4 C
New York
Monday, January 13, 2025

Buy now

spot_img
spot_img

ओजस क्रियेशन वतीने ट्रुबुट टू मोहम्मद रफी साहब कार्यक्रम

ओजस क्रियेशन वतीने ट्रुबुट टू मोहम्मद रफी साहब कार्यक्रम...

 

ओजस क्रियेशन, मुंबई आयोजित ट्रुबुट टू मोहम्मद रफी साहब हा कार्यक्रम ॲडजॅन स्टुडियो बोरिवली पश्र्चिम येथे शनिवार २३ डिसेंबर रोजी संपन्न झाला. पद्मश्री प्राप्त रफ़ी साहेबांच्या वाढदिवसाचे ओचित्य साधुन व त्यांच्या सेंटिनल वर्षाचा सोहळा निमित्त हा विशेष कार्यक्रम आयोजित केला होता.
आयोजिका ज्योती कुलकर्णी या लेखिका, स्पेशल एजुकेटर व समाजसेविका आहेत. वृत्तपत्रात त्यांचे समाज प्रबोधनाचे व सकारात्मक लेख नियमित येत असतात. गेली ५ वर्ष त्या असे म्यूजिक शो यशस्वीपणे आयोजित करत आहेत.
त्यांचे मिस्टर श्रीकांत कुलकर्णी यांची त्यांना मोलाची साथ आहे. ते व्यवसायाने सिवील इंजिनियर आहेत व त्यांनी शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण घेतले आहे आणि ते प्रोफशनल सिंगर आहेत व नवोदित गायकांना ते मार्गदर्शन करतात.

आमंत्रित विशेष अतिथी फिल्म टीवी स्टार प्रदीप शर्मा जी, उपेन्द्र पंडित जी, संपादक अमरदीप पेपर, निलम तेली, समाजसेविका, साकेत जी व मातोश्री छाया जैन जी सरगम म्यूजिक व छाया एंटरटेनमेंट, विकास गायकवाड, क्लिक न्यूज मीडिया व इंडिया स्टार न्यूजचे उपसंपादक, संजय कश्यप जी, मिलन सूर संगम आयोजक, अभय बेंद्रे, अंकशास्त्रविशेषज्ञ, अमिशा होन्नावर, म्यूजिक ॲंड मेलडी आयोजिका, प्रोफेसर ॲलेक्स जाॅर्ज, लायन्स क्लब डिस्ट्रिक्ट चेयरपर्सन फाॅर डिफरेंटली एबल्ड ह्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम बहारदार झाला. सर्वांनी हिंदी चित्रपट गीतांचा आनंद घेतला व पुढिल वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या.

सुप्रसिद्ध गायक श्रीकांत कुलकर्णी, साकेत जैन,
राजेन्द्र बलवल्ली, विकास गायकवाड, अजीत तेंडुलकर, लक्ष्मीकांत सुभाष, यु के डुंगारिया, रुपा देवरुखकर, चंचल शेट्टी, लीना भगत, निर्मला गजांकुश, शिल्पा गांवकर, प्रिती खानोलकर, जान्हवी खांडेकर, तृप्ती मेहता, शोभा मेनन, ज्योती कुलकर्णी यासर्व गायकांची हिंदी चित्रपट गीते सादर केली. तृप्ती मेहता व ज्योती कुलकर्णी यांनी रफी साहबांचे व्यक्ती विशेष सांगत व सुरेख शेरों-शायरी करत निवेदन केले व त्याने कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला.

Tune into music ब्रिदवाक्य असलेले ओजस क्रियेशनच्या आयोजिका ज्योती कुलकर्णी व इंजीनियर श्रीकांत कुलकर्णी हे विविध संगीत कार्यक्रम आयोजित करतात. १८ जुलैला त्यांच्या ओजस क्रियेशन वतीने त्यांनी पहिला म्यूजिक कार्यक्रम सादर केला व आत्तापर्यंत त्यांनी भक्ती संगीत, सदाबहार मराठी गीत, लता-आशा स्पेशल, दिवाळी स्पेशल अशा वेगवेगळ्या थीमचे १४ कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित केले आहेत. भविष्यात ही विविध विशेष दिनांची थीम घेऊन म्यूजिक शो आयोजित करणार आहोत असे त्या बोलल्या.

“We spread happiness through music” असा संदेश त्यांच्या बॅनरवर झळकतो व संगीतातुन व समाजसेवेतुन आनंद व समाधानाचे काही क्षण रसिक प्रेक्षकांना मिळावे यासाठी ओजस क्रियेशन बॅनरचे वतीने नियमित संगीत व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याचा मानस आयोजिका ज्योती व श्रीकांत कुलकर्णी यांनी व्यक्त केला.

ज्योती कुलकर्णी मुंबई
लेखिका, स्पेशल एजुकेटर व समाजसेविका

- Advertisement -spot_img
spot_img

Related Articles

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img