6 C
New York
Monday, December 9, 2024

Buy now

spot_img

भाजपाने दंगली घडवून सत्तेत येण्याची प्रयत्न करत आहेत : अँड. बाळासाहेब आंबेडकर

भाजपाने दंगली घडवून सत्तेत येण्याची प्रयत्न करत आहेत : अँड. बाळासाहेब आंबेडकर

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रात दंगली घडू देणार नाही : प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर 

मोठ्या जनसमुदाय उपस्थित अक्कलकोट येथे वंचित बहुजन आघाडीचे जन आक्रोश सभा संपन्न

अक्कलकोट ( विशेष प्रतिनिधी )
नऊ वर्ष भितीच्या वातावरणात घालवले आहे अजून थोडे दिवस थांबा,
मुस्लिमात मतभेद निर्माण करून निवडणूक जिंकण्यासाठी भाजप व आरएसएस देशात दंगली घडविण्याची शक्यता आहे.लोकसभेतील निवडणुका होईपर्यंत शांतता पाळा,सहा महिने थांबा,निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाही, कर्नाटकातील पराभव पचवण्यास भाजप व आरएसएस तयार नाही त्यांच्या पायातील वाळू घसरली आहे.त्यामुळे ते देशात दंगली घडवण्याच्या तयारीत असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी जाहीर सभेत घाणाघाती टीका केली.
अक्कलकोट एसटी स्टँड येथील मल्लिकार्जुन मंदिर येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आक्रोश जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.
तत्पूर्वी महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रदेशध्यक्षा रेखाताई ठाकूर, प्रदेश प्रभारी क्रांतिताई सावंत, राज्य उपाध्यक्ष अनिल जाधव, फारुख अहमदभाई, सोमनाथ साळुंखे,वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे श्रीशैल गायकवाड, इंद्रजीत घाटे,ज्योतिर्लिंग स्वामी उपस्थित होते.
पुढे बोलतांना बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की,भाजप सरकारने देशात विकास कुठेच केले नाही,फक्त मार्केटिंग केले आहे.विकास करण्याऐवजी भाजप आणि संघाला देशात दंगली घडविण्याचे आहे.त्यांना शांतता नको आहे.
“जर मी औरंगजेबाच्या मजारीवर गेलो नसतो, तर दंगली झाल्या असत्या” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. ‘फक्त मार्केटिंगच्या पलीकडे काहीच दिसतं नाही’ अशी टीका सुद्धा त्यांनी केली.
भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे. जन आक्रोश सभेत बोलताना ते म्हणाले की “10 वर्षांपासून भाजप आणि आरएसएसचे राज्य पाहतोय. या कालावधीत मॉब लिंचींग आणि ट्राईब नष्ट केले जात आहेत. फक्त मार्केटिंगच्या पलीकडे काहीच दिसतं नाही. शांततेच राज्य अशांततेत घालवण्याचे कामं केले आहे” “देशात पुन्हा दंगली होतील. हिंदू-मुस्लिम डिवाईड झाले, तर सरकार पुन्हा येईल असं वाटतय. गावागावात हिंदू मुलगी आणि मुस्लिम मुलगा शोधण्याचे काम सुरू आहे. त्याद्वारे लव्ह-जिहादचे नाव देण्याचे काम सुरू आहे” असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.“कर्नाटकमधील निकाल पचवता आला नाही. राज्यराज्यातील परिस्थिती वेगळी आहे. ती पाचवण्याची ताकद नाही म्हणून दंगली घडवण्याचा प्रयत्न आहे. एक ट्राईब दुसऱ्या ट्राईबशी लढवण्याचा काम दिसत आहे. शासनाचा सूड हा दंगलीचा सूड दिसतोय” असं प्रकाश आंबडेकर म्हणाले.

देवेंद्र फडणवीस विसरले की….

“मी आवाहन करतो की शांतता बाळगावी. काही समूहाने दहा वर्षे भीतीत घालवली. आता 6 महिने वाट पहा. सरकार कोणाचे येईल हे सांगू शकत नाही, पण मोदी पंतप्रधान होणार नाहीत. देवेंद्र फडणवीस विसरले की निवडून आलेला माणूस नोकर असतो, मतदार हा मालक असतो” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

….तर दंगली झाल्या असत्या

“राहुल गांधी यांनी स्वतःहून सांगितलं पाहिजे की, मला 4 महिने खासदारकी नको आहे. मी केरळातून पुन्हा निवडून येईन. मणिपूर, राजस्थान, छत्तीसगड येथे दंगली झाल्या. जर मी औरंगजेबाच्या मजारीवर गेलो नसतो, तर दंगली झाल्या असत्या” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

अजितदादांना तिहारमध्ये जायचं नव्हतं, म्हणून….

शरद पवार हे सिनियर, वयोवृद्ध पुढारी आहेत. मात्र, आता काय राहिले त्यांच्याकडे?. अजितदादांना तिहारमध्ये जायचे नसेल, तर त्यांना जाणे भाग आहे. शालिनीताईंच्या प्रश्नाचे खंडन अजितदादा यांनी केले नाही. हे उदाहरणं बोलकं आहे. त्यामुळे अमित शहा यांना यश का येते यातून कळते” असं प्रकाश आंबडेकर म्हणाले.

संभाजी भिडेवर कारवाई होणार नाही, कारण…..

