-0.3 C
New York
Friday, December 6, 2024

Buy now

spot_img

वागदरी बस स्थानक येथे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रम साजरा

वागदरी बस स्थानक येथे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रम साजरा

अक्कलकोट ( महादेव सोनकवडे ) एस टी महामंडळ ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वागदरी बसस्थानक येथे वागदरीचे सरपंच श्रीकांत भैरामडगी, यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती माजी सरपंच रविकिरण वरनाळे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अक्कलकोट तालुकाध्यक्ष तथा उपसरपंच कमलाकर सोनकांबळे,
सुधीर सोनकवडे, ग्रा. प सदस्य शिवा घोळसगाव शरण मठ अध्यक्ष माणिक नीलगार, वाहतूक नियंत्रक काशिनाथ पोमाजी, यांच्या उपस्थितीत घेण्यात आले यावेळी जेष्ठ प्रवाशी नागरिक, बस चालक वाहक, आणि सेवा निवृत्त बस कर्मचारी यांचे विशेष सत्कार करण्यात आले यावेळी बोलताना कमलाकर सोनकांबळे म्हणाले की, एस टी महामंडळ स्थापना होऊन पच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यामुळे अमृत महोत्सवी साजरा करण्यात येत आहे, महामंडळाचे आज पर्यंतचे प्रवास संघर्षाचा आहे अनेक चढ उतार झाले आहे परंतु जनतेचे सेवा मात्र प्रामाणिक चालू आहे, महामंडळाने अनेक योजना प्रवाशाच्यासाठी राबवित असून एस टी महामंडळ प्रवास सुखकारक व सुरक्षित आहे अखंड महाराष्ट्राचे जीवनवाहिनी सर्वसामन्याच्या हक्काचे एस टी लालपरी व तिचे सेवेकरी एस टी प्रेमी प्रवाशासाठी आजचा अभिमानाचा तसेच प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे, सगळीकडे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे
शिवाजी सावंत,
निंगाप्पा दुधगी, नागनाथ अवताडे, मानू शिरगण, रेऊरे, कोठे, परमेश्वर फुलमाली, राम सगट, यासह अनेक मान्यवर उपस्थिती होते कार्यक्रम सूत्रसंचालन व आभार महादेव सोनकवडे यांनी केले

- Advertisement -spot_img

Related Articles

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img