22.6 C
New York
Friday, September 20, 2024

Buy now

spot_img

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यावर केल्या जाणाऱ्या अपराधांसाठी शिक्षा , जाणून घ्या कायदा

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यावर केल्या जाणाऱ्या अपराधांसाठी शिक्षा , जाणून घ्या कायदा

 

३(१)(a) अनुसूचित जातीची किंवा अनुसूचित जमातीच्या व्यक्तीच्या तोंडामध्ये कोणताही खाण्यायोग्य नसलेला किंवा केळस्वारा पदार्थ घालेल किंवा खाणे योग्य नसलेला किंवा केळस्वारा पदार्थ पिण्याची किंवा खाण्याची जबरदस्ती करेल.

३(१)(b) राहण्याच्या जागेमध्ये किंवा त्याच्या प्रवेशद्वारा जवळ विस्टा मैल जनावरांचे मृत शरीर किंवा इतर कोणताही किळस उत्पन्न करणारा पदार्थ टाकेल.

३(१)(c) अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीच्या व्यक्तीला इजा पोहोचेल किंवा त्रास होईल या दृष्टीने त्याच्या शेजारी विस्था टाकाऊ कचरा जनावरांची मृत शरीरे किंवा इतर कोणताही केळस उत्पन्न करणारा पदार्थ टाकेल.

३(१)(d) चपलांचा हार घालणे किंवा नग्न किंवा अर्धनग्न मिरवणूक काढणे.

३(१) (e) अंगावरील कपडे जबरदस्तीने काढेल डोक्याची हजामत करेल मिशा काढेल चेहऱ्याला किंवा शरीराला रंग असेल किंवा त्या प्रकारचे कृत्य करेल जे मानवी प्रतिष्ठेचा अवमान करणारे असेल.

३(१) (f) गैरमार्गाने अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जमातीच्या व्यक्तीची कोणतीही जमीन ताब्यात घेईल किंवा त्यावर पीक घेईल किंवा कोणत्याही सक्षम अधिकाऱ्यांनी वाटून दिलेली किंवा अनुसूचित केलेली अशी कोणतीही जमीन हस्तांतरित करेल.

३(१) (g) घर मार्गाने अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जमातीच्या व्यक्तीला तिच्या जमिनीमधून हाकलून लावेल किंवा जागेमधून काढेल किंवा त्याच्या अधिकारांमध्ये ढवळाढवळ करेल त्याच्या जमिनीमध्ये जागेमध्ये किंवा पाणी किंवा कालव्यामधून केलेला पाणीपुरवठा किंवा पिकाची नस दुध करणे किंवा पिकवलेले धान्य काढून घेणे.

३(१) (h) अनुसूचित जातीचे किंवा अनुसूचित जमातीच्या व्यक्तीला भिक मागण्यास किंवा शासनाने सार्वजनिक प्रयोजनासाठी सक्तीची केली असेल अशा कोणतेही सेवेत त्याच प्रकारची इतर जुलून जबरदस्तीची व वेठबिगारीची कामे करण्यास भाग पाडणे.

३(१) (I) मानवी मृत शरीर किंवा मृत जनावराची शरीर वाहून नेण्यासाठी भाग पाडणे किंवा थडगे खोदण्यास भाग पाडणे.

३ (१) (j) हाताने मैला साफ करावयास लावणे किंवा कामावर ठेवणे किंवा अशा कामासाठी नोकरीवर ठेवण्यास परवानगी देणे.

३(१) (k) स्त्रीला देवतेपुढे पुतळ्यासमोर ज्याची पूजा केली जाते अशा वस्तू समोर देऊळ किंवा इतर धार्मिक स्थळांसमोर देवदासी म्हणून खेळ करावयास भाग पाडणे किंवा इतर कोणतीही त्यासारखी परंपरा करण्यास परवानगी देणे.

३(१) (l) अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जमातीच्या व्यक्तीला धाकदपटशा, भाग पाडणे किंवा अडथळा करणे.
(a) विशिष्ट उमेदवाराला मत न देण्यासाठी किंवा कायद्याने तरतूद केलेली असेल त्याखेरीज इतर प्रकारे मतदान करण्यासाठी भाग पाडणे.
(b) उमेदवार म्हणून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास प्रतिबंध करणे किंवा असे नामनिर्देशन पत्र परत घेणे.
(c) कोणत्याही निवडणुकीत उमेदवार म्हणून नामनिर्देशन पत्राला अनुमोदन किंवा सुचवणे यात प्रतिबंध करणे.

