22.1 C
New York
Tuesday, September 17, 2024

Buy now

spot_img

रिपाइं प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या उपस्थित केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे सोलापूर येथे वाढदिवस साजरा

संघर्षनायक डॉ. रामदास आठवले यांचा वाढदिवस रिपाइं सोलापूर शहराच्या वतीने प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या प्रमुख उपस्थितीत जल्लोषात साजरा

सोलापूर ( प्रतिनीधी )
हर जोर जुल्म की टक्कर मे संघर्ष हमारा नारा है अशी घोषणा देत सुरु केलेल्या भारतीय दलित पँथरने
“पोटात तुझ्या पेटली आग उठ दलिता तोफा डाग”
अशी हाक देवून सार्‍या महाराष्ट्रातील आंबेडकरी युवकांना ‘पँथर’ बनविणारे रामदास जी आठवले साहेब यांचा वाढदिवस सोलापूर शहरात विविध सामाजिक, धार्मिक,शैक्षणिक,क्रीडा,आरोग्य विषयक,विधायक उपक्रम घेवून साजरा करण्यात आला,
तसेच पक्ष कार्यालय या ठिकाणी मा.लोकनेते राजाभाऊ सरवदे साहेब यांच्या हस्ते केक कापून फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली.

या वेळी संघटन म्हणजे भारतीय दलित पँथर!
सळसळत्या रक्ताच्या तरुण क्रांतिकारी पँथर्सना सोबत घेवून दलितांवर होणार्‍या अन्याय अत्याचारांविरोधात बंड पुकारताना ‘जय भीम के नारे पे खून बहे तो बहने दो’ ची आक्रमक घोषणा देत भारतीय दलित पँथरचे ज्वालाग्रही वादळी आक्रमक नेतृत्व म्हणून पुढे आलेले नाव म्हणजे ‘रामदास आठवले’!
70 च्या दशकात दलित पँथर आणि पुढे भारतीय दलित पँथरच्या वादळी चळवळीत तावून सुलाखून निघालेले नेतृत्व म्हणजे रामदास आठवले.पँथरच्या चपळाईने रामदास आठवले यांनी संपूर्ण देशात भारतीय दलित पँथरच्या छावण्या उभारल्या.रामदास आठवले उत्कृष्ट संघटक असल्यामुळे संपूर्ण देशात त्यांनी संघटन उभे केले. सामाजिक आणि आर्थिक विषमतेने गर्भगळीत झालेल्या गावकुसातील दलिताला स्वाभीमानाचे बळ देवून अन्याय अत्याचाराविरुद्ध लढण्याची हिंमत रामदास आठवले यांच्या पँथर चळवळीने दिली.

भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर या आपल्या प्राणप्रिय मुक्तीदात्याचे नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्यात यावे या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात नामांतर आंदोलन उभे राहिले.या नामांतर आंदोलनात भारतीय दलित पँथरने स्वत:ला वाहून घेतले.नामांतर आंदोलन हे 16 वर्षे चालले. संपूर्ण जगात मराठवाडा विद्यापीठ आंदोलन ऐतिहासिक आंदोलन ठरले.नामांतर आंदोलनात अनेक भीमसैनिक शहीद झाले.या आंदोलनात जीवाची बाजी लावून पँथर लढले.प्राण तळहातावर घेवून नामांतरासाठी राज्यभर गावागावात लढत फिरणारा अवलिया म्हणजे रामदास आठवले होत.आठवलेंनी मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनात “लाठी गोली खायेंगे फिर भी आगे जायेंगे” ची घोषणा देत पोलिसांचा लाठी चार्ज खावून प्रसंगी तुरुंगवास भोगला.आंबेडकरी चळवळीत जीवाची बाजी लावून लढत रामदास आठवलें नावाचा संघर्षनायक घडला.आंबेडकरी चळवळीचे भाग्य आहे की रामदास आठवलेंसारखा झुंजार योद्धा या चळवळीचा शिर्षस्थ नेता म्हणून लाभला.महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना प्रमाण मानून त्यांनी दिलेल्या सामाजिक आणि आर्थिक समतेच्या उद्दिष्टासाठी हाती निळा झेंडा घेवून अहोरात्र झटणारा लोकनेता म्हणजे रामदास आठवले!
संघर्ष का दुसरा नाम रामदास आठवले है !असं त्यांच्या बद्दल म्हंटलं जातं एव्हढा संघर्ष करून तावून सुलाखून निघालेले नेते रामदास आठवले आहेत.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष साकार करण्यासाठी रामदास आठवलेंनी आपले सोन्यासारखे प्राणप्रिय संघटन भारतीय दलित पँथर बरखास्त केले. 1990 मध्ये भारतीय दलित पँथर ही संघटना बरखास्त करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे काम रामदास आठवलेंनी सुरु केले. 1990 मध्ये रामदास आठवलेंच्या नेतृत्वातील रिपाइं ने काँग्रेस आय ला पाठिंबा देवून विधानसभा निवडणूक लढली.त्या निवडणुकीत रामदास आठवलेंच्या नेतृत्वामुळे काँग्रेसला आंबेडकरी जनतेचे मतदान मिळाले.त्यामुळे काँग्रेसच्या 35 जागा अधिक जिंकून आल्याची जाहीर कबूली तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी दिली.त्यांच्या मंत्रीमंडळात रामदास आठवले हे समाज कल्याण,परिवहन,दारुबंदी आदी चार खात्यांचे कॅबिनेट मंत्री बनले.ते मंत्री बनले त्या दिवशीही आठवले हे वडाळ्याच्या सिद्धार्थ हॉस्टेलमध्ये राहात होते.अत्यंत खडतर प्रवास आणि व्यवस्थेशी संघर्ष करणारा आपला ‘पँथर’ महाराष्ट्राचा कॅबिनेट मंत्री झाला याचे संपूर्ण देशात कौतुक झाले. रामदास आठवलेंच्या नावाची तेव्हा संपूर्ण देशात चर्चा झाली.अत्यंत गरीब परिस्थितीत शेतमजूर आईच्या पोटी जन्माला आलेले रामदास आठवले हे अवघे सहा महिन्यांचे असताना त्यांचे पितृछत्र हरपले. महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील कवठेमहंकाळ तालुक्यात त्यांचे ढालेवाडी हे छोटे गाव. येथून जवळ असणार्‍या आगळगावात त्यांचा जन्म झाला.पुढे त्यांचे बालपण मामाच्या गावी सावळज (ता.तासगाव) येथे गेले.प्राथमिक शिक्षण सांगलीत झाले.

महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते मुंबईत आले. सिद्धार्थ हॉस्टेल वडाळा येथे त्यांनी प्रवेश घेतला. तेथे दलित पँथरचे संस्थापक राजा ढाले आणि नामदेव ढसाळ यांच्या संपर्कातून ते दलित पँथरच्या चळवळीत सक्रीय झाले. दलित पँथर ची पुढे त्यांनी भारतीय दलित पँथर करुन संपूर्ण देश पिंजून काढला.मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्याचे प्रारंभापासून नेतृत्व करुन 14 जानेवारी 1994 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नामांतर करुन या ऐतिहासिक आंदोलनाला यश मिळवून दिले.मराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव न दिल्यास मंत्रीपदाचा आपण राजीनामा देवू असा निर्वाणीचा ईशारा ना. रामदास आठवले यांनी दिल्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी नामांतर केले.महाराष्ट्राचे समाज कल्याण मंत्री असताना रामदास आठवले यांनी मराठवाडा विद्यापीठ नामांतराचे केलेले कार्य संस्मरणीय ठरले आहे. नामांतराचे शिल्पकार रामदास आठवले म्हणून राज्यात त्यांचा आजही गौरवाने उल्लेख केला जातो.

25 डिसेंबर संघर्षनायक ना.रामदास आठवले यांचा वाढदिवस देशभर संघर्षदिन म्हणून रिपाइं तर्फे साजरा होतो.संघर्ष संयम आणि धैर्याचे महामेरू ठरलेल्या संघर्षनायक रामदास आठवले यांना देशसेवेसाठी उदंड आयुष्य आणि आरोग्य लाभो अशा शुभेच्छा राजाभाऊ सरवदे साहेब यांनी दिल्या..

या वेळी पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष लोकनेते राजाभाऊ सरवदे साहेब,अतुल नागटिळक,प्रा.पवन थोरात,शाम धुरी,सुशील सरवदे,के.डी.कांबळे,राजेश उबाळे,सोमनाथ घोडोकुंबे,राजा धावणे,विकास सरवदे,मल्लू शिवशरण,सुमित शिवशरण,शिवराज पुल्लुर,श्रीनिवास सरवदे,दावला सुर्वे,शिवम सोनकांबळे,महेश पवार,आप्पा राऊत,बापू शिवशरण,सचिन कांबळे,सचिन शिंदे,सुग्रीव जेठिथोर,जीवन हिपर्गिकर,संजय गायकवाड,विकास चव्हाण,उपगुप्त चौधरी,राहुल वाळके,प्रशांत गायकवाड,महादेव बाबरे,बंटी घाडगे,संघपाल घोडकुंबे आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -spot_img

Related Articles

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img