25.9 C
New York
Saturday, June 22, 2024

Buy now

spot_img

सरपंच परिषद मुंबई यांच्या दिनदर्शिकेचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते प्रकाशन

सरपंच परिषद मुंबई यांच्या दिनदर्शिकेचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते प्रकाशन

सरपंच सौ वनिता सुरवसे यांच्या कार्याचे जिल्हाध्यक्षनी केले कौतुक

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) : सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र यांच्या सोलापूर जिल्ह्याच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा आमदार सचिन (दादा) कल्याणशेट्टी, व अक्कलकोटचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी व आर. पी. आय तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे यांच्या हस्ते अक्कलकोट मध्ये करण्यात आले.
सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्रच्या सोलापूर जिल्हा पदाधिकारी यांच्या वतीने सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्रचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड विकास जाधव, जिल्हाध्यक्ष आदिनाथ देशमुख, जिल्हा समन्वयक वनिताताई सुरवसे,अमोल दुरंदे व इतर पदाधिकारी यांच्या संकल्पनेतून सरपंच दिनदर्शिका तयार केली आहे, सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे व प्रदेश उपाध्यक्ष ॲड विकास जाधव यांनी सरपंच परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागात शाश्वत विकास कामांसाठी येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी अतोनात प्रयत्न करत आहेत. त्यांच्या पाठीशी सर्व सरपंच असेच ठामपणे राहा, तुम्ही सरपंच परिषदेमार्फत सर्व सरपंचाच्या अडचणी आमच्यापर्यंत पोहोचवताय आणि आम्ही त्याचे निराकरण शंभर टक्के करतोय, पुढेही सरपंच परिषदेचे असेच काम चालू राहू द्या,असे आमदार सचिन ( दादा ) कल्याणशेट्टी बोलताना सांगत होते.
जिल्हा समन्वयक सौ वनिता ताई यांनी दरवर्षी अक्कलकोट तालुक्यात दोन हजार दिनदर्शिका वाटप करत असतात, गेल्या वर्षी सुद्धा त्यांचे कॅलेंडर सर्वांना पोहचले आहे, त्यांच्या हातून असेच समाजकार्य घडो अश्या शुभेच्छा पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी दिल्या. या वेळी बोलताना तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे म्हणाले की सरपंच वनिता ताई सुरवसे यांनी वंचित घटकांना न्याय देण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात दिनदर्शिका हे वंचित घटकातील कुटुंबा पर्यंत पोचविण्याचे काम करत आहेत, त्यांच्याकडून असेच समाज उपयोगी काम घडो अशा शुभेच्छा देऊन कौतुक केले.
या प्रकाशन सोहळ्यास आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी, पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी ,गोगावच्या सरपंच तथा सरपंच परिषदेच्या सोलापूर जिल्ह्याच्या समन्वयक सौ.वनिता सुरवसे, आर पी आय तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे, दैनिक अक्कलकोट समर्थ संपादक प्रवीण देशमुख, अशोक मुलगे, सुधाकर सुरवसे,पोलिस हवालदार विपीन सुरवसे, राहुल काळे, पोलीस पाटील संतोष बनसोडे, व इतर पदाधिकारी उपस्थीत होते.

- Advertisement -spot_img

Related Articles

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img