24.1 C
New York
Thursday, July 25, 2024

Buy now

spot_img

चळवळीचा एकनिष्ठ झंझावात -पँथर राजा सरवदे ते लोकनेते राजाभाऊ सरवदे

चळवळीचा एकनिष्ठ झंझावात -पँथर राजा सरवदे ते लोकनेते राजाभाऊ सरवदे

 

सोलापूर जिल्ह्यात फुले शाहू आंबेडकरांचे विचार घेऊन सोलापूर शहर व जिल्ह्यात आंबेडकरी चळवळ उभे करणारे राजाभाऊ सरवदे यांचा जन्म मिलिंद नगर बुधवार पेठ येथे 26 ऑगस्ट 1958 रोजी सरवदे घराण्यात झाला राजाभाऊ सरवदे यांचे प्राथमिक शिक्षण मनपा शाळा क्रमांक 11 मधून झाले आणि महाविद्यालय शिक्षण जैन गुरुकुल आणि दयानंद कॉलेज येथे झाले सोलापूर जिल्हा हा मूळतः अनेक चळवळींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि या चळवळीतच राजाभाऊ सरवदे यांची जडणघडण झाली सन 1974 -75 साली जैन गुरुकुल ला असताना तेव्हाची जुनी अकरावी या महाविद्यालयीन वयातच चळवळींशी राजाभाऊंचा जवळचा संबंध आला त्यावेळी बिहारचे बेलचे प्रकरण, दलित अत्याचार ,वरळीची दंगल, या सर्व प्रश्नांवर मुंबईमध्ये 9 जुलै 1971 साली राजा ढाले, नामदेव ढसाळ ,भाई संगारे यांनी दलित पॅंथरची स्थापना केली आणि दलिताच्या अत्याचाराला आक्रमकपणे वाचा फोडली दलित पॅंथर वाऱ्यासारखी राज्यात व देशात पसरत असताना 1974 साली सोलापुरातील सुभाष चौक येथे त्या वेळचे तत्कालीन संचारचे संपादक श्री रंगा अण्णा वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली राजा ढाले आणि प्राध्यापक अरुण कांबळे यांची दलित पॅंथरची सभा झाली प्राध्यापक अरुण कांबळे यांचे आक्रमक भाषण झाले आणि ही सभा उधळण्याच्या प्रयत्नाने दंगा उसळला आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोवर दगडफेक करत असताना त्यावेळी राजाभाऊ सरवदे आणि राजा इंगळे यांनी तो फोटो हातात घेऊन बाबासाहेबांच्या फोटोला सुरक्षित ठिकाणी घेऊन गेले तिथूनच खऱ्या अर्थाने राजाभाऊंचा संघर्ष सुरू झाला होता त्यानंतर पँथर चा झंजावात फोफावत असताना सोलापूर जिल्ह्यामध्ये पॅंथर च नेतृत्व बी.के .सीतासावंत एस .आर गायकवाड सारखे वरिष्ठ व्यक्ती करत होते आणि दयानंद कॉलेजमधूनच के. पी. गायकवाड बी.के .सीतासावंत यांच्या बैठका चालायच्या महाविद्यालयातच 1977 साली राजाभाऊ सरवदे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टुडंट असोसिएशन ही संघटना कार्यान्वित करून विद्यार्थी आणि दलित चळवळीचे प्रश्न सोडवण्यास सुरुवात केली आणि महाविद्यालयीन वयातच राजाभाऊ सरवदे चळवळीशी एकरूप होत गेले पुढे 1975 ला शंकराव चव्हाण मुख्यमंत्री असताना दलित अत्याचार दलित प्रश्न यांच्यावर अतिशय आक्रमकपणे काम करणाऱ्या दलित पॅंथर चे विसर्जन करावे यासाठी राजा ढाले आणि नामदेव ढसाळ यांच्यावर दबाव आणला गेला दलित पॅंथर च विसर्जन झालं पुढे 1977 ला सोलापूर मध्ये मोठी दंगल उसळली दोन दिवस संचारबंदी होती आणि त्या दंगली मध्ये आंदोलन राजाभाऊ सरवदे यांनी आंदोलन यशस्वीपणे हाताळले व शहरात शांतता प्रस्थापित केली दलित पँथर च्या विसर्जना नंतर पुढे दुसऱ्या टप्प्यामध्ये रामदास आठवले ,अविनाश मातेकर, गंगाधर गाडे ,प्रीतमकुमार