अक्कलकोट आगारात 10 नवीन लालपरी दाखल,आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या कार्याचा कौतुक
अक्कलकोटच :-(प्रतिनिधी) अक्कलकोट शहरात वातानुकूलित बस स्थानकाचे बांधकाम होत असताना दहा नवीन आरामदायी बसेस ही आणल्याने आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या कार्याचा कौतुक स्वागत होत आहे.
आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी यांच्या विशेष प्रयत्नतुन अक्कलकोट तालुक्याचा सर्वांगीण विकास होत असताना अक्कलकोट तालुक्यातील स्वामी भक्तांसाठी वातानुकूलित बसस्थानक इमारतीचे बांधकाम पूर्णत्वास येत असताना आता अक्कलकोट आगारास अशोक लेलँड कंपनीच्या नवीन आरामदायी प्रवासासाठी असलेल्या दहा नवीन बसेस मंजूर करून आणले असून त्या पैकी पाच बसेस आगारात दाखल झालेली आहे तर पाच मार्गावर आहेत.
आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी यांच्या काम करण्याच्या हातोटी बाबत अक्कलकोट तालुक्यातुन व स्वामी भक्तांनी समाधान व्यक्त केला जात आहे.
तसेच एसटी कर्मचाऱ्यांमध्येही उत्साहाच्या वातावरण दिसून येत आहे.
या बसेसचा लोकार्पण सोहळा आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी यांच्या शुभहस्ते लवकरच पार पडणार असून अक्कलकोट आगारास बसेस उपलब्ध करून दिल्याबद्दल आ. सचिनदादा कल्याणशेट्टी, सोलापूर विभागाचे विभाग नियंत्रक अमोल गोंजारी, यंत्र अभियंता शितल बिराजदार, सुरक्षा दक्षता अधिकारी खंदारे, विभागीय वाहतूक अधिकारी पाटील, विभागीय वाहतूक अधीक्षक नकाते,तत्कालीन आगार व्यवस्थापक नागेश जाधव व विद्यमान आगार व्यवस्थापक रणजीत साळवे व कार्यशाळा अधीक्षक संजय कांबळे यांचे सेवा शक्ती संघ एस. टी. कर्मचारी संघ अक्कलकोट आगार यांच्यावतीने आभार व्यक्त केले आहे.
अक्कलकोट शहरात तालुका वाशीयांच्या आशीर्वादाने सुसज्ज वातानुकलीत बस स्थानक होत असताना काही मोडकळीस आलेले बसेस कायमस्वरूपी सेवेतून मुक्त करून नवीन आरामदायी बसेस आणण्याची मागणी एका एसटी कामगार संघटनेने वारंवार करीत होती त्याची गांभीर्य लक्षात घेऊन 10 आरामदायी बसेस मंजूर करून आणलेली आहे. गरज पडल्यास आणखीन बसेस आणणार आहे.
आमदार सचिन कल्याणशेट्टी अक्कलकोट
अक्कलकोट आगारासाठी बी सिक्स च्या दहा बसेस आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या प्रयत्नातून मंजूर झाले असून त्यापैकी पाच बसेस अक्कलकोट आगारात पोहोचलेले आहेत आणखीन पाच बसेस येत्या दोन-चार दिवसात येणार आहेत
रणजीत साळवे
आगार व्यवस्थापक अक्कलकोट
अक्कलकोट आगारातील वयोमानानुसार काही बसेस सेवेतून कायमस्वरूपी निवृत्त होत आहेत अक्कलकोट हा सीमावरती भागातील प्रमुख बाजारपेठापैकी एक असून श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी देश भरातील दररोज हजारो स्वामीभक्त येत असतात त्यांच्या सोयीसाठी नव्या बसेसचे आवश्यक आहे म्हणून महामंडळाच्या स्वमालकीच्या येऊ घातलेल्या बसेस पैकी किमान 30 बसेसची मागणी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडे केले होते त्यानुसार आमदार साहेबांनी आगामी काळातील गांभीर्य लक्षात घेऊन 10 नवीन बसेस पदरात पाडून घेतलेले आहेत त्यापैकी पाच बसेस आगारात आले असून आणखीन पाच बसेस मार्गावर आहेत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केलेल्या लाखमोलाच्या सहकार्याबद्दल एसटी कर्मचारी संघटना मनापासून आभार व्यक्त करीत आहे.
संजय हराळे
उपाध्यक्ष सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्य शाखा अक्कलकोट