23.4 C
New York
Thursday, September 19, 2024

Buy now

spot_img

वागदरी व परिसरात वेळ आमवशा सण उत्साहात

वागदरी व परिसरात वेळ आमवशा सण उत्साहात
—————————–
वागदरी (एस.के.गायकवाड):
वर्षातून एकदा शेतकऱ्यांना वन भोजनाचा आनंद देणारा वेळ आमवशा हा सण तुळजापूर तालुक्यातील वागदरी व परिसरात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
दर्श वेळा आमवशा हा सण दरवर्षी शेतकरी मोठ्या उत्साहात साजरा करतात. सकाळ पासूनच शेतकरी आपल्या काळ्या आईची पुजा करण्याच्या व सामुहिक वन भोजनाच्या तयारी करण्यात मग्न असतो. या सणानिमित्ताने महिला रात्रभर जागुन भज्जी (अनेक पाली भाजा एकत्र करून केलेली भाजी),बाजरीच्या पीठाचे उंडे, खिर,शेंगदाणेची पोळी, वरणभात, चपाती, वांगे बटाटेची भाजी गाजराचा हालवा,अंबिल (मठ्ठा),वगेरे स्वादिष्ट पदार्थ बनवितात. बनवलेले भोजन घेऊन शेतात जातात. जमीनची व शेतातील लक्ष्मीची मनोभावे पूजा करून सामुहिक सहवनभोजनाचा आनंद घेतात.शेतकरी व हितचिंतक एकमेकांच्या शेतात जाऊन आवडीने भज्जी, उंडे खातात अंंबील पितात एकप्रकारे शेतशिवारात आनंदी वातावरण निर्माण झालेले असते. असा सहभोजनाचा,वनभोजनाचा आनंद देणारा वेळ आमवशा हा सण वागदरी व परिसरात मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा करण्यात आला.

- Advertisement -spot_img

Related Articles

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img