20.3 C
New York
Sunday, September 15, 2024

Buy now

spot_img

किरनळी येथे ६ कोटी 37 लाख कामाचे भूमिपूजन मिलन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते संपन्न

किरनळी येथे ६ कोटी 37 लाख कामाचे भूमिपूजन मिलन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते संपन्न

 

सात्विक सतीश कणमुसे यांच्या प्रथम वाढदिवसा निमित्त विविध विकास कामाचे भूमिपूजन 

अक्कलकोट ( प्रतिनीधी ) किरनळी ता अक्कलकोट येथे सरपंच सौ. महानंदा कणमुसे यांचे नातू सात्विक सतीश कणमुसे यांच्या प्रथम वाढदिवसा निमित्त किरनळी येथे ६ कोटी ३७ लाखाच्या विविध विकास कामाचे भूमिपूजन अक्कलकोटचे रॉयल नगरसेवक मिलन दादा कल्याणशेट्टी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले ,कार्यक्रम अध्यक्षस्थानी सरपंच महानंदा कणमुसे हे होत्या
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती भाजपा तालुका उपाध्यक्ष प्रदीप जगताप, उपसरपंच अरविंद भांगे, शेळके प्रशाला चेअरमन बसवराज शेळके, जेष्ठ भाजपा नेते श्रीशैल काका ठोंबरे, अप्पासाहेब बिराजदार, कल्याणराव बिराजदार, उपसरपंच कमलाकर सोनकांबळे, उपअभियंता बेंबळगी, ठेकेदार अंकुश राजपूत, बोरगाव सरपंच शाम स्वामी , सिध्दु किवडे, घोळसगांव सरपंच राजेंद्र कीवडे, शशी पाटील, अप्पासाहेब किवडे, सचिन घुगरे, स्वामीनाथ शिदोरे, दत्ता व्होदलूरे, संतोष पोमजी, सुनील सावंत, शाम बाबर, शिवानंद पटणे, महादेव सोनकवडे,दयानंद कुंभार, धोडप्पा मुलगे, बोलेगाव सरपंच विलास पाटील, अंगद जाधव आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते
यावेळी बोलताना श्रीशैल ठोंबरे म्हणाले की, इतिहासात पहिल्यांदा किरनळी गावास येवढे मोठ्या प्रमाणात निधी आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांच्या माध्यमातून मिळाले आहे, गावाचे सरपंच महानंदा कणमुसे ताई व सतीश कणमुसे यांच्या प्रयत्नाने गावाचे विकास कामाला चालना मिळत आहे आपल्या भागातील वीज समस्या मोठी होती ते समस्या आज सचिन दादा कल्याणशेट्टी यांच्यामुळे मिटले आहे त्यामुळे आज शेतकरी सुखात आहेत, लाईट वेळेवर आठ दहा तास मिळत आल्याने शेतकऱ्याचे अडचण गेलेले आहे, भुरिकवठे किरनळी व किरनळी घोळसगाव रस्त्याचे कामाचे भूमिपूजन झाले आहे त्यामुळे येणाऱ्या काळात लोकांना प्रवास करण्यास सोयीस्कर होईल. पंतप्रधान मोदी साहेब संकप्लेतुन हर घर नळ ….हर घर जल योजनेतून पाणी पुरवठा व विविध कामाचे भूमिपूजन ही करण्यात आले त्यामुळे गावातील पाणी समस्या मिटणार आहे व मुस्लिम, धनगर लिंगायत, मागासवर्गीय समाजामध्ये सिमेंट काँक्रिट रस्ता, पेव्हर ब्लॉक, बंदिस्त गटार, सभागृह हे काम होत आहेत त्यामुळे गावाची प्रगती होणार आहे
यावेळी सरपंच सौ. महानंदा कणमुसे यांचे नातू सात्विक सतीश कणमुसे यांच्या प्रथम वाढदिवस व सचिन दादा कल्याणशेट्टी यांचे कट्टर समर्थक असलम मुल्ला याचे वाढदिवस मिलन दादा कल्याणशेट्टी व मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून साजरा करण्यात आले,

यावेळी किरनळी गावाचे श्री अनिल अर्जुन भंडारे भूमिपुत्र गेल्या ३७ वर्ष रेल्वे उपनिरिक्षक सेवेत निष्कलंक कार्य करून सेवा निवृत्त झाल्याबद्दल किरनळी ग्रामपंचायत व ग्रामस्थ वतीने जंगी सत्कार करण्यात आले

यावेळी ग्रामपंचायत सदस्य शाम सोनकांबळे, शशी कोळी, पद्माकर भंडारे, ग्रामविकास अधिकारी शिवपुत्र ढोपरे, ग्रामविकास अधिकारी राजू कणमुसे, भाजपा जेष्ठ नेते रेवप्पा कणमुसे, चंद्रशेखर कणमुसे, श्रीशैल कणमुसे, चंद्रकांत हुलगणे, महेश कणमुसे, उमाकांत गुमते,साहेबलाल सुभेदार, सायबांना भांगे, अरुण भंडारे, सुभाष भंडारे, सायबा सोनंकाबले, धनराज धेबडे, मकबूल कणमुसे, पंकज सुतार, गिरीश कणमुसे, कर्मचारी दीपक भांगे, विनोद सोनकांबळे, आदीनी परिश्रम घेतले कार्यक्रम सूत्रसंचालन प्रा. शिवाजी गायकवाड यांनी केले आभार प्रा. कलाकार सोनकांबळे यांनी मानले

- Advertisement -spot_img

Related Articles

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img