३(१) (m) संविधानाच्या भाग नऊ अन्वये असलेल्या पंचायतीचा किंवा संविधानाच्या भाग नऊ अ अन्वये म्यूनसापॅलिटीचा अध्यक्ष किंवा इतर कोणत्याही कार्यालयीन कारभार बघणारा असेल त्याला जबरदस्ती किंवा धाकदपटशा किंवा प्रतिबंध करून त्याचे सामान्य कर्तव्य आणि कार्य करण्यास अडथळा उत्पन्न करणे.

३(१) ( n) मतदान संपल्यानंतर जखमी होण्यास कारण होणे किंवा गंभीररत्या जखमी करणे किंवा हल्ला करणे किंवा सामाजिक किंवा आर्थिक बहिष्कार किंवा त्याचा हक्क असलेल्या सार्वजनिक फायदा घेण्यास प्रतिबंध करणे.

३(१) (o) अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जमातीच्या व्यक्तीविरुद्ध या अधिनियमात नमूद केलेला कोणताही अपराध विशिष्ट उमेदवाराला मत देण्यास किंवा न देण्यास किंवा अधिनियमात कायद्याने तरतूद केलेली असेल असा केला असल्यास.

३(१) (p) खोटा दुरुस्त किंवा तापदायक दावा दाखल करणे अथवा फौजदारी किंवा कायद्याची इतर कार्यवाही सुरू करणे.

३(१) (q) कोणतेही लोकसेवकास खोटी किंवा खोडसाळ माहिती पुरवणे व त्यायोगे अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जमातीच्या व्यक्तीस इजा किंवा त्रास होईल अशा प्रकारे आपल्या कायदेशीर अधिकाराचा वापर करण्यास त्या लोकसेवकास उद्युक्त करणे.

३ (१) (r) पान उतारा करण्याच्या उद्देशाने सर्व लोकांना दिसेल अशा प्रकारे कोणतेही ठिकाणी तिचा हेतू परस्पर अपमान करणे किंवा तिला दाखल पक्षात दाखविणे.

३(१) (s) तिच्या जातीच्या नावाने सर्व लोकांसमोर अपशब्द बोलणे, जातीवाचक शिवीगाळ करणे.

३ (१) (t) अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जमातीच्या व्यक्तींना पवित्र असणाऱ्या वस्तू नष्ट करणे नसत करणे किंवा बरखास्त करणे. या कलमात वस्तू या व्याख्येचा अर्थ मध्ये पुतळा तसबीर आणि प्रतिमा यांचा समावेश होतो.

३(१) (u) लेखी किंवा मोठी किंवा खुणांनी किंवा प्रत्यक्ष प्रतिनिधीद्वारे किंवा इतर प्रकारे शत्रुत्वाची भावना द्वेष किंवा वाईट इच्छा या व्यक्त करणे.

३ (१) (v) ज्यांच्या विषयी नितांत आदर आहे अशा मृत व्यक्तीचा अनादर लेखी किंवा तोंडी करणे.

३ (१) (w) (१) अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जमातीच्या स्त्रीला ती अनुसूचित जातीची किंवा आमचे जमातीची आहे याची माहिती असताना तिला जाणून-बुजून तिची संमती नसताना स्पर्श करणे.

(२) अनुसूचित जातीचे किंवा अनुसूचित जमातीच्या स्त्रीला लैंगिक पद्धतीचे हावभाव करणे शब्द वापरणे कृती करणे या गोष्टी ती स्त्री अनुसूचित जातीची किंवा अनुसूचित जमातीची आहे याची कल्पना असताना करणे.
स्पष्टीकरण : उप – खंड (एक) मधील समंती या वयाख्येचा अर्थ संशयास्पद आपखुशिने तयार असणारी. जेव्हा व्यक्ती हावभावाने किंवा इतर कोणत्याही शाब्दिक संभाशनाव्यातिरिक्त विशिष्ट कृती करण्यासाठी संमतीसाठी निरोप देणे असा होतो :
परंतु असे की, अनुसूचित जातीची किंवा अनुसूचित जमातीची स्त्री कोणत्याही लैंगिकृत्याला प्रतिकार करीत नाही याचा अर्थ असा होत नाही की, तिची लैंगिकृत्याला संमती आहे :
परंतु आणखी असे की स्त्रीचा लैंगिक इतिहास यामध्ये अत्याचारी तिची संमती आहे असे लागू शकत नाही किंवा त्यामुळे अपराधाचा गंभीरपणा कमी होतो असे नाही.

