16.5 C
New York
Monday, September 30, 2024

Buy now

spot_img

ग्रामपंचायत गोगांवच्या वतीने स्वच्छता हीच सेवा :एक दिवस – एक तास! हे अभियाना संपन्न

ग्रामपंचायत गोगांवच्या वतीने स्वच्छता हीच सेवा :एक दिवस – एक तास! हे अभियाना संपन्न

अक्कलकोट ( प्रतिनीधी )
स्वच्छ भारत हीच आपल्या देशाने महात्मा गांधीजी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अर्पण केलेली सर्वोत्तम श्रद्धांजली ठरेल.

हे ध्येय साध्य करण्यासाठी रविवार दि १ आॕक्टोंबर रोजी सकाळी चावडी समोर व अंगणवाडी समोर स्वच्छता अभियान राबविण्यात आले यावेळी उपसरपंच कमलाकर सोनकांबळे, भाजपा तालुका उपाध्यक्ष प्रदीप जगताप, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नितीन चव्हाण, यांच्या उपस्थितीत स्वच्छता हीच सेवा एक दिवस – एक तास गावासाठी उपक्रम राबविण्यात आले
पंतप्रधान मोदी यांचे अवहानानुसार स्वच्छता मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन जिथे कुठे असू तिथे स्वच्छता, साफ-सफाई करून या अभियानात भाग घेऊन संपूर्ण परीसर स्वच्छता पुर्ण केली . आपण आज जे स्वच्छतेचे काम केले आहे त्या मुळे परीसरातील नागरीक व दुकानदार यांनी दररोज आपला परीसर स्वच्छ ठेवावा असे आवाहन उपसरपंच कमलाकर सोनकांबळे. यांनी केले .
यावेळी कल्याणराव बिराजदार , सुर्यकांत जिरगे, अपाशा मुळजे, धोडेशा गुंजोटी, अंगणवाडी सेविका तेजाबाई गुरव, भाग्यश्री सोनकवडे , विजयकुमार गायकवाड प्रदीप जगताप, जगनाथ सुरवसे, यासह ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते

- Advertisement -spot_img

Related Articles

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img