18.6 C
New York
Wednesday, November 6, 2024

Buy now

spot_img

अक्कलकोटमध्ये 5 फेब्रुवारी रोजी निघणार आंबेडकरी जनतेचा आक्रोश महामोर्चा

अक्कलकोटमध्ये 5 फेब्रुवारी रोजी निघणार आंबेडकरी जनतेचा आक्रोश महामोर्चा

पुणे मध्ये अक्कलकोट तालुक्यातील भीम सैनिकांनीही जोरदार तयारी लागले

अक्कलकोट l ( यश सिध्दी न्युज नेटवर्क )
अक्कलकोट मध्ये सोमवार 5 फेब्रुवारी रोजी आंबेडकरी जनतेचा विविध प्रकारच्या मागण्यांसाठी महामोर्चा निघणार आहे, या मोर्चाचे मोठे नियोजन आणि तयारी करण्यात आली असुन विविध मागण्यांसाठी हा महा मोर्चा अक्कलकोट येथील भीम नगर येथुन निघणार आहे. या महामोर्चा साठी
” चलो अक्कलकोट” ची घोषणा देण्यात आली आहे. सोमवार दि. 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता अक्कलकोट भिमनगर ते राजे फत्तेसिंह चौक, जूना तहसील कार्यालय, ए-वन चौक, मार्गे बस स्टॉप, या प्रमुख मार्गावरून हा भव्य आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मोर्चातील प्रमुख विषय म्हणजे अक्कलकोट शहर व ग्रामीण भागातील दलित बांधवांवर मोठ्या प्रमाणात होत असलेला अन्याय अत्याचार, जातीयवाद, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानावर संपूर्ण भारत देश चालतो त्यांच्याच पुतळ्याची गुलबर्गा येथे विटंबना करण्यात आली होती .
घोळसगांव येथे एका व्यक्तीने मकर संक्रांतीच्या दिवशी त्याच्या धार्मिक विधीमध्ये आपल्या जातीवरून कन्नड मध्ये एकदम तुच्छ मानून खालच्या पातळीवर जाऊन शिव्या देतो, तसेच
बणजगोळ येथील जिल्हा परिषद शाळेत लहान मुलांना निळ्या रंगाचा गणवेश घालू दिला जात नाही, त्याचप्रमाणे हालहळळी येथे गावच्या यात्रेत महार जातीचे लोक यायचे नाही, म्हणून आपल्या समाजातील माजी सरपंचाच्या भावाला बेदम मारहाण करण्यात आली.व त्यांच्यावरच तु आमच्या समाजातील बाईला छेडछाड केली म्हणून खोटी केस करण्यात आली. हंजगी येथील जातीयवादी माजी सरपंच यांनी केवळ मागासवर्गीय व दिव्यांग सदस्य निवडून आल्यानंतर एका उच्च जातीच्या महिलेने आरती का केली म्हणून त्या महिलेला व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांना त्रास दिला जातो. तसेच अक्कलकोट तालुक्यातील मागासवर्गीय जनतेवर मोठया प्रमाणात अन्याय वाढला आहे
या सर्व होत असलेल्या अत्याचारा विरुद्ध व अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्या करीता भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. हा अन्याय आज त्यांच्या वर झाला उद्या आपल्या वर हि होऊ शकतो या साठी समाजातील सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची आवाहन आयोजकांनी केले आहे तरी सर्वांनी आपापसातील व्ययक्तीक व राजकीय मतभेद विसरून सर्वांनी एकत्र येऊन परिवारासह ह्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होऊन जातीयवादी लोकांना आपली ताकद दाखवून द्यावे असे आवाहन तमाम भीम सैनिकांनी केले आहे
सोमवार दि. ५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता भिम नगर, अक्कलकोट येथुन प्रारंभ होणार आहे. तालुक्यातील सर्व गावांना गाव भेटी देऊन चर्चा ,मीटिंग घेऊन मागासवर्गीय समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचार बाबत जनजागृती तालुक्यातील सर्व पक्षीय नेते मंडळी करत आहेत

अक्कलकोट तालुक्यातील पुण्यामध्ये राहण्यास असलेल्या भीम सैनिकांनी पुणे मध्ये बैठक घेऊन अलीकडच्या काळात मागासवर्गीय समाजावर होत असलेल्या विविध गावातील अत्याचार संदर्भात विचार विनिमय चर्चा करण्यात आले यावेळी अक्कलकोट येथे पाच फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या आक्रोश महामोर्चा साठी जास्ती जास्त भीम सैनिकांनी सहभाग घेण्याचे आव्हान करण्यात आले

- Advertisement -spot_img

Related Articles

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img