नागणसुर कन्नड मुली शाळेतील विद्यार्थिनींची राष्ट्रीय पातळीवर मजल
दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय होरनाडू कन्नड बालसाहित्य संमेलनात सांस्कृतिक कार्यक्रमात वचन नृत्य सादरीकरण करण्यासाठी 16 विद्यार्थिनींची निवड
अक्कलकोट:-
नागणसुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळेतील 16 विद्यार्थिनींची 15 नोव्हेंबर 2023 रोजी भारत देशाचे राजधानी दिल्ली येथील सत्यसाई ऑडिटोरियम येथे संपन्न होणाऱ्या प्रथम होरनाडू राष्ट्रीय कन्नड बालसाहित्य संमेलनात सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत वचन नृत्य सादरीकरणासाठी निवड झाल्याचे माहिती कर्नाटक राज्य बालसाहित्य परिषदेचे राज्याध्यक्ष अशोक सी.एन आणि दिल्ली घटकाचे अध्यक्ष अरविंद बी.जे तसेच राज्य सचिव अरुण यांनी कळविले आहे.
कर्नाटक राज्य बालसाहित्य परिषद चन्नरायपट्टण आणि कर्नाटक राज्य बालसाहित्य परिषद दिल्ली घटक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रथम राष्ट्रीय होरनाडू कन्नड बालसाहित्य संमेलन 15 नोव्हेंबर 2023 रोजी दिल्ली येथील लोधी रस्ता सत्यसाई ऑडीटोरीयम येथे संपन्न होणार असून राष्ट्रीय संमेलनात पहिल्यांदाच अक्कलकोट तालुक्यातील नागणसुर जिल्हा परिषद कन्नड मुली शाळेतील 16 विद्यार्थीनिंची सांस्कृतिक कार्यक्रमांत वचन नृत्य सादरीकरण करण्यासाठी निवड झाल्याने सीमावर्ती भागातील सर्व स्तरातून कौतुक होत असून अभिनंदनाच्या वर्षाव होत आहे.
राष्ट्रीय संमेलनात सांस्कृतिक वचन नृत्य सादरीकरणासाठी निवड झालेल्या विद्यार्थिनीना सांस्कृतिक विभाग प्रमुख शरणप्पा फुलारी,मल्लप्पा कवठे, दौलप्पा किरनळ्ळी यांच्या मार्गदर्शन मिळाले आहे.निवड झालेल्या विद्यार्थिनी आणि मार्गदर्शक शिक्षकांच्या सोलापूर जिल्ह्याचे खासदार डॉ.जयसिद्धेश्र्वर महास्वामिजी,आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे ,जिल्हा परिषदेचे सीईओ मनीषा अव्हाळे,प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले,माध्यमिक शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे, गटशिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे,विस्तार अधिकारी भीमाशंकर वाले,दयानंद कवडे,रतीलाल भुसे,केंद्रप्रमुख गुरुनाथ नरूणे,केंद्रीय मुख्याध्यापक विद्याधर गुरव,गावचे सरपंच सुनीता महादेव चव्हाण,उपसरपंच धनराज धानशेट्टी,सर्व सदस्य ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदानंद मठपती,उपाध्यक्ष गजानंद रेवी,सर्व सदस्य मुख्याध्यापक मल्लप्पा कवठे,सर्व शिक्षकवृंद,पालक,ग्रामस्थ अभिनंदन करून संमलेनासाठी शुभेच्छा दिले आहे.
राष्ट्रीय बालसाहित्य संमेलन सांस्कृतिक कार्यक्रमासाठी निवड झालेली विद्यार्थिनी
सारिका नरुणे,दिपाली बिरादार,अंबिका भोसगी,वैभवी गोपगोंडा,साक्षी रेवी,स्वाती नप्याटी, लक्ष्मी बुधाळे, वर्षा माशाळे, साक्षी गंगोंडा,ऐश्वर्या वाडेद,गंगोत्री मठपती,धनश्री सक्करगी,अंबिका मायनाळे,प्रकृती शिवमूर्ती, अव्वम्मा हाळतोट,ज्योती प्याटी यांची निवड झाली