चेतना इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च तर्फे
मुंबईतील उद्योजकांची एक दिवसीय कार्यशाळा
मुंबई : ( प्रतिनीधी ) चेतना इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च च्या वांद्रे येथील प्रांगणात मुंबईतील उद्योजकांच्या एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. विविध स्थरातील उद्यॊजकांना उद्योग व्यवस्थापनाचे मार्गदर्शन करणे हे ह्या कार्यशाळेचा उद्देश होता. मुंबईतील तरुण उद्योजकांनी ह्या कार्यशाळेला उत्तम प्रतिसाद दिला. त्यामुळेच चेतना इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च च्या कार्यकारिणीने असा निर्णय घेतला आहे कि अशा उद्योजकांच्या कार्यशाळांचे मालिका करून MSME सेक्टर मधील उद्योगांना योग्य मार्गदर्शन सातत्याने मिळण्याची व्यवस्था करावी.
ह्या कार्यशाळेसाठी चेतना इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च च्या CEO डॉ .मधुमिता पाटील, डायरेक्टर डॉ. नंदिता मिश्रा, डॉ. संदीप नेमळेकर, आदी प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. डॉ सिद्धी जगदाळे यांनी कार्यशाळेचे उत्तम आयोजन केले होते. विविध उद्योग चेंबर्सशी संबंधित असलेले श्री अरुण धनेश्वर यांनी कार्यशाळेत येणारे उद्योजक कशा प्रकारचे असावेत आणि त्यांना त्याचा कसा लाभ होईल ह्या कडे बारकाईने लक्ष दिले होतं.
यामुळे सहभागी उद्योजकांनी या कार्यशाळेत मिळालेल्या मार्गदर्शनासाठी खूप प्रशंसा करून समाधान व्यक्त केले. तसेच यापुढील कार्यशाळेत आपल्या कर्मचाऱ्यांना पाठवण्याची तसेच विविध औद्योगिक समस्यांवर सल्ला घेण्याची इच्छा व्यक्त केली.