दर्गनहळीसह परिसरातील गावाना वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास रास्ता रोको करणार : महेश बिराजदार
सोलापूर ( प्रतिनीधी ) दर्गनहळी संगदरी व धोत्रीसह अन्य गावात सुरळीत वीजपुरवठा होत नसल्याने शेतकऱ्याने ग्रामस्थ हैराण झाले असून महावितरण कडून सुरळीत वीजपुरवठा न झाल्यास सामाजिक कार्यकर्ते महेश बिराजदार यांनी आंदोलन करण्याचे इशारा दिले आहे
संगदरी व धोत्री गावात महावितरणाच्या तांदुळवाडी येथील उपकेंद्रातून वीजपुरवठा केला जातो थ्री फेज व गावातील सिंगल फेज देखील विद्युत पुरवठा व्यवस्थित होत नसल्याने शेतकरी व ग्रामस्थांना विद्युत पुरवठाचे होत असलेल्या गैरसोयीमुळे वैतागले आहेत शेती मध्ये सुरळीत वीज पुरवठा नसल्याने शेतामधील पीक नुकसान होण्याच्या मार्गावर आहेत एकंदरीत पाऊस देखील गेल्या दोन महिन्यापासून नाही व शेती वीज पुरवठा सुरळीत नसल्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी गैरसोय होत असल्याने पीक जाळून जात आहेत याबाबत विद्युत वितरण कंपनी लवकरात लवकर सुरळीत वीज पुरवठा करण्यात यावे अन्यथा या भागातील शेतकरी व ग्रामस्थ यांच्या वतीने आंदोलन छेडण्यात येणार आहे
रस्ता रोको करणार
दर्गनहळी संगदरी व धोत्रीसह विविध गावातील महावितरण प्रशासनाकडून वीज पुरवठ्यात दुजाभाव करत असल्याने ग्रामीण भागातील महिला व वृद्धांना त्रास होत आहे व विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मोठी कसरत करावी लागत आहे त्यामुळे शैक्षणिक नुकसान होण्याचे संभव आहे तरी विद्युत पुरवठा सुरळीत न केल्यास रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल
महेश बिराजदार
सामाजिक कार्यकर्ते, दर्गनहळी