24.2 C
New York
Sunday, September 15, 2024

Buy now

spot_img

आमदार सचिन कल्याणशेट्टी निवडणुकीत दिलेले शब्द पाळले, दायित्व मंजूर करावे असे अधिवेशन केले मागणी

अक्कलकोट व दक्षिण सोलापूरला सोडण्यात आले. गेल्या २७ वर्षानंतर पाणी

आमदार सचिन कल्याणशेट्टी निवडणुकीत दिलेले शब्द पाळले, दायित्व मंजूर करावे असे अधिवेशन केले मागणी

अक्कलकोट : दि.२०, (यश सिध्दी न्युज )
उजनीचे पाणी एकरुख उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून अक्कलकोट व दक्षिण सोलापूरला सोडण्यात आले. गेल्या २७ वर्षानंतर पाणी मिळाले ही खेदाची बाब असताना कॉंग्रेसकडून मात्र फुकटचे श्रेय लाटण्या करिता सवंग प्रसिध्दीसाठी मतदार संघात लावण्यात आलेल्या डिजिटल बोर्डबाबत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी भर विधानसभेच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या अंतीम आठवड्यात शेवटच्या दिवशी खिल्ली उडवत खरपूस समाचार घेअतले.*

उजनीच्या पाण्याचे माजी लोकप्रतिनिधी हे श्रेय घेत असून, मतदार संघातील गावे, वाड्या, वस्त्या, तांड्यावर पोस्टर बाजी करीत असल्याबद्दल भर विधानसभेत खरपूस समाचार आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी घेतला. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी विधानसभेत उजनीच्या पाण्याबाबत इतिहास अत्यंत जबाबदारीने, नेटकेपणाने सादर केले. याबाबत मतदार संघातून स्वागत व कौतुक होत आहे.

आमदार कल्याणशेट्टी यांनी अधिवेशनाचा अंतिम आठवडा हा विरोधाकांना सरकारच्या कामकाजावर बोट ठेवण्याची संधी असताना ते पाहायला मिळाले नसल्याचे सांगून, अधिवेशन काळातील ९० टक्के विषय हे उप मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या खात्या बाबतच होती असे सांगून आमदार कल्याणशेट्टी यांनी उजनीचे पाणी एकरुख उपसा सिंचन योजनेबाबत सांगताना म्हणाले, कॉंग्रेस सत्तेवर असताना काय केले याचा पाढा त्यांनी वाचला. कॉंग्रस पक्षाची श्रेय घेण्याची परंपरा कायम आहे असे सांगून एकरुख योजनेला सन १९९६ ला मंजुरी मिळाली. २७ वर्षांनी न्याय मिळाला.

सन २०१८ ला राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस हे होते. त्या काळात या एकरुख सिंचन योजनेला ४२५ कोटी रुपयाला सुप्रमा देऊन प्रत्यक्षात कामाला गती मिळाल्याचे सांगून, विरोधी पक्ष सत्तेत असताना सन १९९९ ते २००४ या काळात, कृष्ण कोरे महामंडळाच्या उपाध्यक्ष पदाच्या काळात, ५ वर्षात केवळ एवढ्या मोठ्या योजनेला ५ कोटी रुपये निधी देण्यात आला.

सन २००४ ते २००९ याकाळात मंत्रिपद असताना केवळ रुपये २२ कोटीचा निधी मिळाल्याचे सांगून, शेजारच्या तालुक्याच्या आमदारांनी मात्र त्यांच्या मतदार संघातील सीना-माढा प्रकल्पाला १५० कोटी रुपये मिळवून सदरचा प्रकल्प ९ वर्षात पूर्ण केले. मात्र अक्कलकोट तालुका २७ वर्षापासून उजनीच्या पाण्याची वाट पाहत राहिला हे कॉंग्रेस पक्षाचे पाप आहे.

त्या काळातील सरकारने पूतनामावशीचे प्रेम दिले. आत्ता मात्र २७ वर्षानंतर पाणी मिळाले म्हणून गावभर डिजिटल लावल्याची खिल्ली आमदार सचिन काल्यानाशेत्ती यांनी उडवत, शर्मेने मान खाली घालण्याचे वेळ कॉंग्रेसवाले आणल्याचा भीमटोला आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी लगावले.

ना.एकनाथ शिंदे, ना.देवेंद्र फडणवीस, ना.अजित पवार यांच्याकडून अक्कलकोट मतदार संघाच्या विकासाकरिता भरघोष निधी विविध विभागाच्या माध्यमातून मिळत असल्याने मतदार संघाचा २७ वर्षाचा अनुशेष भरून काढला जात आहे.

या बरोबरच आमदार कल्याणशेट्टी यांनी एकरुख सिंचन योजनेच्या कालवा कामासाठी दायित्व मंजूर करावे, याबरोबरच देगांव एक्सप्रेस कालवा या महत्त्वपूर्ण योजने करिता उर्वरित कामंकारीतांची निविदा मंजूर करण्यात यावी असे सांगून पीएम कृषी पिक योजनेचे निकष बदलावेत यासह होत असलेल्या धर्मांतर बाबाताची चौकशी व याकरिता होत असलेले फंडिंग बाबतचे चौकशी करण्यात यावी. या विविध मांडण्यात आलेल्या विषयावरून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

चौकट :
मतदार संघाकरिता तळमळ :
अक्कलकोट विधानसभा मतदार संघातील विविध विषय सभागृहात मांडत असताना तालिका अध्यक्षांनी दिलेला वेळ पुरत नव्हता, मात्र आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी आपल्या कौशल्याच्या माध्यमातून अध्यक्षाकडून वेळ वाढवून घेऊन मतदार संघातील सर्व ते विषय सभागृहात मांडण्यात त्यांना यश आले.

- Advertisement -spot_img

Related Articles

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img