23.4 C
New York
Thursday, July 25, 2024

Buy now

spot_img

सर्व योजनांचा लाभ शेवटच्या टोकावरच्या नागरिकांनी घ्यावा : आमदार सचिन कल्याणशेट्टी

आपला संकल्प विकसित भारत’ या विकास रथयात्रेचा शुभारंभ

सर्व योजनांचा लाभ शेवटच्या टोकावरच्या नागरिकांनी घ्यावा, : आमदार सचिन कल्याणशेट्टी

अक्कलकोट, (प्रतिनीधी) दि. १८- केंद्र सरकारने मागील दहा वर्षांत सुरू केलेल्या शेतकरी, शेतमजूर व विविध लाभार्थ्यांच्या अनेक विकासाच्या योजना आहेत. त्या सर्व योजनांचा लाभ शेवटच्या टोकावरच्या नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले.

बोरगांव देशमुख येथे केंद्र सरकारच्या ‘आपला संकल्प विकसित भारत’ या विकास रथयात्रेचा शुभारंभ आ.कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते गावकर्‍यांना संबोधित करताना बोलत होते.यावेळी सरपंच विद्या श्याम स्वामी, माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे, भाजपचे तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड ,विधानसभा प्रमुख राजकुमार झिंगाडे, प्रदीप पाटील , प्रदीप जगताप, श्रीमंत कुंटोजी, राजकुमार बंदीछोडे,धनराज बिराजदार , विठ्ठल कत्ते, मल्लीनाथ उनदे, राजशेखर किवडे ,शशिकांत पाटील , महेश कणमुसे, प्रकाश पोमाजी, श्याम बाबर, लिंगराज मठपती, इरय्या स्वामी व अधिकारी वर्ग, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, सोसायटी चेअरमन, तंटामुक्त अध्यक्ष, माजी सरपंच उपस्थित होते.
आपला संकल्प विकसित भारत रथयात्रा संपूर्ण भारतात केंद्र सरकारच्या अंमलात असलेल्या विविध विकास कामांची आणि योजनांची माहिती गावागावात पोचवत असून या योजनांची माहिती गावकर्‍यांनी करून घेणे आवश्यक आहे. केंद्र सरकारच्या या विविध योजनांमध्ये शेतकर्‍यांसाठी शेती निगडित, नागरिकांसाठी विविध योजना असून मोदी सरकार हे शेतकर्‍यांच्या हितासाठी काम करत आहे. देशातील रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यात आले आहे. तसेच देशातील गरिबीही मोदी सरकार आल्यापासून मोठ्या प्रमाणात दूर झाली आहे, असे सांगून आ.कल्याणशेट्टी म्हणाले, विधानसभेसाठी शेतीच्या नुकसान भरपाईसाठी कोट्यावधी रुपये मंजूर करून घेतले असल्याचे सांगितले.

याप्रसंगी चन्नप्पा कामशेटटी, बसवराज कलशेटटी, मौला मुजावर, श्याम स्वामी, चंद्रकांत सुरवसे, विरभद्र स्वामी, मौलाली पठाण, दत्ताअण्णा जिरगे, गुंडप्पा गावडे, सिद्धाराम किवडे, मल्लिनाथ फुलारी, अभिजित पाटील, श्रीशैल जिरगे, श्रीकांत जिरगे, अविनाश बंदीछोडे, यशवंतराव बिराजदार, अर्जुन धरगुडे आदि ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते.

चौकट —-
महाराष्ट्र सरकारसुद्धा शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून महाराष्ट्र सरकारच्या योजनांचीही माहिती नागरिकांनी करून घेऊन त्यांचाही लाभ घ्यावा.नागरिकांनी अशा योजनांची माहिती घेऊन सरकार हे आपल्यासाठी काम करीत हे समजून घेणे आवश्यक आहे, असे आ. कल्याणशेट्टी यांनी सांगितले.

- Advertisement -spot_img

Related Articles

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img