३ (१) (x) सर्वसामान्यपणे ज्या कोणत्याही झऱ्याचे जलाशयाचे किंवा कोणत्याही इतर स्त्रोतापासून मिळणारे पाणी वापरत असतील त्या पाण्यात सर्वसाधारणपणे ज्या प्रयोजनासाठी त्याचा वापर होत असेल त्यासाठी ते कमी योग्य व्हावे अशाप्रकारे ते पाणी दूषित किंवा घाण करणे.

३ (१) (y ) सार्वजनिक रस्त्याच्या ठिकाणी जाण्या येण्याचा कोणताही रूढी प्राप्त अधिकार नाकारणे किंवा अन्य जनतेला अथवा त्या जनतेच्या कोणत्याही भागाला ज्याचा वापर करण्याचा किंवा तेथे जाण्याचा हक्क असेल अशा सार्वजनिक रस्त्याच्या ठिकाणाचा वापर करण्यास किंवा तिथे जाण्यास अशा व्यक्तीला प्रतिबंध करण्यासाठी अडथळा आणणे.

३ (१) (z) घर गाव किंवा अन्य निवासस्थान सोडण्यास भाग पाडणे किंवा तसे करण्यास कारणीभूत होणे.

३ ( १ ) ( za) अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जमातीच्या व्यक्तीला कोणतेही प्रकारे प्रतिबंध किंवा अडथळा उत्पन्न करणे.

(A) सार्वजनिक मालमत्तेमधील साधने किंवा पुरण्याची जागा किंवा इतरांबरोबर वापरले जाणारे स्मशान किंवा कोणतीही नदी झरे ओहोळ विहीर तलाव पाण्याची टाकी नळाचे पाणी किंवा इतर पाण्याची स्त्रोत किंवा कोणतेही अंघोळीचे घाट कोणतेही सार्वजनिक वाहने कोणताही रस्ता किंवा मार्ग.
(B) सायकलवर बसणे किंवा चालविणे किंवा मोटरसायकल किंवा पादत्राणे वापरणे किंवा सार्वजनिक ठिकाणी नवीन कपडे घालणे किंवा लग्नाची मिरवणूक काढणे किंवा घोड्यावर बसणे किंवा लग्नाच्या मिरवणुकीमध्ये कोणतेही वाहनांमध्ये बसणे.

(C) सार्वजनिक जनतेला खुले असणाऱ्या कोणत्याही पवित्र स्थानांमध्ये प्रवेश करणे किंवा इतर व्यक्तीप्रमाणे धर्माचे पालन करणे किंवा कोणतीही धार्मिक सांस्कृतिक किंवा समाजातील मिरवणुकीमध्ये भाग घेणे किंवा काढणे यामध्ये जत्रेचा सुद्धा समावेश होतो.

(D) कोणतेही शैक्षणिक संस्थांमध्ये हॉस्पिटल दवाखाना प्राथमिक आरोग्य केंद्र दुकान किंवा सार्वजनिक कर्मणुकीचे ठिकाण किंवा इतर कोणतेही सार्वजनिक ठिकाण किंवा सार्वजनिक उपयोगी असलेली कोणतीही भांडी जी सर्वांसाठी उपयोगी आहेत अशी किंवा
(E) कोणताही व्यवसाय करणे किंवा धंदा चालू करणे व्यापार किंवा उद्योग किंवा कोणतेही ठिकाणी जी इतर सार्वजनिक लोकांसाठी असते अशी नोकरी किंवा त्यांच्यासाठीच्या संधीचा हक्क

३ (१) (zb) अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जमातीच्या व्यक्तीला ती व्यक्ती ज्या तुटना करते किंवा मांत्रिक आहे या कारणासाठी शारीरिक दुखापत किंवा मानसिक यातना देणे किंवा

३ (१) (zc) अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जमातीच्या कोणतेही व्यक्तीला किंवा कुटुंबाला सामाजिक किंवा आर्थिक बहिष्कार टाकण्याची धमकी देणे किंवा टाकणे,[ सहा महिन्यापेक्षा कमी नाही अशी कारावासाची शिक्षा परंतु ती पाच वर्षापर्यंत वाढवता येईल आणि द्रव्य दंडासह दिली जाईल. ]