“संभाजी भिडेवर कारवाई होणार नाही. कारण पंतप्रधान त्यांच्या पाया पडतात. त्यामुळे कोण पोलीस त्यांच्यावर कारवाई करणार? पंतप्रधानपदाचा चेहरा दाखवा हा खेळ चालू आहे. ही पद्धत चुकीची आहे, जो कोणी पंतप्रधान होणार आहे त्याला अधिक खासदारांचा पाठींबा असणे गरजेचे आहे. मात्र लोकांना पंतप्रधान निवडण्याचा प्रकार चुकीचा आहे. ही पद्धत अराजकतेकडे जाणारी पद्धत आहे” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.‘माळी, धनगर एकत्र बसतात का?’

INDIA तेलंगणा, आंध्रत जिंकू शकतील का?. सत्तेवर बसलेला माणूस सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करणार. मी मोदींच्या जागी असतो तर तेच केले असते. ज्याच्याकडे कुलूप असते, त्याची चावी त्याच्याकडेच असते. आपल्या देशाचे नाव भारत असले तरी त्याला युनियन म्हणतात. त्यामुळे त्यातला युनियन महत्वाचे आहे. माळी, धनगर एकत्र बसतात का? शिया -सुन्नी एकत्र बसतात का? त्यामुळे आपल्याला एकत्रपणे पुढे जायचे आहे” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
यावेळी रविराज पोटे, संदीप मंडीखांबे, , सिद्धार्थ बनसोडे, विशाल ठोबरे, नितीन शिवशरण, चंद्रकांत शिंगे, शाम बनासोडे, सूत्रसंचालन विनोद थोरे आभार शिलामानी बनसोडे यांनी मानले

पत्रकार परिषद मधील महत्त्वाचे मुद्दे

माध्यमांशी बोलताना त्यांनी मोदी यांच्या पंतप्रधानपदाबाबत मोठा दावा केला आहे. ते म्हणाले की, कर्नाटकचा निकाल त्यांना पचवता आलेला नाही.

✓ त्या निकालातून भाजपच्या पायाखालची वाळू घसरली आहे

✓ आगामी निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होणार नाहीत

✓ फक्त लोकसभेची निवडणूक होईपर्यंत सहन करा, त्यानंतर हळूहळू शांतता प्रस्थापित होईल,

✓ गेली १० वर्ष भाजप आणि आरएसएसचं राज्य आपण पाहतोय. या कालावधीमध्ये मॉब लिचिंगपासून एखादा ट्राईब नष्ट करणे असा कारभार सुरु झाला आहे.

✓ मनोहर भिडेंनी गांधींचा अपमान केला याचे दुःख ओबीसींना व्हायला हवे. टिळकांच्या काळातील सवर्णांची कॉंग्रेस, ओबीसींचे नेतृत्व निर्माण करुन त्यांच्या हातात सुत्र देण्याचे काम महात्मा गांधींनी केले याचा विसर आज कट्टर हिंदु म्हणवणा-या ओबीसींना पडला हे दुर्दैवी आहे

✓ आम्ही बदलाचं राजकारण केल म्हणून सांगत आहेत. मात्र ५०८ स्टेशनं नूतनीकरण करणार आहेत. जी रेल्वे स्टेशन आहेत, तेच दुरुस्त होणार आहे आणि त्याला २४ हजार कोटींचा खर्च होणार आहे, ज्या ठिकाणी स्टेशन नाही, तिथं स्टेशनं बांधायचं सोडून दिलं आहे

✓ मणिपूरसारखं शांततेच राज्य अशांततेत घालविण्यात आलं आहे

✓ देशभरामध्ये पुन्हा नव्याने दंगली होण्याची शक्यता आहे

✓ हिंदू-मुस्लिमांमध्ये विभाजन झालं तर आपलं सरकार पुन्हा येईल, असं भाजपला वाटतंय

✓ हिंदू मुलगा आणि मुस्लिम मुलगी किंवा मुस्लिम मुलगा आणि हिंदू मुलगी असा विवाह झाला असेल तर त्याचा शोध घेणं सुरू आहे आणि त्याला ‘लव्ह जिहाद’चं नाव दिलं जात आहे,

✓ आबू आझमींबद्दल मला काही वाटत नाही. पण, देवेंद्र फडणवीस हे विसरले आहेत की, निवडून आलेला माणूस हा नोकर असतो आणि मतदार हा मालक असतो. त्यामुळं मालकाने फडणवीस यांना कायदा करण्याचा अधिकार दिलेला नाही. आम्ही नोकर नाही, आम्ही हुकूमशाह आहोत, ही त्यांची वृत्ती आहे आणि ती लोकशाहीच्या माध्यमातून येत आहे.

✓ निवडून आणणाऱ्या लोकांनी लग्न कोणाशी करायचे, हे ठरवण्याचा अधिकार दिलेला नाही.

शरद पवार सीनियर व वयोवृद्ध नेते आहेत.पण आता त्यांच्याकडे काय उरले.अजित पवारांना जेलमध्ये जायचे नव्हते. म्हणून ते भाजप सोबत गेले आहे, आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर कोणाचं सरकार येईल, हे सांगू शकत नाही. मात्र, नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड प्रकाश आंबेडकर यांनी केला

यावेळी सलगर ग्रामपंचायत सदस्य अमोल पुटगे व चिक्कहळी ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ दसाडे यांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश केले

- Advertisement -spot_img

Related Articles

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img