-0.2 C
New York
Sunday, February 25, 2024

Buy now

केवळ एक SMS करेल मोठं काम! असं जोडा आधारसोबत पॅन

ही आहे शेवटची मुदत

यकर खात्याने (Income Tax) पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यासाठी आता 30 जून 2023 ही अंतिम तारीख केली आहे. त्यानंतर पॅनकार्ड बाद करण्यात येईल.

त्यामुळे तुम्हाला बँकेचा व्यवहार, इतर व्यवहार करता येणार नाही. कारण यासर्व व्यवहारासाठी पॅनकार्ड अनिवार्य असते. सध्या पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी 1,000 रुपये दंड द्यावा लागतो.

एक एसएमएस फायद्याचा

  1. पॅनकार्ड-आधार कार्ड लिंक करणे सहज सोपे
  2. मोबाईलवरुन एसएमएस पाठवून लिकिंग करता येईल
  3. तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाचा करावा लागेल वापर
  4. मोबाईलवरुन 567678 वा 56161 वर एसएमएस पाठवा
  5. UIDPAN<स्पेस><12 अंकी आधार कार्ड><स्पेस><10 digit PAN>
  6. असा एसएमएस 567678 वा 56161 क्रमांकावर पाठवा
  7. तुमचे नाव आणि जन्मतारीख आधार आणि पॅनकार्डवर एकच हवी

तर मोठा दंड
30 जूनपर्यंत दोन्ही कार्डची जोडणी न झाल्यास पॅन कार्ड निष्क्रिय होईल. त्यानंतर जोडणी केल्यास तुम्हाला 10,000 रुपये दंड बसू शकतो. आयकर अधिनियमाच्या कलम 272बी अंतर्गत 10,000 रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे आता एक हजार रुपयांचा दंड भरुन ही प्रक्रिया पूर्ण करता येईल. त्यामुळे ज्यांना हे दोन्ही कार्ड जोडायचे आहे, त्यांना सध्याची रक्कम भरुन ही प्रक्रिया पूर्ण करता येईल.

नियम काय सांगतो
आयकर अधिनियमचे कलम 139 एए नुसार, प्रत्येक वापरकर्त्याला, ज्याने 1 जुलै, 2017 रोजी पर्यंत पॅनकार्ड जारी करण्यात आले आहे आणि त्यांच्याकडे आधार कार्ड आहे. त्यांनी आधार कार्ड-पॅन कार्ड लिकिंग करणे आवश्यक आहे. या नियमातून आसाम, जम्मू आणि काश्मीर, मेघालय या राज्यातील रहिवाशांना ही प्रक्रिया पूर्ण करण्याची गरज नाही. तसेच जे नागरीक 80 वर्षे अथवा त्यापेक्षा अधिक आहे. त्यांनाही या प्रक्रियेतून सूट देण्यात आली आहे. तसेच जे भारतीय नागरीक नाहीत, त्यांना ही हे दोन्ही कार्ड लिंक करण्याची गरज नाही.

तर होईल नुकसान
डेडलाईनपर्यंत आधार-पॅनकार्ड लिकिंग नाही केले तर तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. पॅनकार्ड निष्क्रिय झाले तर त्या नागरिकाला, करदात्याला आयकर रिटर्न फाईल करताना अडचणींचा सामना करावा लागेल. तर त्याचा टॅक्स रिफंडही अडकून पडेल. तर त्याच्या दुसऱ्या आर्थिक व्यवहारांवर पण परिणाम होईल. पॅन कार्ड निष्क्रिय झाल्यानंतर बँक खाते उघडण्यास अडचण होईल. तर म्युच्युअल फंड आणि स्टॉकमधील गुंतवणूक करणे अडचणीचे ठरेल

- Advertisement -spot_img

Related Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest Articles