15.8 C
New York
Monday, September 16, 2024

Buy now

spot_img

अक्कलकोट येथे बौद्धधर्मीय लोकावरील अन्याय विरोधात सोमवारी आक्रोश मोर्चा

 अक्कलकोट येथे बौद्धधर्मीय लोकावरील अन्याय विरोधात सोमवारी आक्रोश मोर्चा

आंबेडकरी समुदायानी ५ फेब्रुवारीला आक्रोश मोर्चात हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे

अक्कलकोट ( यश सिध्दी न्युज नेटवर्क )
गेल्या काही एक-दोन वर्षापासून अक्कलकोट तालुक्यात बौद्ध धर्मीय लोकावर काही समाजकंटकाकडून अन्याय अत्याचार केला जात आहे.त्यांच्या निषेधार्थ म्हणून ५ फेब्रुवारीला भव्य आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे.तरी तालुक्यातील आंबेडकरी समुदाय मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली ताकद दाखवावे असे आवाहन पत्रकार परिषदेत सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी केले आहे. या वेळी माजी नगरसेवक उत्तम गायकवाड, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुकाध्यक्ष अविनाश मडिखांबे, वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे, छात्र भारती प्रदेश संघटक सचिन बनसोडे, युवक आघाडी अध्यक्ष शीलामणी बनसोडे, शिव बसव आंबेडकर संस्थेचे अध्यक्ष संदीप मडिखांबे,प्रहार संघटना तालुकाध्यक्ष अमर शिरसाट,पीपल्स रिपब्लिकन पार्टी रोजगार आघाडी प्रदेश अध्यक्ष विकी बाबा चौधरी, शहर अध्यक्ष अजय मुकणार , सम्यक विद्यार्थी तालुकाध्यक्ष रवी पोटे, बी एस पी तालुकाध्यक्ष विठल आरेनवरु, पी आर पी तालुकाध्यक्ष बाळासाहेब खैराटकर उपस्थित होते
विविध मागण्यांसाठी ५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता अक्कलकोट भिमनगर ते राजे फत्तेसिंह चौक, तूप चौक मेन रोड बस स्टॉप ए-वन चौक या प्रमुख मार्गावरून भव्य आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असुन ए-वन चौक येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे हा मोर्चा शांततेत होणार असल्याचे सांगितले

सदर मोर्चा कुठल्या जाती धर्मा विरोधात किंवा कुठल्या पक्षाविरोधात नसून आंबेडकवादी समाजावर अन्याय करणाऱ्या नीच प्रवृत्ती विरोधात मोर्चा आहे
यावेळी बोलताना चंद्रशेखर मडीखांबे म्हणाले की, अक्कलकोट शहर व ग्रामीण भागातील बौद्ध बांधवांवर मोठ्या प्रमाणात होत असलेला अन्याय अत्याचार,जातीयवाद आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची गुलबर्गा येथे विटंबना करण्यात आला आहे.घोळसगांव येथे एका व्यक्तीने मकर संक्रांतीच्या दिवशी त्याच्या धार्मिक विधीमध्ये आपल्या जातीवरून कन्नड मध्ये एकदम तुच्छ व खालच्या पातळीवर जाऊन शिरवाळ भाषा, व बणजगोळ येथील जिल्हा परिषद शाळेत लहान मुलांना निळ्या रंगाचा गणवेश घालण्यास बंदी घाला म्हणणाऱ्या जातीवादी उपसरपंच यांच्यावर कार्यवाही करण्याबाबत,
हालहळळी येथे गावच्या यात्रेत महार जातीचे लोकांनी यायचे नाही,म्हणून समाजातील माजी सरपंचाच्या भावाला बेदम मारहाण करून त्याच्यावरच महिलेना छेडछाड केल्याची खोटी केसेस केले आहेत व हंजगी येथील जातीयवादी माजी सरपंच यांना केवळ मागासवर्गीय व दिव्यांग सदस्य निवडून आल्यानंतर एका उच्च जातीच्या महिलेने आरती का केली म्हणून त्या महिलेला व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांना त्रास दिला जात आहे. याबाबत आक्रोश मोर्चा निघत असल्याचे सांगितले
तालुक्यातील बौद्ध धर्मीय लोकांवर मोठया प्रमाणात अन्याय वाढला आहे.या सर्व होत असलेल्या अत्याचारा विरुद्ध व अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.हा अन्याय आज त्यांच्यावर तर उद्या आपल्यावर हि वेळ येऊ शकते.यासाठी समाजातील सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची आवाहन केले आहे तरी सर्वांनी आपापसातील व्यक्तीक व राजकीय मतभेद विसरून सर्वांनी एकत्र येऊन परिवारासह ह्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होऊन जातीयवादी लोकांना आपली ताकद दाखवून द्यावे असे आवाहन पत्रकार परिषदमध्ये आयोजक समितीने केले आहे

चौकट
गेल्या अनेक वर्षापासून बेडर गल्ली येथे पाण्याचे वॉल काही समाजकंटक तोडत असून या बाबत वेळोवेळी नगर परिषद मुख्याधिकारी यांना सांगत आले आहे यावर त्वरित कार्यवाही करण्यात यावे व भीमनगर येथील पाणीपुरवठा टाकी काम त्वरित पूर्णकरून सर्वांना घरोघरी नळ कनेक्शन दिल्यास पाणी समस्या मिटणार असल्याचे माहिती अविनाश मडिखांबे यांनी केले व संदीप मडिखांबे यांनी स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ जवळील चौकात सी सी टिव्ही कॅमेरे बसविण्यात यावे व आमच्या युवकाचे रिक्षा व्यवसाय करून घर चालवत असतात त्या ठिकाणी गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी दादागिरी करून त्रास देण्याचे काम चालू असून तेथील पोलीस चौकी चोवीस तास चालू ठेवण्यात यावे याची मागणी ही मोर्चात करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी बोलताना सचिन बनसोडे म्हणाले की आंबेडकरवादी समाजावर होणाऱ्या अत्याचार विरोधात तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने मोर्चासाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे आज आपल्या बांधवांवर अन्याय झालंय उद्या हे प्रसंग आपल्या येऊ शकतो यासाठी आपण जागृत होऊन आंबेडकरवादी समाजाने मोठ्या संख्येने सहभाग होऊन शांतता व संयम मार्गाने मोर्चात आपले ताकद दाखवणे गरजेचे आहे भविष्यात अशा प्रकारे घटना घडणार नाही यासाठी आपली एकीची ताकद तालुक्याला दाखवण्यासाठी मोर्चात हजारोच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले

- Advertisement -spot_img

Related Articles

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img