26 C
New York
Tuesday, May 7, 2024

Buy now

जिल्हा परिषद शाळा गोगांव येथे एस बी आय बँकेकडून संगणक संच भेट

जिल्हा परिषद शाळा गोगांव येथे एस बी आय बँकेकडून संगणक संच भेट

अक्कलकोट ( प्रतिनीधी ) जिल्हा परिषद शाळा गोगांव येथे भारतीय स्टेट बँक वागदरी शाखेकडून संगणक संच भेट देण्यात आले
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोगांवचे ग्रामपंचायत ज्येष्ठ सदस्य प्रदीप जगताप हे होते यावेळी सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेचे पूजन उपसरपंच कमलाकर सोनकांबळे, तंटामुक्त अध्यक्ष सूर्यकांत जिरगे, शरणप्पा कलशेट्टी यासह मान्यवराच्या हस्ते करण्यात आले यावेळी वागदरी शाखेचे शाखाधिकारी अरविंद कुमार यांचे जिल्हा परिषद शाळा कडून सत्कार करण्यात आले व गोगांव शाळेतून दुसऱ्या ठिकाणी बदली बदलून गेलेले शिक्षक बाबासाहेब बनसोडे यांचे सत्कार प्रदीप जगताप यांचे हस्ते करण्यात आले यावेळी पुंडलिक वाघमारे , कारभारी सर, महादेव चव्हाण, आलूरे मॅडम, विजयकुमार गायकवाड, धनराज सलगरे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना कमलाकर सोनकांबळे म्हणाले की वागदरी एसबीआय शाखेमध्ये शाखाधिकारी अरविंद कुमार जी आल्यापासून विविध शासकीय योजनेला चालना मिळत आहे शेतकऱ्याचे अडचण समजून कृषी कर्ज शेती विकासासाठी त्वरित मंजुर होण्यासाठी सतत प्रयत्नशील आहेत तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान व्हावे या उद्देशाने वागदरी भागातील वागदरी जिल्हा परिषद शाळा, भुरीकवठे जिल्हा परिषद शाळा व गोगांव जिल्हा परिषद शाळा येथे संगणक संच भेट देऊन विद्यार्थ्यांना संगणक ज्ञान वाढावे हे प्रयत्न करत असल्यामुळे शाखाधिकारी यांचे कौतुक करेल तेवढे कमी आहे कारण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणक ज्ञान मिळणे आवश्यक आहे सामाजिक उपक्रम या हेतूने बँकेने सहकार्य करत असलेले काम कौतुकास्पद आहे.
यापुढेही त्यांनी अशाच प्रकारे शाळेच्या विकासासाठी विविध माध्यमातून सहकार्य करावे तसेच आपल्या शाळेतील शिक्षक बाबासाहेब बनसोडे यांचे बोरोटी येथे बदली झाल्यामुळे शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ यांच्या वतीने सत्कार करण्यात आले आहे बनसोडे सर गेल्या तीन चार वर्षापासून जिल्हा परिषद शाळेसाठी व शाळेच्या प्रगतीसाठी चांगल्या प्रकारे प्रयत्न केलेले आहे व विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी सतत नवीन नवीन उपक्रम राबवण्यासाठी ते प्रयत्नशील होते यापुढेही जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी शाळेचे प्रगतीसाठी प्रयत्नशील करावे

- Advertisement -spot_img

Related Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest Articles