25.9 C
New York
Saturday, June 15, 2024

Buy now

spot_img

शिर्डी व सोलापुर लोकसभा मतदारसंघ महायुतीचे घटक पक्ष रिपाईला सोडण्यात यावे : अविनाश मडिखांबे

शिर्डी व सोलापुर लोकसभा मतदारसंघ महायुतीचे घटक पक्ष रिपाईला सोडण्यात यावे : अविनाश मडिखांबे

भाजपाच्या प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना अक्कलकोट रिपाइं वतीने निवेदन

अक्कलकोट प्रतिनिधी

शिर्डी व सोलापुर लोकसभा मतदारसंघ महायुतीचे घटक पक्ष रिपाईला सोडण्यात यावे या बाबतचे निवेदन भाजपाच्या प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आले
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट हा महायुतीचे भाग असून महाराष्ट्रसह देश पातळीवर रिपब्लिकन पक्ष भाजपला मदत करत असून सोलापुर लोकसभा मतदारसंघ हा रिपब्लिकन पक्षचा बाल्लेकिल्ला आहे आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती साठी राखीव असून रिपाई प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांना मानणारा सर्व जाती धर्माचा मोठा वर्ग असून गेल्या पन्नास वर्षांपासून आंबेडकरी चळवळीचे मोठे काम त्यांच्या हातून घडत आहे महायुतीचे काळात महात्मा फुले मागसवर्ग आर्थिक विकास महामंडळाच्या अतिशय यशस्वीपणे अध्यक्ष पद भूषविलेले आहे अहिल्याबाई होळकर सोलापुर विद्यापीठचे सिनेट सदस्य पदी ते गेले दोन टर्म सातत्याने निवडून येत आहेत त्यांना चळवळीचा प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे जिल्ह्याच्या अकरा तालुक्यात राजाभाऊ सरवदे याचे मोठे काम असून महायुतीला ही जागा राजाभाऊ सरवदे यांच्या रूपानी दिली तर जिंकण्यासाठी अतिशय सोईस्कर होईल आपण या सर्व बाबींचा विचार करून सोलापूर लोकसभा मतदारसंघ रिपब्लिकन पक्षाला सोडण्यात यावे अशी मागणी रिपाइंचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे यांनी निवेदाद्वारे केले आहेत
यावेळी भाजपचे सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकोटचे लोकप्रिय आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी,रिपाइं अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे, रिपाइं तालुका सरचिटणीस राजू भगळे, तमा धासडे, सैपन शेख, आदी उपस्थित होते

- Advertisement -spot_img

Related Articles

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img