाभाऊ सरवदे साहेबांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये मोठ्या चैतन्यपूर्ण उत्साहात साजरा
“जय भीम के नारे पे अब खून बहता है तो बहने दो “,
“रक्त मोजून घ्या मोजायला तयार आहोत.”
“मुडदे मोजून घ्या द्यायला तयार आहोत“ याही पलीकडे जाऊन “क्रांतिगर्भाचा सौदा करायला तयार आहोत पण, नामांतर घेणार आहोत.
“अशा घोषणा देत नामांतरासाठी क्रांतिची मशाल घेऊन निघालेल्या क्रांतिवीराना क्रांतिकारी अभिवादना चा कार्यक्रम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) सोलापूर शहराच्या वतीने मा. राजाभाऊ सरवदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मिलिंद नगर बुधवार पेठ येथे नामांतर लढ्याची प्रतिकृती असणाऱ्या कमानी जवळ घेण्यात आला.
प्रारंभी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन अभिवादन करण्यात आले.
तसेच नामंतर लढयात शहीद झालेल्या भीम सैनिकांना अभिवादन करण्यात आले.
प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सोलापूर शहराच्या वतीने राजाभाऊ सरवदे यांचा सत्कार करण्यात आला.
14 जानेवारी याच दिवसाची वाट पहाण्यासाठी तब्बल 18 वर्षे संघर्ष करावा लागला,त्यासाठी खूप मोठी किंमत मोजावी लागली,सरकारच्या निर्णयाला जातीय रंग देण्यात आला,हजारो घरा-दाराची राख रांगोळी झाली, मरण तांडव बघितलं,या दंगलीचा 1200 गावांना फटका बसला,25 हजार दलितांना याची सल सोसावी लागली,25 जणांना आपला जीव गमवावा लागला, कित्येक जणांची नग्न धिंड काढण्यात आली,गावंच्या गावं बहिष्कृत करण्यात आली,गावबंदी-जमावबंदी पाणवठे बंद करण्यात आले,हाल हाल करुन सोडलं जातीयवाद्यानी,दलितांच्या झोपड्या पेटवण्यात आल्या आणि हे सारं तब्बल दीड वर्ष चालत राहीलं.
हा लढा म्हणजे लोकशाही हक्क व सामाजिक समतेचा,अस्मिता आणि अस्तित्वाचा होता,बाबासाहेबांनी मराठवाडय़ात शिक्षणाचे बीज पेरले त्याचा परिपाक होता,बाबासाहेबांनी 1949 मध्ये निजामाकडून जमीन विकत घेऊन मिलिंद महाविद्यालयाचा पाया खोदला,बाबांनी याच्या बोर्डावर सर्व जाती धर्मातील लोक घेतले,स्वतःच्या घरातील एकाही माणसाला सदस्य होऊ दिलं नाही,ही होती किमया,या माध्यमातून सर्व बहुजनांना विद्येचं दार उघडून दिले आणि हीच सल सनातन्याच्या पोटात खुपत होती.
27 जुलै 1978 ला सरकारने नामांतराचा ठराव विधिमंडळात संमत केला,अशी घोषणा केली आणि सनातन्याचं पोटसुळ उठलं त्याना आयती संधी चालून आली,बाबासाहेबांच्या पुण्याईने नेटाने उभा टाकलेल्या समाजाला झळ पोचवण्याची,मग त्यानी जाळपोळ चालू केली,अगोदरच रडारवर असलेल्या कार्यकर्त्यांला गाठून मारलं, 4 ऑगस्टला परभणी जिल्ह्य़ातल्या टेंभुर्णी गावातल्या मातंग समाजातील पोचीरामला जाळून मारलं,पहीला शहीद गेला!
