10.4 C
New York
Thursday, April 11, 2024

Buy now

गोगांव मध्ये नवीन 220/132/33 उपकेंद्र मंजूर. – आ. सचिन कल्याणशेट्टी

गोगांव मध्ये नवीन 220/132/33 उपकेंद्र मंजूर. – आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी

गोगावच्या सरपंचं सौ वनिता सुरवसे यांच्या पाठपुराव्याला आले यश

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) : गोगांवच्या सरपंच वनिता सुरवसे यांनी पुणे येथील महापारेषण कंपनीच्या मुख्य अभियंता अनिल कोलप आणि अधीक्षक अभियंता संदीप हाके यांची भेट घेऊन पुष्पगुछ व शाल देऊन आभार व्यक्त केले

वागदरी भागात 220/132/33 उपकेंद्र होण्यासाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखली सरपंच वनिता सुरवसे यांनी गेल्या वर्षांपासून प्रयत्न चालू होते सदर कामास शासन स्तरावरून मंजुरी मिळाली असून गोगावचे नवीन उपकेंद्राचे काम लवकरच चालू करू असे आश्वासन मुख्य अभियंता अनिल कोलप यांनी दिले. उपकेंद्राचे काम अंतिम टप्प्यात असून जमीन हस्तांतर झाली आहे, महिना दोन महिन्याच्या आत उपकेंद्राचे कामाचे भुमिपूजन केले जाईल. आपण एक महिला सरपंच असून आपला तर पाठपुरावा आहेच तसेच आम्हाला तालुक्याचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचेही पाठपुरावा आहे, त्यामुळे आपण चिंता करू नये, लवकरच आपल्या भागात नवीन उपकेंद्र चालू होईल असे आश्वासन मुख्य अभियंता अनिल कोलप यांनी सरपंचं वनिता सुरवसे यांना दिले.
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या कामाचा वेगळा ठसा सर्वांनी पाहिलेला आहे, गेल्या काही दिवसापासून सरपंच सुरवसे यांनी आमदारांना विनंती केली होती. गोगाव मधील विकासकामे आणि आपल्या भागामध्ये एक उपकेंद्र व्हावे यासाठी पाठपुरावा सतत करत आहेत.लवकरच मंजूर झालेल्या उपकेंद्राचे भुमिपूजन होईल अशी अशा वाढली आहे, गोगावच्या उपकेंद्राचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करावे अशी विनंती ही सरपंच सुरवसे यांनी आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांना केली आहे.आणि त्यामुळे सोलर कंपन्या ना दिलासा मिळून गावासाठी रोजगार पण उपलब्ध होण्यास मदत होणार आहे आणि ग्रामपंचायतच्या महसूल मध्ये सुद्धा वाढ होणार आहे.आमदार सचिन कल्याणशेट्टी कायम आमच्या पाठीशी उभे आहेत, त्यांच्या सहकार्यामुळेच विकास करणे शक्य होत आहे. त्यांचे किती आभार मानावे तेवढे कमीच आहेत असे कौतुक करून सरपंच सुरवसे यांनी आमदार सचिन दादा, महापारेषण कंपनीचे, व उपकेंद्रास जमीन दिलेल्या शेतकऱ्यांचे, संपूर्ण ग्रामपंचायत सदस्याचे मनापासून आभार मानले आहे.

- Advertisement -spot_img

Related Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest Articles