18.9 C
New York
Wednesday, September 18, 2024

Buy now

spot_img

उद्या सोलापुरात निघणार डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती विसर्जनाच्या अतिविशाल आणि भव्य दिव्य मिरवणुका

उद्या सोलापुरात निघणार डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती विसर्जनाच्या अतिविशाल आणि भव्य दिव्य मिरवणुका

सोलापूर l महेश गायकवाड

सोलापूर मध्ये आज डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाची सांगता होत असून या निमीत्ताने आज शहरातील जवळपास दीडशे जयंती उत्सव मंडळाच्या विशाल आणि भव्य दिव्य मिरवणुका निघणार आहेतः
सोलापूर ची डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती म्हटले की, डॉल्बी नाचगाणी आणि प्रचंड असा मोठा धिंगाणा आणि उत्साह असतो सोलापूर ची जयंती मिरवणुक ही साऱ्या जगात रेकॉर्ड ब्रेक जयंती मिरवणुक असते दर वर्षीप्रमाणे यंदाही ही मिरवणूक भव्य दिव्य आणि प्रचंड जल्लोषात निघणार आहे या जयंती महोत्सवाच्या मिरवणुकीची तयारी जयंती मंडळांनी एका महिना अगोदर पासूनच सूरू केली आहेत
दर वर्षीप्रमाणे निघणाऱ्या या विशाल आणि रेकॉर्ड ब्रेक मिरवणुकी मध्ये सर्वात आगोदर सोलापूर महानगरपालिकेचे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमा असलेले वाहन असते यानंतर सोलापूर मधील नामांकित मंडळांचे विविध प्रकारचे देखावे सजावट केलेले वाहने या मिरवणुकीत सहभागी करण्यात येतात
सोलापूर मध्ये सुप्रसिद्ध असलेले आर जी कंपनी यांचे बुध्द दर्शन तरूण मंडळ, जी एम सामजिक संस्थेचे जी एम ग्रुप तरुण मंडळ, जेष्ठ रिपब्लीकन नेते प्रमोद दादा गायकवाड यांचे सिध्दार्थ तरूण मंडळ युवकांचे आयकॉन आणि प्रेरणास्थान असलेले नगरसेवक अजित भाऊ गायकवाड यांचे बॉबी ग्रुप, जेष्ठ नेते राजाभाऊ सरवदे यांचे प्रशिक सामजिक संस्था मंडळ, डी के बॉस यांचे डी के सामजिक संस्था मंडळ, आनंद चंदनशिवे यांचे पी बी ग्रुप तरुण मंडळ, यांच्या सह बुध्द राष्ट्र सामजिक संस्थेचे मंडळ तसेच आनंद बौध्द तरूण मंडळ राहूल युवक क्रीडा मंडळ यांसह सोलापूर मधील जवळपास दीडशे मंडळाच्या वतीने भव्य दिवय देखावे सादर करून मोठया ट्रेलर वर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सजावट केलेल्या प्रतिमा आणि पुतळे ठेवून या मिरवणुका काढल्या जातात, या सर्व मिरवणुका  रविवार दिनांक 21 एप्रिल रोजी दुपारी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन मार्गस्थ केल्या जाणाऱ्या आहेतः तत्पूर्वी या मिरवणुकांचे उद्घाटन डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात मान्यवरांच्या हस्ते आणि उपस्थितीत केले जाणार आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सांगता समारोप मिरवणुक पाहण्यासाठी संपुर्ण महारष्ट्र राज्यासह शेजारच्या कर्नाटक, आंध्र प्रदेश मध्य प्रदेश तसेच तमिळणाडू, तेलंगणा , गुजरात मधील आंबेडकर प्रेमी मोठ्या संख्येने वाहनांचे ताफे घेऊन सोलापुरात येत असतात
 रविवार दिनांक 21 एप्रिल रोजी निघणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सांगता मिरवणुकीसाठी सोलापूर महानगरपालिका तसेच पोलिस आयुक्त कार्यालय विज मंडळाने आपापली तयारी पुर्ण केली असून पोलीस आयुक्त यांनी प्रचड मोठा तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे तर सोलापूर मधील विविध सामजिक संस्था आणि मंडळांनी मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या नागरिकांसाठी थंड पिण्याच्ये पाणी अन्न दान अल्पोपहार असे उपक्रम राबविले आहेत. या सर्व मिरवणूका अतिशय प्रेक्षणीय असल्यामुळे या मिरवणुकांची नोंद वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली आहे. हत्ती घोडे उंट यांच्या सह लेझीम टिपरी झांज पथक ढोल ताशे हलगी बंजो यासह कर्न कर्कश डॉल्बी च्या निनादात वाजत गाजत निघत असतात.

 

सोलापूर मध्ये निघणारी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची सांगता मिरवणुक ही साऱ्या जगात भारी असुन या जयंती मिरवणुकीचे जगात रेकॉर्ड झाले आहे , दर वर्षीप्रमाणे यंदाही डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुक मोठ्या उत्साहात तितक्याच दिमाखात आणि शानदार पणे व भव्यआणि दिव्य प्रमाणत निघणार आहेत जयंती निवणुकित सर्वांनी शांततेने सहभागी होऊन आपापल्या जयंती मंडळाच्या मिरवणुका दिमाखात काढाव्यात
अजितभाऊ गायकवाड
संस्थापक अध्यक्ष
बॉबी ग्रुप सोलापूर

- Advertisement -spot_img

Related Articles

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img