22.4 C
New York
Tuesday, July 23, 2024

Buy now

spot_img

केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या गाडीला वाई येथे अपघात, ना. रामदास आठवले सुखरूप

केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या गाडीला वाई येथे अपघात, ना. रामदास आठवले सुखरूप

सातारा ( प्रतिनीधी )
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आज गुरुवार दि.21 मार्च रोजी सायंकाळी 6 .15 वाजता वाई ( सातारा) येथुन मुंबईला येत असताना त्यांच्या वाहनाला वाई येथे अपघात झाला. अपघातात गाडीतील कोणीही जखमी नाही.ना.रामदास आठवले सुखरूप आहेत. वाई येथून मुंबईकडे येत असताना समोर अचानक कंटेनर पंक्चर झाल्यामुळे थांबले होते त्यामुळे अचानक पुढील पोलीस गाडी ने ब्रेक मारल्यामुळे त्या गाडीवर रामदास आठवले यांची गाडी धडकली. त्यात गाडीचे नुकसान झाले असून ना.रामदास आठवले सुखरूप आहेत. त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी सौ.सिमाताई आठवले; सासु नंदा काशीकर आणि सीमाताई आठवले यांच्या मामी असे सर्व जण सुखरूप आहेत. अपघातात वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.दुसऱ्या वाहनाने ना.रामदास आठवले मुंबई कडे रवाना झाल्याची माहिती रिपाइंचे सातारा जिल्हा अध्यक्ष अशोक गायकवाड यांनी दिली आहे. अपघाताचे वृत्त कळल्यानंतर देशभरातून आठवलेंच्या चाहत्यांचे कार्यकर्त्यांचे फोन येत आहेत. याबाबत कोणीही काळजी करू नये संघर्षनायक ना.रामदास आठवले हे सुखरूप असल्याचे त्यांच्या पत्नी सौ सीमाताई आठवले यांनी कळविले आहे.

- Advertisement -spot_img

Related Articles

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img