19.6 C
New York
Sunday, September 15, 2024

Buy now

spot_img

सदस्य गैरहजर नव्हे तर मागासवर्गीय गोरखनाथ धोडमनीला अध्यक्ष केल्यामुळे हे गोळा उठले-सैदप्पा झळकी

सदस्य गैरहजर नव्हे तर मागासवर्गीय गोरखनाथ धोडमनीला अध्यक्ष केल्यामुळे हे गोळा उठले-सैदप्पा झळकी

अक्कलकोट(प्रतिनिधी) दि-अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील जि प प्रा मराठी शाळेचे व्यवस्थापन समिती कायदेशीर असून सतत दोन तीन दिवस बैठक घेवून शेवटी केंद्र प्रमुख सुरेश शटगार यांच्या उपस्थितीत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदी सर्वानुमते निवड करण्यात आली असून गावातील काही जातीयवादी गांवगुंडानी हणमंत कलशेट्टी यांना पुढे करुन खोटी बातमी लावत आहे.असे मत रिपाइंचे सैदप्पा झळकी यांनी आमच्या प्रतिनिधीसी बोलतांना व्यक्त केली आहे.
काही दिवसांपूर्वी दुधनी मराठी शाळेत ही निवड प्रक्रिया सर्व कायदेशीररित्या निवड होऊन त्यात अध्यक्ष म्हणून गोरखनाथ धोडमनी व उपाध्यक्ष म्हणून हणमंत कलशेट्टी यांची सर्वानुमते निवड झाली होती.त्यानिवडप्रक्रियेत स्वत:हणमंत कलशेट्टी सह सर्व उपस्थित सदस्य यांनी सह्या केली.नंतर तत्कालीन केंद्र प्रमुख सुरेश शटगार यांनी शांततेत व सुव्यवस्थित निवड प्रक्रिय चालून दिलल्याबद्दल सर्वांचे कौतुक करून अभिनंदन केले.याप्रसंगातील व्हिडिओ आणी फोटो संग़्रहीत केली आहे.यात काही गैरव्यवहार झाले नाही.यात कोणी राजकारण करू नये केवळ मागासवर्गीय सदस्य अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जातीय तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न केल्यास त्याच्या विरोध दलित अत्याचार प्रतिबंधक कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हा अधिकारी व अनुसूचित जाती जमाती आयोगा कडे करावे लागेल याची दखल जातीवादी लोकांनी घ्यावे अन्यथा याचे मोठे परीणाम भोगावे लागेल.असे वक्तव्य रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जेष्ठ सदस्य सैदप्पा झळकी यांनी केली आहे.

- Advertisement -spot_img

Related Articles

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img