शिर्डी व सोलापुर लोकसभा मतदारसंघ महायुतीचे घटक पक्ष रिपाईला सोडावे : अविनाश मडिखांबे
अक्कलकोट (प्रतिनीधी)
शिर्डी व सोलापुर लोकसभा मतदारसंघ महायुतीचे घटक पक्ष रिपाईला सोडावे या बाबत निवेदन महाराष्ट्रच्या उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना देण्यात आले ,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट हा महायुतीचे भाग असून महाराष्ट्रसह देश पातळीवर रिपब्लिकन पक्ष भाजपला मदत करत असून सोलापुर लोकसभा मतदारसंघ हा रिपब्लिकन पक्षचा बल्लेकिल्ला आहे आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती साठी राखीव असून रिपाई प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांना मानणारा सर्व जाती धर्माचा मोठा वर्ग असून गेल्या पन्नास वर्षांपासून आंबेडकरी चळवळीचे मोठे काम त्यांच्या हातून घडत आहे महायुतीचे काळात महात्मा फुले मागसवर्ग आर्थिक विकास महामंडळाच्या अतिशय यशस्वीपणे अध्यक्ष पद भूषविलेले आहे अहिल्याबाई होळकर सोलापुर विद्यापीठचे सिनेट सदस्य पदी ते गेले दोन टर्म सातत्याने निवडून येत आहेत त्यांना चळवळीचा प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे जिल्याच्या अकरा तालुक्यात राजाभाऊ सरवदे याचे मोठे काम असून महायुतीला ही जागा राजाभाऊ सरवदे यांच्या रूपानी दिली तर जिंकण्यासाठी अतिशय सोईस्कर होईल आपण या सर्व बाबींचा विचार करून सोलापूर लोकसभा मतदारसंघ रिपब्लिकन पक्षाला सोडण्यात यावे अशी मागणी रिपाइंचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे यांनी निवेदद्वारे केले आहेत
यावेळी भाजपचे सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकोटचे लोकप्रिय आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी,रिपाइं अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे, रिपाइं तालुका सरचिटणीस राजू भगळे, युवक ता अध्यक्ष अप्पा भालेराव, अंबादास गायकवाड,शुभम मडीखांबे ,सुरेश सोनकांबळे,आकाश मडीखांबे ,सुदर्शन कांबळे,राजु वाघमारे आदी उपस्थित होते