22.4 C
New York
Tuesday, July 23, 2024

Buy now

spot_img

विवेकानंद प्रतिष्ठान आयोजित सर्व धर्मीय सामूहिक विवाहात पंधरा जोडप्याचे रेशीम गाठी

विवेकानंद प्रतिष्ठान आयोजित सर्व धर्मीय सामूहिक विवाहात पंधरा जोडप्याचे रेशीम गाठी

अक्कलकोट ( प्रतिनीधी ) दि.३०:- येथील विवेकानंद प्रतिष्ठान आयोजित सर्व धर्मीय सामूहिक विवाहात गोरजमुहूर्तावर शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता पंधरा जोडप्याचे रेशीम गाठी बांधण्यात आले.

शिवाचार्यरत्न खा.जयसिद्धेश्वर म्हास्वामीजीं, मैदर्गी विरक्त मठाचे मातेश्वर म्हास्वामीजीं, नंदगाव मठाचे राजशेखर म्हास्वामीजीं, मनिप्र बसवलिंग म्हास्वामीजीं, नागणसुर मठाचे श्रीकंठ शिवाचार्य म्हास्वामीजीं, मादन हिप्परग्याचे अभिनव शिवलिंगेश्वर म्हास्वामीजीं, प्रिन्स पिरजादे बाबा, पूज्य भन्तेजी, धानेश्ववर देवरू, मस्तुरअल्ली कादरी यांच्या दिव्यसानिध्यात शुभकार्या संपन्न झाला. सर्व म्हास्वामीजींचे पादपूजा मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी केले.

यावेळी व्यासपीठावर तिसरे श्रीमंत मालोजीराजे भोसले, आ. सुभाष देशमुख, आ. राम सातपुते, आ. सचिन कल्याणशेट्टी, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्थ अमोलराजे भोसले, श्री वटवृक्ष सवामी महाराज देवस्थान समितीचे आधयक्ष महेश इंगळे, आप्पासाहेब पाटील, संजीवकुमार पाटील, महिबूब मुल्ला, शहाजी पवार, मिलन कल्याणशेट्टी सागर कल्याणशेट्टी, मल्लिनाथ कल्याणशेट्टी, मोतीराम राठोड, शिवशरण जोजन, शांभवी कल्याणशेट्टी,डॉ गिरीजा राजीमवाले, मलम्मा पसारे, सुरेखा होळीकट्टी, मल्लिनाथ स्वामी, राजशेखर हिप्परगी, दिनेश पटेल, सिद्धय्या मठपती, शिवसिध्द बुळळा, सिद्धेश्वर कल्याणशेट्टी, यशवंत धोंगडे, सोमेश्वर जमशेट्टी, कल्याणी बिराजदार, शिवलिंग स्वामी, दयांनंद बिडवे, जाफर मुल्ला,सिद्धाराम हेले, दिलीप सिद्धे, रजाक सय्यद, प्रदीप पाटील आदीजण उपस्थित होते.

विवाह कार्यक्रम यशस्वी साठी मल्लिनाथ मसूती, मल्लिनाथ मजगे, गुरुपाद आळगी, मल्लिनाथ आळगी, राजकुमार झिंगाडे, बाळा शिंदे, विजय तडकलकर, मल्लिकार्जुन सोमेश्वर,विलास कोरे, निनाद शहा, अशोक येणेगुरे, निरंजन शहा, स्वामींनाथ हिप्परगी, संतोष जीरोळे, सोमनाथ पाटील, सिद्धाराम टाके, बालाजी पाटील, सिद्धाराम माळी, कांतू धनशेट्टी, सागर कल्याणशेट्टी,परमेश्वर यादवाड, चंद्रकांत दसले यांनी परिश्रम घेतले. प्रस्तावना,स्वागत आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी केले. आ सुभाष देशमुख, आ. राम सातपुते,खा जयसिद्धेश्वर म्हास्वामीजीं यांनी मनोगत व्यक्त केले.

सूत्रसंचालन प्रा नितीन पाटील तर आभार मिलन कल्याणशेट्टी यांनी मानले. वधूवराना समुपदेशन मुकुंद पतकी, सुरेखा होळीकट्टी, यांनी केले. त्याबरोबर वधूना डॉ आसावरी, डॉ मोमीन यांनी समुपदेशन केले.

- Advertisement -spot_img

Related Articles

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img