शेवगावकर, यांची औरंगाबाद येथे बैठक होऊन वाढत चाललेल्या दलित अत्याचार आणि दलित प्रश्नांवर भारतीय दलित पॅंथर ची स्थापना झाली आणि राजाभाऊ सरवदे यांनी रामदासजी आठवले यांच्या समवेत भारतीय दलित पॅंथर च काम सुरू केलं रामदासजी आठवले आणि राजाभाऊ सरवदे यांचा संबंध भारतीय दलित पॅंथर मुळेच आला 1979 ला अरुण कांबळे अध्यक्ष असलेल्या भारतीय दलित पॅंथरचे रामदास आठवले हे संघटक होते ते सोलापूरला बैठकीला आले असता खणी येथे बैठक संपन्न झाली या बैठकीला राजाभाऊ सरवदे उपस्थित होते तेव्हाच्या बैठका या कार्यकर्त्यांच्या घरात महाविद्यालय कॉलेज वस्तीगृह येथे चालायच्या सोलापुरातील दयानंद महाविद्यालयातील एस. के .कांबळे यांच्या रूमवर रामदास आठवले राहायचे बैठका घ्यायचे त्यांच्या समवेत राजाभाऊ सरवदे असायचे आणि सोलापूर जिल्ह्यातील प्रश्नांवर वाचा फुटायची संघटने बाबत निर्णय व्हायचे आक्रमक शैली अभ्यासू वृत्ती आणि कुशल संघटक हे गुण रामदास आठवले यांनी राजाभाऊ सरवदे यांच्यात आधीपासूनच ओळखले होते सोलापूर शहराचा विचार करायचा झाल्यास 1982 पासून शहरात बुधवार पेठ आताचे मिलिंद नगर ,थोरला राजवाडा दलित विरुद्ध पत्रा तालीम हा संघर्ष नेहमी चालायचा तो संघर्ष मिटवण्याचे काम राजाभाऊ सरवदे यांनी केले 1978 ला मराठवाडा नामांतराचा ठराव झाला आणि मराठवाड्यासह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात दंगली आणि दलितांच्या अन्यायात मोठ्या प्रमाणात वाढ झाली दलितांची घरे जाळण्याचे प्रकार देखील झाले त्यावेळी अनेक आंदोलनामध्ये राजाभाऊंनी भाग घेतला मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मिळावे यासाठी राजाभाऊ सरवदे यांनी तब्बल 26 हजार मोर्चे काढले हा एक विक्रमच म्हणावा लागेल राजाभाऊ सरवदे हे रस्त्याच्या संघर्षातून तयार झालेलं नेतृत्व आहे सोलापूर शहरातील आताचे मिलिंद नगर बुधवार पेठ आहे त्याला त्याला 1927 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महार -मांग परिषदेमध्ये थोरला राजवाडा असे नाव दिले त्यामुळे या वस्तीला जोपासण्याचे काम राजाभाऊ सरवदे यांनी आजतागायत केल आहे
1981 च्या काळात राजाभाऊ सरवदे हे तहसीलदार डी वाय एस पी ची एमपीएससी प्रीमियम परीक्षा पास झाले होते महाविद्यालयीन शिक्षणानंतर त्यांनी कृषी विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र वित्तीय महामंडळ मुख्य कार्यालय मुंबई येथे 89 दिवस नोकरी देखील केली परंतु आंबेडकरी बाणा रक्तातच असल्याने त्यांनी आपले पुढचे आयुष्य हे समाजसेवेला आणि चळवळीला अर्पण केले 31 ऑगस्ट 1982 रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर बाबासाहेब भोसले यांची सभा राजाभाऊ सरवदे आणि सहकारी यांनी उधळून लावली त्याला कारण होते नामांतर लढा दलित अत्याचार याच प्रश्नावर 1982 सालची जिल्हा नियोजनाची बैठक देखील राजाभाऊ सरवदे यांनी उधळून लावली होती ते 1989 च्या दुसऱ्या भारतीय दलित पॅंथरच्या अधिवेशनाचे अध्यक्ष देखील होते नुसती चळवळ करून पोट भागत नाही त्यासाठी कार्यकर्त्याने उद्योग व्यवसाय उभारावा हे त्यांचे