16.3 C
New York
Wednesday, April 10, 2024

Buy now

ऐतिहासिक विहिर व स्मारक सुशोभीकरणास निधी कमी पडू देणार नाही :- आ.सचिन कल्याणशेट्टी

वळसंग येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर ऐतिहासिक विहिर व स्मारक सुशोभीकरणास निधी कमी पडू देणार नाही :- आ.सचिन कल्याणशेट्टी

 

वळसंग ( प्रतिनीधी ) :- ज्या भूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर येऊन गेले त्यांनी स्वतःच्या हाताने ज्या विहिरीचे पाणी चांदीच्या ग्लासा मधून रेशमी दोरीच्या सहाय्याने शेंदून उदघाटन केले त्या ऐतिहासिक विहिरीस निधी मंजूर करण्याचं भाग्य मला मिळालं हे माझं सौभाग्य समजतो. आणि या कामास निधी कदापी कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन अक्कलकोट विधानसभा मतदारसंघांचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले.

वळसंग ता. दक्षिण सोलापूर येथील आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी मंजूर केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऐतिहासिक विहिरीवर स्तूप व स्मारक सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
माजी पालकमंत्री आ.दत्तात्रय भरणे हे होते.यावेळी मंचावर सोलापूर महानगरपालिका माजी गट नेते संयोजक आनंद चंदनशिवे, GM ग्रुप संस्थापक बाळासाहेब वाघमारे, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष संतोष पवार, जुबेर बागवान माजी नगरसेवक गणेश पुजारी,जिल्हापरिषद कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, द. सोलापूर उपाभियंता उषा बिडला,शाखा अभियंता राजेश जगताप,कनिस्ट अभियंता सज्जन भडकवाड,सरपंच जगदीश अंटद, उपसरपंच कुरेशी, रवीबॉस कोळेकर,गौतम चंदनशिवे श्रीमंत जाधव चंद्रकांत सोनवणे सह संयोजक अनु जाती जिल्हा सरचिटणीस बलवान गोतसुर्वे आदी उपस्थित होते.
अध्यक्षस्थानावरून बोलताना सोलापूरचे माजी पालकमंत्री आ.दत्तात्रय भरणे यांनी अक्कलकोट मार्गे गाणगापूर गुलबर्गा या ठिकाणी दर्शनासाठी जाणारा व्यक्ती हा वळसंगच्या ऐतिहासिक डॉ.आंबेडकर स्मारकास भेट देऊन जाईल अशा पद्धतीचे काम आमदार कल्याणशेट्टी करतील याची मला खात्री असल्याचे सांगितले. आपल्या प्रास्ताविकात संयोजक तथा सोलापूर महानगरपालिका माजी गटनेते आनंद चंदनशिवे यांनी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी या ऐतिहासिक स्थळास विना विलंब निधी दिल्याबद्दल त्यांचे तमाम भिमअनुयायी यांच्या वतीने आभार मानले आणि या भागातील सर्व भीम सैनिक आपल्या पाठीशी खंबीर उभे राहतील याची ग्वाही दिली.
यावेळी उपसरपंच कमलाकर सोनकांबळे राहुल रुही, सिद्धाराम हेले, सुनील कळके, भाजपा अनु जमाती अक्कलकोट तालुकाध्यक्ष निजप्पा गायकवाड, आचेगाव सरपंच विश्रांती पाटील, गौतम बाळशंकर, रमेश क्षिरसागर कार्यक्रमाचे सहसंयोजक सिद्धाराम वाघमारे, शांतकुमार गायकवाड ,अक्षय गायकवाड, कर्देहळळी सरपंच नागेश शिंदे, दुधनी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक इरणा दसाडे, अविनाश भडकुंबे, अशोक गायकवाड, संतोष गायकवाड, आकाश माने, अमोल पुटगे, धोडूराज बनसोडे, यांच्यासह वळसंग व परिसरातील, अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यातील आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य पदाधिकारी भीम अनुयायी मोठया संख्येने उपस्थित होते.
प्रस्ताविक व आभार संयोजक आनंद चंदनशिवे यांनी केले.

- Advertisement -spot_img

Related Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest Articles