19.5 C
New York
Sunday, June 16, 2024

Buy now

spot_img

शिरवळवाडी जवळ सिमेंटचे कंटेनर व क्रुझरचा समोरासमोर अपघात होवून सहा ठार तर 10 गंभीर जखमी

अक्कलकोट ते वागदरी जाणार्‍या रस्त्यावर सिमेंटचे कंटेनर व क्रुझरचा समोरासमोर अपघात होवून सहा ठार तर 10 गंभीर जखमी

वेळेत रुग्णवाहिका न आल्यामुळे लहान बारा वर्षाच्या मुलाला जीव गेला

अक्कलकोट, ( विशेष प्रतिनिधी ) दि.30 : शिरवळवाडी (ता.अक्कलकोट) येथे अक्कलकोट ते वागदरी जाणार्‍या रस्त्यावर सिमेंटचे कंटेनर व क्रुझरचा समोरासमोर अपघात होवून सहा ठार तर 10 गंभीर जखमी झाल्याचे प्राथमिक माहिती मिळाली आहे.
या घटनेबाबत जखमी नातेवाईकाकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, क्रुझरमधील भाविक हे अणूर (ता.आळंद, जि.कलबुर्गी) येथून नवस फेडण्याकरिता कर्नाटकातील अफझलपूर येथील भागम्मा देवी येथे जावून नवस फेडून गाणगापूर, अक्कलकोट येथे देवदर्शन करुन वागदरी मार्गे अणूरकडे जात असताना शिरवळवाडीच्या पुढे एक कि.मी.अंतरावर पुलाशेजारील वळणावर कलबुर्गीहून सोलापूरकडे येणार्‍या कंटनेर क्र.एम.एच.12/युएम/7186 या गाडीने समोरुन येणार्‍या क्रुझर क्र.केए/35/ए/7495 गाडीला शुक्रवारी दुपारी 4.30 वाजणेच्या सुमारास जोरदार ठोकरल्याने क्रुझरमधील चालकासह 16 जणापैकी 6 जण जागीच ठार झाले आहेत सदर अपघाताचे माहिती मिळताच वागदरी व शिरवळवाडी मधील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने गर्दी केले होते व यातील युवा तरुणाने बचाव करण्यासाठी खूप प्रयत्न करत होते परंतु वेळेत रुग्णवाहिका न आल्यामुळे बारा वर्षाच्या मुलाला जीव गमवावे लागले, यावेळी संघर्ष सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्याम बाबर,उपाध्यक्ष महादेव सोनकवडे, मकबूल कणमूसे , पंकज सुतार, जगन्नाथ कणमुसे, विनोद घुगरे, प्रदीप पोमाजी, शिवराज पोमाजी, राजू यादव, बसवराज मठपती , सतीश पोमाजी, धांलिंगप्पा पोमाजी, संतोष कणमुसे, अनिल घोडे, समर्थ भीमपुरे, सैदू कोळी, विजयकुमार सावंत, बंडू सावंत, दत्ता व्हदलूरे, हणमंत घोदे आदिने मदत कार्या करत होते
या. अपघातामधील 8 जण गंभीर जखमी तर 2 जण किरकोळ जखमी झाली असून जखमींना अक्कलकोट ग्रामीण रुग्णालय येथे प्राथमिक उपचार करुन सर्वच्या सर्व जखमी रुग्णांना सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथे पुढील उपचाराकरिता पाठविण्यात आले आहे.
यातील जखमींची नावे असे : क्रुझरचे चालक सुनिल हणमंतराव पांचाळ (वय 50), सुमित पुजारी (वय 9), रेखा गोविंद पुजारी (वय 40), गोपाल चंद्रकांत पुजारी (वय 50), विठ्ठल हणमंत ननवरे (वय 35), अजित अशोक कुंदले (वय 30), भाग्येश अशोक कुंदले (वय 40), अशोक पुनदिले (वय 45), कोमल शामडे (वय 50), कल्पना अशोक कुंदले (वय 40) रा. सर्व अणूर (ता.आळंद, जि.कलबुर्गी) असे जखमींची नावे असून मयत झालेल्यामध्ये पाच स्त्री तर 1 एक 12 वर्षाचा मुलाचा समावेश आहे. कंटेनर चालक अपघातानंतर फरार झालेला आहे. याबाबत अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचा काम चालु होते. या घटनास्थळी ग्रामीण पोलिस अधिक्षक, अक्कलकोट उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावार, उत्तर पोलिस ठाण्याचे पो.नि.जितेंद्र कोळी, तहसिलदार बाळासाहेब शिरसाठ यांनी भेट देवून जखमींना उपचाराकरिता अक्कलकोटकडे पाठविण्यात आले. यावेळी ,चंद्रकांत पुजारी पोलीस उप निरीक्षक, हवालदार चिंचोळकर, हलवादार अंगद गीते ,पोलीस नाईक शरद चव्हाण, पोलीस नाईक कोल्हे ,पोलीस स्वामी, अवताडे ,शिंदे ,पाटील, राम चौधरी,, यासह वाहतूक पोलिस घटनास्थळी उपस्थित होते,
पुढे जाऊन कंटनेर एम एस इ बी फोल धडक दिल्यामुळे त्या ठिकाणचे विद्युत पुरवठा तार वायरमन वामने, बंडू मोरे यासह त्याच्या टीमने वेळेत काढल्यामुळे रस्त्यावरील वाहतूक जाण्यास मार्ग मोकळा झाले.
या अपघातात मयत झालेल्या सहाही मृतदेह शवविच्छेनासाठी अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. सदरील अपघात घडल्यानंतर रिपाइं तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे, राजु भगळे, सोहेल बागवान, दिलीप सिध्दे, प्रभाकर पाटील, समीर शेख, श्रीशैल इसामंत्री, सुरेश गायकवाड, शिलामणी बनसोडे, दिनेश रुही, शुभम मडिखांबे, शिवा जमगे, गणेश कांदे, लादेन बागवान, नन्हु कोरबु, संजय राठोड, अंबादास गायकवाड आदींनी अपघातातील जखमींना अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात आणून प्राथमिक उपचार करुन सोलापूरकडे प्राचारण करताना मदत केली.

चौकट : सार्वजनिक बांधकाम खात्याच्या दुर्लक्षामुळे रोडच्या बाजूला झाडे झुडपे वाढल्यामुळे गाड्या अलीकडून पलीकडून येताना दिसत नसल्याने अशा प्रकारचे अपघात होत आहे तरी त्वरित रस्त्याच्या बाजूने वाढलेले झाडे झुडपे तोडण्यात यावे व सदर ठिकाणी ब्रिज जवळ स्पीड ब्रेकर बसवण्यात यावे

महादेव सोनकवडे, उपाध्यक्ष संघर्ष सामाजिक संस्था वागदरी

- Advertisement -spot_img

Related Articles

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img