19.6 C
New York
Sunday, September 15, 2024

Buy now

spot_img

हनुमान नगर सारख्या झोपडपट्टीतील तृतीपंथी प्रिती ने मिळविले बारावी च्या परिक्षेत घवघवीत यश

हनुमान नगर सारख्या झोपडपट्टीतील तृतीपंथी प्रिती ने मिळविले बारावी च्या परिक्षेत घवघवीत यश

सोलापूर l महेश गायकवाड

हनुमान नगर सारख्या झोपडपट्टीतील तृतीपंथी प्रिती नागटिळक याने इयता बारावी च्या परिक्षेत मोठे घवघवीत यश मिळविले आहे त्याच्या या यशा बद्घधल सर्वत्र कौतुक केले जात असुन प्रिती च्या लहान पणापासून च्या जीवनाची स्टोरी सोलापूर जिल्हा परीषदेचे कार्यकारी अभियंता आणि सामजिक जाणीव असणारे अधिकारी राजेश जगताप यांनी सोशल मीडियाचा माध्यमातुन रेखाटले आहेत.

शिक्षण हे कुणीही आणि केव्हा ही घेऊ शकते याला वयाची अट नाही किँवा कसले बंधन नाही त्यामुळेच सोलापूर मधील हनुमान नगर या झोपडपट्टी भागामधील रहिवाशी असलेला तृतीपंथी रविंद्र उर्फ प्रीति नाग टिळक याने इयत्ता
बारावी परीक्षेत मोठे यश मिळविले आहे .

बारावी परीक्षेत तृतीयपंथीला यश जीवनात वावरत असताना सर्वांना समान अधिकार आहे असे नेहमी म्हटले जाते, परंतु काही वेळा पुरुष स्त्री, उच्च नीच, गरीब श्रीमंत, धर्मभेद, जात-भेद यावरून वाद झालेले अनेक विषय नेहमी समोर आले आहेत. या सर्वांच्या पलीकडे आहे आहे तो एक वेगळा प्रश्न ज्याकडे सर्व मानव जातीने प्रेमाने, आपुलकीने पाहिले पाहिजे. ते म्हणजे तृतीयपंथीय, नैसर्गिक दृष्ट्या त्यांच्यावर ओढवलेली आपत्ती पाहता त्यांना सहानुभूतीने पाहत, त्यांना समाजात उंच मानेने जगण्यासाठी मदत व्हावी अशीच अपेक्षा तृतीयपंथीयांची असते. अशा सर्व परिस्थितीतून यशाचे शिखर गाठत काहीतरी करून दाखवण्याची मानसिकता उराशी बाळगत आज एका तृतीयपंथीयांनी यश गाठले, मग त्याचे कौतुक तर नक्की झाले पाहिजे.

सोलापूर शहरातील हनुमान नगर येथे राहणाऱ्या रवींद्र उर्फ प्रीती नागटिळक सिग्नल वर पैसे कमावणारे तृतीयपंथी मधील एक. बारावी मध्ये एक्कोन पन्नास टक्क्यांनी उत्तीर्ण होत पोलीस भरती होण्याचे स्वप्न उघड्या डोळ्यांनी पाहत त्याकडे वाटचाल सुरू केली आहे.

आयुष्यात खडतर प्रवास करत दहा वर्षापूर्वी सुटलेला अभ्यास पुन्हा उरी बाळगून कुटुंब व मित्रांच्या पाठिंबामुळे पुन्हा पोलीस भरतीचे स्वप्न पाहणे शक्य झाले आहे. अक्कलकोट तालुक्यातील कडबगाव (अक्कलकोट स्टेशन) येथील सिध्दाराम म्हैत्रे ज्युनियर काॅलेज मधे अक्कलकोटचे प्रा.सुर्यकांत कडबगांवकर व कोन्हळीचे शिक्षक मल्लय्या हिरेमठ यांच्या सहकार्याने प्रवेश मिळवला. प्राचार्य कंचनाळ सर व कडबगांवकर सर यांचा मार्गदर्शन मिळाला .सिग्नल वर पैसे मागणे तर रात्रीच्या वेळी अभ्यास करुन बारावी परीक्षा उत्तीर्ण झाले. सद्यःस्थितीला स्वकष्टावर पोलीस भरतीचा सराव करत असून समाजाच्या पाठिंब्याने पोलीस प्रशिक्षण केंद्र मार्फत सराव करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

सिग्नल वर पैसे मागणारा हा तृतीयपंथी आज शैक्षणिक क्षेत्राकडे मोठ्या संख्येने वळत असून समाजाने याला स्वीकारले पाहिजे त्याचबरोबर तृतीयपंथांना समाजामध्ये ताठ मानेने जगण्याचा अधिकार त्यांना ही आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचा अधिकार संविधानाच्या माध्यमातुन सर्वांना दिलेला आहे.
त्यामुळे तृतीपंथी यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन समाजाने बदलण्याची सद्या नितांत गरज आहे. समाजामध्ये तृतीपंथी यांना स्थान निर्माण करण्याची व त्या संधीची सद्या गरज आहे
राजेश जगताप
कार्यकारी अभियंता,
जिल्हा परिषद, सोलापूर

- Advertisement -spot_img

Related Articles

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img