6 C
New York
Friday, April 26, 2024

Buy now

पांगरमल दारुकांड, जि.अहमदनगर येथील फरार महिला आरोपीस जेरबंद

पांगरमल दारुकांड, जि.अहमदनगर येथील फरार महिला आरोपीस जेरबंद

पुणे ( क्राईम प्रतिनीधी )
एम.आय.डी.सी पोलीस ठाणे जि. अहमदनगर गु.र.नं. 36/2017 भा.द.वि.कलम 304, 328,34, महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (क)(ख)(ग)(घ)(ड)(च), 68 (क)(ख), 80(1) (2) महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 चे कलम 3(1) (T)(TT),3(2),3(4),4 या गुन्हयातील आरोपी नामे भाग्यश्री गोविंद मोकाटे, मंगल महादेव आव्हाड ह्या शिवसेना पक्षाच्या वतीने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीकरीता उमेदवार म्हणुन निवडणूकीस उभे असताना त्यांनी दिनांक 12/02/2017 रोजी मतदारांना व कार्यकर्त्यांना जेवण व देशी/विदेशी दारुची पार्टी आयोजित केली होती. सदर पार्टीमध्ये दारु प्राशन केल्यामुळे एकुण 9 इसम मयत झाले व 13 लोक गंभीररीत्या जखमी झाले त्यापैकी दोघांना अर्धांगवायु व एकास अंधत्व आले आहे. त्यामुळे त्यांचे मृत्युस व गंभीर दुखापतीस कारणीभूत झालेवरुन त्यांच्या विरुध्द वरील गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यातील इतर 19 आरोपींवर 68 इतके इतर गंभीर गुन्हे दाखल असल्याचे गुन्हेगारी रेकॉर्ड असल्याने सदरच्या गुन्ह्यास मोका कायदा लावून त्यानुसार गुन्ह्याचा तपास चालू होता. गुन्ह्याचे गांभीर्य व व्याप्ती, तसेच राजकीय पाश्वभूमी लक्षात घेवून सदर गुन्ह्याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य पुणे येथे दिनांक 19/04/2017 रोजी वर्ग करण्यात आला.
सदर गुन्हयामध्ये एकुण 20 आरोपी निष्पन्न झाले असून त्यामधील 17 आरोपींना अटक करण्यात आलेली असून दोन आरोपी मयत आहे. सदर गुन्ह्यात मुख्य महिला आरोपी नामे भाग्यश्री गोविंद मोकाटे. रा. इमामपुर ता. जि. अहमदनगर ही जिल्हा परिषद जेऊर जि. अहमदनगर गटातुन सन 2017 मध्ये जि.प.सदस्य म्हणुन निवडुन आलेली आहे. परंतु त्या मागील सहा वर्षापासुन फरार होत्या. नमुद आरोपीचा मा. न्यायालयाने अटकपुर्व जामिन अर्ज नामंजुर केले आहे. तिच्याविरुध्द मा. विशेष न्यायालयाने एनबीडब्ल्यू वॉरंट व जाहीरनामे प्रसिध्द करुन देखील नमुद आरोपी मा. न्यायालयात हजर न होता स्वत:चे अस्तित्व लपवून फरार होत्या.
नमुद गुन्हयातील फरार आरोपी नामे भाग्यश्री गोविंद मोकाटे ही पुणे शहरामध्ये वास्तव्यास असल्याची तसेच एका नामांकित कंपनी, म्हाळुंगे, पुणे येथे सेल्स एक्झिक्युटीव्ह म्हणुन कामास असल्याचे खात्रीलायक माहिती राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे यांना बातमीदाराकडुन मिळाल्याने, नियोजित सापळा रचुन तिला दिनांक 27/08/2023 रोजी शिताफीने ताब्यात घेऊन सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली.
सदर कामगिरी ही मा. श्री. प्रशांत बुरडे, अपर पोलीस महासंचालक, गु.अ.वि.म.राज्य.पुणे, मा. संजय येनपूरे, विशेष पोलीस महानिरीक्षक (पश्चिम) गु.अ.वि.म.राज्य.पुणे, मा. श्रीमती. पल्लवी बर्गे, पोलीस अधीक्षक,(का व सं) गु.अ.वि.म.राज्य.पुणे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, श्री. आनंद रोहिदास रावडे, पो. हवा. विकास कोळी, पो.हवा. सुनिल फकिरप्पा बनसोडे, म.पो.हवा. उजवला डिंबळे, चालक पो.ना. कदम सर्व नेमणुक गु.अ.वि.म.राज्य.पुणे यांनी केलेली आहे.

- Advertisement -spot_img

Related Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest Articles