सुगावच्या जनार्दन मवाडेला 150 जनानी ठेवून मारला,पोचीराम कांबळे मुलगा चंद्र कांबळे याचाही खून करण्यात आला,बाबासाहेबांच्या नावांसाठी तरूण पेटून उठला,त्यात दलित पँथर आक्रमक आणि आग्रेसर झालं,रामदास आठवले,गंगाधर गाडे,नामदेव ढसाळ, अरूण कांबळे यांनी जबाबदारी उचलली.या लढ्यात शेकाप,दलित युवा आघाडी,युवा रिपब्लिकन, समाजवादी क्रांति दल,जनता युवक आघाडी अशा अनेक आघाड्यांवर उडी घेतली. विशेष म्हणजे हिंदू विद्यार्थ्यांचाही पाठींबा होता.
या आंदोलनात पुरोगामी विचारसरणीचाही खुप मोठा सहभाग होता.सप्टेंबर 1982 ला माई आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रह झाला.पहिल्याच दिवशी 16 हजार नामांतरवाद्याना अटक झाली.25 एप्रिल 1982 रोजी पुरोगामी विचारांचा मराठा तरूण पुण्याच्या शिवाजीनगर रेल्वेस्थानकावर रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली.या तरूणाने मरण्यापूर्वी बाबा आढावाना पत्र लिहिलं ते त्यांच्या खिशात सापडलं “नामांतराच्या अंमलबजावणीच्या योग्य मागणीचा पाठपुरावा करावा या इच्छेपोटी मला जो मार्ग वाटला तो मी निवडलाय.”
मा.आमदार शिंदेचे उपोषण लाँग मार्च नंतरचा एक महत्वाचा टप्पा ठरला.
25 नोव्हेंबर 1993 नांदेडच्या गौतम वाघमारे नी स्वतःला पेटवून घेतले. 25-26 जणाचा जीव घेऊन,हजारो घरांची राखरांगोळी करूनच नामांतर शांत झालं.नामांतराच्या धगधगत्या आगीत उड्या घेणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याच्या रक्तानी लिहिलेलं चळवळीचं सोनेरी पान म्हणजेच “डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ होय” हा उजडायला 14 जानेवारी 1994 तब्बल 17 वर्षे कडवा संघर्ष करावा लागला आणि नामविस्तार झाला.
नामांतरासारख्या लढ्याची ओळख नव्याने करून देण्याची गरज आहे,
असे सांगत इतिहासाची आठवण लोकनेते राजाभाऊ सरवदे साहेब यांनी करून दिली.
याच बरोबर शाहिर साजन बेंद्रे व विशाल चव्हाण यांचा बहारदार भीम गितांचा कार्यक्रम आदरांजलीप्रती घेण्यात आला.
राजाभाऊ सरवदे यांचा नामांतर लढ्यातील पँथर म्हणून अनेक कार्यकर्त्यांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास के.डी.कांबळे,सुबोध वाघमोडे,जितेंद्र बनसोडे,सोमनाथ भोसले,शामसुंदर गायकवाड,अतुल नागटिळक,पवन थोरात,सुशील सरवदे,चंद्रकांत वाघमारे,शाम धुरी,भागवत सरवदे,अनिल धिमधिमे,राजा दावणे,तात्या काळे,खंडू सातपुते,अविनाश मडीखांबे,
संतोष पवार,सुग्रीव जेटीथोर,शिवम सोनकांबळे,
सिद्धार्थ बनसोडे,दावला सुर्वे,सुमित शिवशरण, बसवराज सोनकांबळे, शिवराज पुल्लूर,सोमनाथ भडकुंबे,ऍड जयप्रकाश भंडारे,नितीन गायकवाड,जीवन हिप्पर्गीकर,श्रीनिवास सरवदे,बापू सदाफुले,समीर नदाफ,उपगुप्त चौधरी,शिवा गायकवाड,सचिन शिंदे,सचिन कांबळे,राजेश शिंदे,महादेव बाबरे,आप्पा राऊत,दत्ता कांबळे,राहुल वाळके,देवा बुधवंतराव,शितल कांबळे,बापू कापूरे,माया बनसोडे तसेच पदाधिकारी कार्यकर्ते हजारोच्या संख्यने उपस्थित होते.