महाराष्ट्र मराठी पत्रकार संघाच्या वतीने डॉ.रविंद्र बनसोडे यांचा सत्कार
अक्कलकोट,प्रतिनिधी
रुग्णसेवा,जणसेवा,समर्पण,निष्ठा,मेहनत व संघर्ष या पंचसूत्रीच्या माध्यमातून,अल्पावधीतच आपला वेगळा ठसा उमटविणारे डॉ.रविंद्र बनसोडे यांनी गरिब रुग्णांची केलेली सेवा कौतुकास्पद व आदर्शवत आहे. डॉक्टरांनी सामाजिक बांधीलकीचे भान ठेवून सामाजिक बांधीलकी जपली आहे.असे प्रतिपादन संघाचे अध्यक्ष कमलाकर सोनकांबळे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व अमोल पुटगे मित्र परिवाराच्या वतीने डॉ.बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त ललित नर्सिंग होम येथे आयोजित सत्कारप्रसंगी कमलाकर सोनकांबळे बोलत होते.यावेळी संघाचे सचिव विश्वनाथ चव्हाण,ज्येष्ठ पत्रकार राजेश जगताप, छात्र भारती प्रदेश संघटक सचिन बनसोडे , पत्रकार गौतम बाळशंकर,ज्येष्ठ पत्रकार समाधान अहिरे,ज्येष्ठ पत्रकार चेतन जाधव,जेष्ठ पत्रकार महेश गायकवाड उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ.रविंद्र बनसोडे म्हणाले की, धकाधकीच्या व स्पर्धेच्या या काळात पत्रकारिताही प्रचंड धावपळीची झाली आहे़.या धावपळीत पत्रकारांचे स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते असते.योग्य वेळेवर योग्य त्या तपासण्या केल्या नाहीत.तर त्याचे परिणाम अनेकांना आयुष्यभर भोगावे लागतात़ हीच बाब लक्षात घेऊन ललित नर्सिंग हॉस्पिटल यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातील पत्रकारांच्या मोफत आरोग्य तपासणी करण्याची विडा उचललेला आहे.यापुढील काळात पत्रकारांच्या आरोग्याची काळजी ललित हॉस्पिटल’ची असेल असे म्हणाले. यावेळी सलगर ग्रामपंचायत सदस्य अमोल पुटगे, परशुराम बगळे, हन्नुर माजी सरपंच कोंडीबा सोनकांबळे, परशुराम पुटगे, किरनळीचे असलम मुल्ला आदी उपस्थित होते यावेळी सूत्रसंचालन गौतम बाळा शंकर यांनी केले आभार विश्वनाथ चव्हाण यांनी मानले.