5.9 C
New York
Saturday, February 24, 2024

Buy now

स्त्री मुक्ती दिन व ख्रिसमस नाताळ निमित्त अक्कलकोट येथे वंचित वतीने विविध उपक्रम

स्त्री मुक्ती दिन व ख्रिसमस नाताळ निमित्त अक्कलकोट येथे वंचित वतीने विविध उपक्रम

 

महिला सफाई कामगारांना साडी वाटप करून सन्मान करण्यात आला

अक्कलकोट ( प्रतिनीधी )
वंचित बहुजन आघाडी अक्कलकोटच्या वतीने स्त्री मुक्ती दिवस आणि क्रिसमस नाताळ सणाच्या निमित्ताने वंचित बहुजन आघाडी सोलापूर जिल्हा अध्यक्ष श्रीशैल गायकवाड आणि दक्षिण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश स्वामी यांच्या हस्ते शहरातील सफाई महिला कर्मचाऱ्यांना साडी वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927 रोजी महाड मुक्कामी मनुस्मृति दहन केले, ही घटना भारतीय स्त्रीमुक्तीची पहाट होती, आजही या दिनाचे महत्त्व कमी झालेले नाही, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात स्त्री मुक्ती दिन साजरा करण्यात आला

25 डिसेंबर ख्रिश्चन धर्म संस्थापक येशू ख्रिस्त यांचा जन्मदिवस हा जगभरात अतिशय आनंदात साजरा केला जातो

वंचित बहुजन आघाडी अक्कलकोटच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अक्कलकोट तालुका अध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तालुका महासचिव नागेश हरवाळकर यांच्या आयोजनाखाली येशू ख्रिस्त यांचा जन्मदिवस अक्कलकोट येथे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते केक कापून नाताळ सण साजरा करण्यात आला

अक्कलकोट नगरपालिका येथील आपलं शहर व परिसर स्वच्छ ठेवणाऱ्या व आपल्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या महिला सफाई कर्मचारी यांना शाल, गुच्छ, साडी असे मानसन्मान देऊन त्यांचा गौरव करण्यात आला

त्याप्रसंगी अक्कलकोट तालुका अध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे, जिल्हा संघटक देवानंद अस्वले, वंचित कामगार संघटना तालुका अध्यक्ष सिद्धार्थ बनसोडे, तालुका महासचिव नागेश हरवाळकर, शहर अध्यक्ष विशाल ठोंबरे, सोलापूर जिल्हा युवक उपाध्यक्ष प्रकाश शिंदे, महासचिव भारत देडे, श्याम बनसोडे, सम्यक विद्यार्थी आंदोलन मा.तालुका अध्यक्ष रविराज पोटे, संकेत शिरसे, गंगाराम गायकवाड, रतन इंगळे, सुनील शिंगे, संतोष घाटगे, अमोल गायकवाड, रोहित गायकवाड, सनी गायकवाड, हनुमंत जाधव, गंगाराम वाघमारे, साळुंखे अण्णा, विलास शिंदे, निमगावचे उत्तम आणि गौतम आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

- Advertisement -spot_img

Related Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest Articles