प्रामाणिक मत यासाठी 1986 रोजी त्यांनी टेम्पो घेतली टेम्पो ते आताचा मध्यवर्ती भागातील असणारा टू स्टार राज-हाईट्स चा प्रोजेक्ट, हॉटेल त्यांच्या संघर्षाची कहाणी सांगतो चळवळ आणि पक्षातील काम यात फरक असतो असे ते मानतात एक पक्ष एक नेता एक झेंडा हे सूत्र त्यांनी आयुष्यभर जोपासले आपल्या नेत्याचा शब्द कधी खाली पडू दिला नाही पक्ष, नेतृत्व, चळवळ बदनाम होईल असे कृत्य त्यांच्या हातून कधीच घडले नाही आपला नेता सांगेल ते धोरण ते बांधतील तेच तोरण या वृत्तीने त्यांनी 46 वर्षे रामदास आठवले यांच्या सोबत चळवळीचा, रिपब्लिकन पक्षाचं काम केलं 1999 ला उत्तर सोलापूर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी आपल्या नेत्याच्या आग्रहास्तर विधानसभा देखील लढवली त्यावेळी राष्ट्रवादी रिपब्लिकन पक्षाची युती असताना देखील लक्ष्मण माने यांच्या बंडखोरीचा सामना पक्षाला करावा लागला पण राजाभाऊ सरवदे यांनी निकराचा लढा दिला 1 ऑगस्ट 2004 साली सोलापूर विद्यापीठ स्थापन झाल्यानंतर 2017 साली त्यांनी सिनेट निवडणूक लढवली आणि ते विक्रमी मताने निवडून आले आताच्या विद्यापीठांमध्ये जे अमुलाग्र बदल घडत आहेत त्यात राजाभाऊ सरवदे यांचा वाटा निश्चितच आहे संघर्षातून तयार झालेले हे नेतृत्व कधीच कुठल्या आमिषाला बळी पडले नाही 2014 ला सोलापुरात लोकसभेला, विधानसभेला जो बदल घडून आला त्यात राजाभाऊ सरवदे यांचा वाटा मोठा आहे चळवळीशी एकनिष्ठ आणि प्रामाणिकपणा यामुळे 30 ऑगस्ट 2019 रोजी रामदासजी आठवले यांनी महायुतीच्या माध्यमातून राज्यमंत्री दर्जा असलेल्या महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाची सूत्रे राजाभाऊ सरवदे यांच्याकडे दिली .या संधीचं सोनं करत मोडकळीस आलेल्या महामंडळाला राजाभाऊ सरवदे यांनी नव संजीवनी दिली अनेक क्रांतिकारी निर्णय घेऊन राज्यातील मागासवर्गीय तरुणांना जवळजवळ शंभर कोटी रुपयाचे कर्ज वाटप करून कार्यकर्त्यांना तरुणांना स्वावलंबी होण्यास मदत केली शिक्षणामुळे प्रगती होते आणि माणूस घडतो पर्यायाने समाज घडतो म्हणून भोगाव येथे नालंदा शैक्षणिक संस्थेची उभारणी केली तेथे अनेक विद्यार्थी शिक्षण घेतात तेथेच वस्तीगृहाची स्थापना केली संपूर्ण महाराष्ट्र हादरवणाऱ्या खैरलांजी घटनेच्या वेळी आणि त्यानंतर उद्भवलेल्या आंदोलनात राजाभाऊ सरवदे यांनी सोलापूर शहरात समाजाचे रक्षक म्हणून भूमिका अदा केली ज्यावेळी अनेक आंबेडकरी तरुणांवर गुन्हे दाखल होत असताना राजाभाऊ सरवदे हे प्रशासनापुढे एकटे उभे ठाकले आणि परिस्थिती मोठ्या चालाकीने हाताळली सोलापूर शहराला किंबहुना मिलिंद नगरला गुन्हेगारी वाद विवाद यांच्या मधून काढून प्रगतीपथावर नेण्याचे श्रेय राजाभाऊ सरवदे यांना जातं रिपब्लिकन पक्षात काम करत असताना सोलापूर जिल्ह्यात त्यांनी अनेक तरुणांना मोठं केलं स्वबळावर जिल्ह्यात नगरसेवक ,पंचायत समिती ,सदस्य ग्रामपंचायत सदस्य ,सरपंच ,उपसरपंच निवडून आणले ज्या पक्षासोबत युती असेल त्या युतीचं काम त्यांनी प्रामाणिकपणे केलेल आहे आणि त्याचे फायदे देखील आज जिल्ह्यात पाहायला मिळतात आज प्रत्येक गावामध्ये वाड्या वस्त्या मध्ये पुढारी नेता होण्याचं जणू एक पेवच फुटले आहे लवकरात लवकर लोकांनी नेता म्हणावं अशी होडच लागलेली आहे पण संघर्ष आणि संयम हे राजाभाऊ यांच्याकडून कडून शिकल पाहिजे .