21.2 C
New York
Friday, May 24, 2024

Buy now

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ हे राज्यातील अन्नदान सेवेतील उत्कृष्ट धार्मिक केंद्र : वसंतराव मुंडे

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ हे राज्यातील अन्नदान सेवेतील उत्कृष्ट धार्मिक केंद्र : वसंतराव मुंडे

अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यास हे राज्यातील अन्नदान सेवेतील उत्कृष्ट धार्मिक केंद्र असल्याचे मनोगत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष वसंतराव मुंडे यांनी व्यक्त केले.

ते श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सहकुटुंब आले असता मंडळाचे विश्वस्त भाऊ कापसे यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. त्यांच्या समवेत अक्कलकोट तालुकाध्यक्ष कमलाकर सोनकांबळे, सचिव विश्वनाथ चव्हाण, नंदकुमार जगदाळे, बसवराज बिराजदार, स्वामीराव गायकवाड, राजेश जगताप, दयानंद दणुरे, रमेश भंडारी, निंगप्पा निंबाळ समाधान अहिरे आदि पत्रकार बांधव उपस्थित होते.

यावेळी न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, एस.के.स्वामी, बाळासाहेब घाडगे, बाळासाहेब पोळ, शहाजीबापू यादव, कल्याण देशमुख, सतीश महिंद्रकर, नामा भोसले, शावरेप्पा माणकोजी, शिवकुमार स्वामी, निखील पाटील, प्रविण घाडगे, विजय माने, चंद्रकांत हिबारे, काशिनाथ वाले, विश्वनाथ कलशेट्टी, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, देवराज हंजगे, यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

- Advertisement -spot_img

Related Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest Articles