23.3 C
New York
Wednesday, July 24, 2024

Buy now

spot_img

अभूतपूर्व जल्लोषात वागदरी येथे रयतेचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

अभूतपूर्व जल्लोषात वागदरी येथे रयतेचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

वागदरी ( महादेव सोनकवडे )
अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत,अठरा पगड जाती आणि बारा बलुतेदार यांना सोबत घेऊन महाराष्ट्राच्या मातीमध्ये अभेद्य असे रयतेचे राज्य निर्माण करणारे श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध सामाजिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात जयंती वागदरी येथे परमेश्वर देवस्थान समोर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

प्रारंभी १९ फेब्रुवारी या शिवाजी महाराज यांच्या जन्मदिनी महाराजांच्या मूर्तीची वाजत गाजत मिरवणूक काढून श्री.परमेश्वर मंदिरासमोर प्रतिष्ठापना करण्यात आले. आणि शिव बसव चौक एस. टी.स्टँड वागदरी परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या तैल चित्रांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.शिवजयंती निमित्त संपूर्ण बाजारपेठेमध्ये भगवे झेंडे लावण्यात आले होते व लाईटचे माळाने सजवण्यात आले होते.सायंकाळी ७.०० वाजता बाळ शिवरायांचा पाळणा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी वागदरी गावातील असंख्य महिला मंडळी बाल गोपाळ उपस्थित होते.पाच दिवस दररोज वागदरी व वागदरी पंचक्रोशीतील प्रमुख मान्यवरांच्या हस्ते महाराजांचे पूजन करण्यात आले.
दिनांक २२फेब्रुवारी गुरुवार या दिवशी रात्री ठीक आठ वाजता नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध लोकगीत गायिका सौ.चंद्रभागाताई मेटकर व त्यांचे सहकारी कलावंत मंडळी श्री.शिव पार्वती संगीत संच वारकवाडी यांचे गायनाचा कार्यक्रम पार पडला .या कार्यक्रमास आपल्या गावातील व वागदरी पंचक्रोशीतील नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला. शुक्रवारी सायंकाळी ठीक ६.०० वाजता श्री.छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळाचे कार्यकर्ते व गावकरी मंडळी यांच्या हस्ते महाराजांचे पूजन करण्यात आले व त्यानंतर महाराजांच्या भव्य अश्या मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आले.या मिरवणुकीतील महत्वाचे आकर्षण होते ते म्हणजे नुकतेच महाराष्ट्र शासनाने जो महाराष्ट्राचा मर्दानी खेळ म्हणून दर्जा दिलेला आहे असा दांडपट्टा.हा दांडपट्टा खेळ सादर करण्यासाठी सातारा जिल्ह्यातून खेळाडू आले होते.त्यांनी आपल्या उत्तम कौशल्यपूर्ण खेळातून आपल्या अख्या गावाला त्यांच्या भोवती खिळउन ठेवले. डीजे च्या तालावर नाचणारी तरुणाई हा जेव्हा खेळ सुरू झाला ,तेव्हा त्यांचे नाचणे आपोआप बंद झाले आणि ती संपूर्ण तरुणाई या शिवकालीन दांडपट्टा या मर्दानी खेळाभोवती शेवट पर्यंत खिळून राहिली.महाराजांची मिरवणूक जेव्हा चावडी या आपल्या गावातील मध्यवर्ती ठिकाणी गेली तेव्हा दांडपट्टा या मर्दानी खेळाने परमोच्च शिखर गाठला.या खेळाडूंनी आपल्या साहसी,धाडसी खेळाची अनेक प्रकारचे प्रात्यक्षिके करून दाखवले,शिवकाळातील मावळ्यांची लढाई आपण प्रत्यक्षात पाहतोय हा भास निर्माण झाला.अंगावर शहारे आणणारे अनेक रोमांचकारी शिवकालीन लढाईची प्रात्यक्षिके त्यांनी करून दाखवले.हा खेळ पाहण्यासाठी चावडी मध्ये आपल्या पर्व प्रमाणे गर्दी झाली होती.अबाल वृद्ध,महिला भगिनी ,तरुण मंडळींनी या खेळाचा आस्वाद घेतला. मिरवणुकी वेळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.आपल्या श्री.परमेश्वर मंदिरासमोर रात्री ठीक दहा वाजता महाराजांची पूजा करून मिरवणुकीची सांगता करण्यात आली.यावेळी फटाक्यांची प्रचंड आतषबाजी करण्यात आली.
शिवजन्मोत्सव सोहळा व्यवस्थित पार पडण्यासाठी श्री.शिवाजी महाराज जन्मोत्सव कार्यकारिणी २०२४ अध्यक्ष सुनील सावंत, शाम बाबर उपाध्यक्ष, यासह शिवाजी सावंत, सुधाकर फुटाणे, बाबू मोरे, प्रभू फुटाणे ,सुनील शिंदे ,तानाजी हेबळे ,एकनाथ माने, सुभाष शिंदे ,अंकुश सावंत, प्रदीप पाटील, बसवराज शेळके, नागनाथ अवताडे, नितीन घुले ,दिगंबर कणसे,गोपी सावंत,मारुती शिंदे नानाजी शिंदे, गणेश शिंदे, शिवाजी सावंत, बंडू मोरे, अक्षय सावंत, सुरेश सावंत, पिंटू हेवळे ,दत्ता हेबळे,सुनील सावंत, महादेव सोनकडे, राजकुमार यादव, परमेश्वर सावंत, राज शिंदे, संभाजी सावंत, आप्पाराव फुटाणे, संतोष पोमाजी, शिवराज पोमाजी, प्रकाश पोमाजी, मुर्गेंद्र मुंदिनकेरी, आकाश कणसे यांच्यासह असंख्य समाज बांधव,गावातील युवा बांधव,छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ चे कार्यकर्ते यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले

- Advertisement -spot_img

Related Articles

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img