नेता होता येत नसतं लोकांनी नेता मानलं पाहिजे आणि त्यासाठी प्रखर संघर्ष त्याग प्रामाणिकपणा आणि लोकांच समाधान हे सूत्र आहे आणि हे राजाभाऊंनी नेहमी अंगीकारले आहे वरून ताठर दिसणारा हा मनुष्य समाजावर आपल्या कार्यकर्त्यावर तेवढेच निर्मळ प्रेम करतो आज जिल्ह्यामध्ये दशकातील अनेक नेत्यांचा विचार करायचा झाल्यास त्यामध्ये राजाभाऊ सरवदे यांचं नाव निश्चितच कोरल जाईल नुसत्या नावानेच काम होतात अशी ओळख असलेला दमदार व्यक्तिमत्व म्हणजे राजाभाऊ सरवदे काम कोणतेही असो ते राजाभाऊ सरवदे यांनी केलं नाही असं कधीच झालं नाही अनेक जाती -धर्माचे, पक्षाचे, संघटनेचे लोक राजाभाऊंकडे कामे घेऊन येतात आणि समाधानी होऊन जातात हीच राजाभाऊ सरवदे यांची ओळख आहे पक्ष चळवळ याच्याशी राजाभाऊ सरवदे यांनी कधीच तडजोड केली नाही अन्यथा या उंचीचा नेता कधीच आमदार, खासदार, मंत्री म्हणून दिसला असता सोलापूर जिल्ह्यात आंबेडकर चळवळीचा पोलादी पुरुष म्हणून त्यांची ओळख आहे पण आपला आक्रमकपणा प्रामाणिकपणा एकनिष्ठता यामुळे राजाभाऊंचा वेगळेपण दिसून येतं आणि शहर जिल्ह्यात तसीच त्यांची ओळख आहे आक्रमक संघर्षातून तयार झालेल नेतृत्व कार्यकर्त्यांना ताकद बळ देण्याची वृत्ती नेहमी समाजाच्या हिताचा विचार यामुळे राजाभाऊ सरवदे हे पँथरकालीन वृद्धांपासून ते आजकालच्या फेसबुक इंस्टाग्राम च्या जमान्यातील इन्स्टंट तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलेले आहेत ते नेहमी नवीन जगाशी अपडेट असतात नवीन गोष्टी शिकून घेत असतात त्यामुळे त्यांची शैली ही वेगळीच आहे राजाभाऊ सरवदे हे आपल्या खास केस रचनेमुळे तसेच पोशाखमुळे देखील शहर जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहेत रुबाबदार व्यक्तिमत्व, बोलण्याची लखब अनेकांची जिव्हाळ्याचे संबंध यामुळे त्यांच्याकडे येणाऱ्याची रिघ लागलेली असते .परिस्थिती मुळे स्वतःला वकील होता आलं नाही म्हणून त्यांनी आपल्या एका मुलाला वकील केलं “वकील झालो नाही पण वकिलाचा बाप झालो “असे ते आवर्जून सांगतात पुढे त्यांचा वारसा अनेक सामाजिक उपक्रमातून त्यांचे दुसरे सुपुत्र सुशील सरवदे यांनी सुरू ठेवल्याचे दिसून येते आज त्यांचा वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या कार्याला दिलेला हा ओझरता हा उजाळा सर्व मोठी माणसे नेहमी वृद्ध होत असतात पण राजाभाऊ सरवदे यांच्याकडे पाहिले तर आपल्याला ते प्रत्येक वाढदिवसाला चिरतरुण होत आहेत की काय असा भास होतो यामागे त्यांचा निर्व्यसनी स्वभाव व्यायामाची आवड दररोज सकाळी चालणे आधी होय. अशा या चिरतरुण ,दमदार ,दिमागदार रुबाबदार,दमदार आणि संघर्षशील नेत्यास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
प्रा.राहुल रुही

- Advertisement -spot_img

Related Articles

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img