1.3 C
New York
Monday, January 13, 2025

Buy now

spot_img
spot_img

गोगांव येथे श्री कल्लेश्वर महाराजांच्या यात्रेस 27 एप्रिल पासून सुरुवात

गोगांव येथे श्री कल्लेश्वर महाराजांच्या यात्रेस 27 एप्रिल पासून सुरुवात
अक्कलकोट / प्रतिनिधी : गोगांव, ता अक्कलकोट येथील ग्रामदैवत श्री कल्लेश्वर महाराज यांच्या यात्रेस दिनांक २७ एप्रिल पासून सुरुवात होत आहे, दर वर्षी मोठ्या उत्साहात तीन दिवस यात्रा चालते, प्रभू श्री राम यांच्या हस्ते लिंगाची स्थापना झाली असुन भारत देशामध्ये एकूण 108 जागृत शिवलिंगाची स्थापना श्री प्रभू रामचंद्र यांच्या हस्ते झाली आहे त्यातील 107 वे श्री कल्लेश्वर शिवलिंग आहे. श्री प्रभू रामचंद्र आणि लंकापती रावण यांच्यामध्ये घनघोर युद्ध संग्राम झाला, त्यात प्रभू श्रीरामानी रावणाचा वध केला, रावण वधानंतर लंकेवरून आयोध्याकडे परत जात असताना महान ऋषी श्री कुंभोदर आणि इतर ऋषीमुनींनी श्री प्रभू रामचंद्र यांना 108 श्री शिवलिंगाची प्रतिष्ठापना तुम्ही केली पाहिजे असा उपदेश केला, प्रभू श्रीराम यांच्या हस्ते गोगाव गावामध्ये 107 वे शिवलिंग स्थापन करून गोगावसाठी प्रभू श्रीरामांनी गाय भेट दिली. असा शिवलिंगाचा प्रतिष्ठापनेचा थोडक्यात ( इतिहास ) आख्याकिका आहे. कल्लेश्वर देवस्थान भक्ताचे खूप मोठे श्रद्धास्थान आहे. वागदरी परिसरासह कर्नाटक, महाराष्ट्र, मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात. यात्रेतील महत्वाचे कार्यक्रम म्हणजे ५ मजली रथ उत्सव, या रथाला चार चाके असून त्यावर पाच कप्पे आहेत त्यावर अंडाकार गोल हंडी असून यावर डिजाइन केलेले तडक्या लावून सजवलेले असतात. पुणे मुंबई येथे कामासाठी गेलेले भाविक व ग्रामस्थ आवार्जुन न चुकता गावच्या यात्रेला येत असतात.
यात्रेत कुठल्याही प्रकारचे अनुसूचित घटना घडू नये म्हणून सरपंच सौ वनिता सुरवसे यांनी पोलीस बंदोबस्त ची मागणी केली आहे तसेच आरोग्याची पूर्व काळजी म्हणून यात्रेच्या काळात वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका तसेच आपत्तीकालन व्यवस्था म्हणून 108 ॲम्बुलन्स व्यवस्था करण्यात आली असुन महावितरण कंपनीला सुद्धा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी पत्राद्वारे विनंती केल्याची माहिती सरपंच सौ वनिता सुरवसे यांनी सांगितले आहे.
दिनाक २७ एप्रिल रोजी संध्याकाळी सात वाजता उच्चई ( लहान रथ) कार्यक्रम व पालखी नंदिकोल (काटी) भव्य मिरवणुक गुरुवारी दिनांक २८ रोजी दुपारी बारा वाजता पालखी नंदिध्वज व रथावर कळसारोहन कार्यक्रम, सांय ७, ४५ वाजता रथोउत्सव (मोठा रथ) व फटाक्याची रोषणाई चा कार्यक्रम, रात्री कन्नड नाटकाचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे दिनांक २९ रोजी दुपारी तीन वाजता जंगी कुस्ती व रात्री दहा वाजता कन्नड नाटकाचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे, दिनांक २८व २९ रोजी महाप्रसाद वाटप होणार असून आलेले सर्व भक्तानी महाप्रसादाचा आस्वाद घ्यावा असे आव्हान सरपंच सौ. वनिता मधूकर सुरवसे, उपसरपंच कमलाकर सोनकांबळे, श्री कल्लेश्वर देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष श्री अशोक मुलगे, खजिनदार प्रदीप जगताप यांनी केले आहे. कल्लेश्वर देवस्थानाचे शिखरचे काम यावर्षी चालू करण्यात येणार असून भाविक भक्ताने सरळ हाताने आर्थिक मदत,देणगी देण्याबाबत आव्हान श्री कल्लेश्वर देवस्थान ट्रस्टचे संचालक श्री मधुकर सुरवसे व श्री लक्ष्मण बिराजदार, आणि ट्रस्टच्या सर्व विश्वस्थांनी केले आहे.

- Advertisement -spot_img
spot_img

Related Articles

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img