ग्रामपंचायत गोगांव येथे
‘७७ वा’ स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा
अक्कलकोट( प्रतिनीधी )
ग्रामपंचायत गोगांव येथे भारतीय स्वातंत्र्य दिन व अमृत महोत्सवी वर्षाचा सांगता समारोप संपन्न झाला.
गोगांवचे सरपंच वनिता सुरवसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले कार्यक्रम अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण बिराजदार हे होते प्रमुख पाहुणे उपसरपंच कमलाकर सोनकांबळे, जेष्ठ सदस्य प्रदीप जगताप, ग्रामपंचायत सदस्या ललिता कलशेट्टी, ग्रामसेवक विक्रम घाटे,यांच्या उपस्थित घेण्यात आले यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन माझी सैनिक कल्लप्पा वाडे व तंटा मुक्त समिती अध्यक्ष सुर्यकांत जिरगे, यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत, ध्वज गीत घेण्यात आले, यावेळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
जिल्हा परिषद शाळा गोगांव येथे
स्वातंत्र्य दिन साजरा
जिल्हा परिषद शाळा गोगांव येथे जेष्ठ सदस्य प्रदीप जगताप यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच वनिता सुरवसे, उपसरपंच कमलाकर सोनकांबळे, ग्रामसेवक विक्रम घाटे, सदस्य लक्ष्मण बिराजदार, ललिता कलशेट्टी, महादेवी मुलगे, कलावती गायकवाड,मुख्याध्यापक दयानंद चोळे यांच्या उपस्थितीत घेण्यात आले. महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष कल्याणराव बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आले, ध्वज कट्टा पूजा शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष आकाश गायकवाड यांनी केले
ध्वजारोहण पोलीस पाटील चंद्रकला गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत, ध्वज गीत घेण्यात आले त्यांनतर
विद्यार्थ्यांनी विविध विषयावर भाषण केले. शालेय विद्यार्थ्यांना सिद्धार्थ सोशल फाउंडेशन अध्यक्ष कमलाकर सोनकांबळे, आरोग्य सेवक संजय सोनटक्के, सेवानिवृत्त पोलिस अधिकारी फकिरप्पा बनसोडे, स्वातंत्र्यसैनिक महादेव गायकवाड, पोलीस पाटील चंद्रकला गायकवाड यांच्या कडून खाऊ वाटप करण्यात आले
यावेळी अंगणवाडी सेविका तेजाबाई गुरव, भाग्यश्री सोनकवडे, आशा सेविका मधुमती गायकवाड, महादेव चव्हाण, चंद्रकांत पाटील, शीपुत्र जीरगे, बाबुलाल नदाफ, कल्लप्पा बनसोडे प्रदीप भास्कर जगताप, शरणप्पा कलशेट्टी, विजयकुमार गायकवाड, बाबूराव बिराजदार , मौला नदाफ, गावातील सर्व मान्यवर उपस्तिथ होते.
सूत्रसंचालन शंकर कारभारी सर यांनी केले आभार पूडलिक वाघमारे यांनी मानले.