रिपाईंच्या वतीने अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयाचे नुतन वैद्यकीय अधीक्षक डॉ रवींद्र बनसोडे यांचा सत्कार
अक्कलकोट (प्रतिनिधी):- अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयाचे नुतन अधिक्षक म्हणून डॉ.रवींद्र बनसोडे यांनी सोमवारी पदभार स्वीकारला.यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना अविनाश मडिखांबे म्हणाले की तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ अशोक राठोड यांनी त्यांच्या कार्यकाळात अतिशय बिकट परिस्थितीत कोरोना महामारीच्या वेळी चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक असणाऱ्या यंत्रणा राबवून त्यांच्या सहकाऱ्यांना विश्वासात सोबत घेऊन अक्कलकोट शहर व तालुक्यातील रुग्णांना चांगल्या प्रकारे आरोग्य सेवा देऊन रुग्णांची सेवा करण्याचे चांगले काम राठोड सरांनी केली आहे राठोड सरांची बदली मंदृप येथे झाल्याने त्यांचा देखील सत्कार करुन पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आले .तसेच ट्रामा सेंटर चालू करण्यासाठी शासनदरबारी नेहमीच प्रयत्नशील राहिले.ग्रामीण रुग्णालयाचा चेहरा मोहरा बदलण्यात राठोड यांचा सिंहाचा वाटा आहे असे सांगितले. नुतन वैद्यकीय अधीक्षक डॉ.रवींद्र बनसोडे यांनी लवकरात लवकर ट्रामा सेंटर चालू करण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करून रुग्णांना सेवा पुरवण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन अविनाश मडिखांबे यांनी केले.यावेळी रिपाइं शहर अध्यक्ष अजय मुकनार,युवा नेते ननु कोरबु, उदय सोनकांबळे,शकील नाईकवाडी,शुभम मडिखांबे,इरफान कोरबू,इस्माईल आळंद, आदी उपस्थित होते