३ (२) अनुसूचित जातीची किंवा अनुसूचित जमातीची नसेल अशा कोणत्याही व्यक्तीने :-
(i) अनुसूचित जातीची किंवा अनुसूचित जमातीची कोणतीही व्यक्ती त्या त्यावेळी अमलात असलेल्या कोणत्याही कायद्याने देह दंडास योग्य अशा प्रदासाठी सिद्धा प्राधिक ठरवली जावी या उद्देशाने किंवा खोटा साक्षी पुरावा दिला अथवा तयार केला असता तो तिला सिद्धा प्राप्ती ठरवण्यास कारणीभूत होण्याची शक्यता असल्याचे माहित असताना खोटा साक्षी पुरावा दिल्यास किंवा तयार केल्यास तिला जन्मठेपेची व द्रव्य दंडाची अशा दोन्ही शिक्षा देण्यात येतील आणि अशा खोट्या किंवा तयार केलेल्या खोट्या साक्षी पुराव्यामुळे अनुसूचित जातीची किंवा अनुसूचित जमातीची निरपरात व्यक्ती सिद्धप्राधी ठरली आणि तिला फाशी देण्यात आली तर असा खोटा साक्षी पुरावा देणाऱ्या किंवा तयार करणाऱ्या व्यक्तीला मृत्युदंड देण्यात येईल.

३(२)(ii) अनुसूचित जातीची किंवा अनुसूचित जमातीची कोणतीही व्यक्ती देह दंडास योग्य नसणाऱ्या परंतु सात वर्षाच्या किंवा त्याहून अधिक मुदतीच्या तुरुंगवासाची शिक्षा होणाऱ्या अपराधासाठी सिद्धापराधी ठरवली जावी या उद्देशाने किंवा खोटा साक्षी पुरावा दिला अथवा तयार केला असता तो तिला सिद्धपराध ठरविण्यास कारणीभूत होण्याची शक्यता असल्याची माहित असताना खोटा साक्षी पुरावा दिल्यास किंवा तयार केल्यास ती सहा महिन्यांपेक्षा कमी नाही परंतु सात वर्षांपर्यंत किंवा त्यापेक्षाही जास्त असू शकेल इतकी कारावासाची शिक्षा व द्रव्य दंडाची शिक्षा होण्यास पात्र ठरेल.
३(२)(iii) अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जमातीच्या व्यक्तीच्या मालकीच्या कोणत्याही मालमत्तेस नुकसान पोहोचवण्याच्या उद्देशाने किंवा आग किंवा कोणताही फोटो पदार्थ यांच्या मदतीने खोडसाळपणा केला असता अशा प्रकारे नुकसान पोहोचवण्याची शक्यता आहे हे माहीत असताना आग किंवा स्फोटक पदार्थ याच्या साह्याने कोरसाळपणा केल्यास ती सहा महिन्यांपेक्षा कमी नाही परंतु सात वर्षांपर्यंत असू शकतील इतक्या मुदतीच्या कारावासाची व द्रव्य दंडाची शिक्षा होण्यास पात्र ठरेल.

३(२)(iv) अनुसूचित जातीतील किंवा अनुसूचित जमातीतील व्यक्ती सर्वसाधारणपणे प्रार्थना स्थळ म्हणून किंवा मानवी निवासाची जागा म्हणून किंवा मालमत्तेच्या सुरक्षित संरक्षणाची जागा म्हणून वापरित असेल अशा कोणत्याही इमारतीला नुकसान पोहोचवण्याच्या उद्देशाने आग लावून किंवा स्फोटक पदार्थाचा वापर करून खोडसाळपणा केल्यास किंवा अशा आग लावण्याने किंवा स्फोटक पदार्थाच्या वापराने त्या इमारतीला नुकसान पोहोचण्याची शक्यता आहे हे माहीत असताना तसे करण्याचा खोडसाळपणा केल्यास ती जन्मठेपेची आणि द्रव्य दंडाची शिक्षा होण्यास पात्र ठरेल.
३(२)(v) अशी व्यक्ती अनुसूचित जातीची किंवा अनुसूचित जमातीची आहे किंवा अशी मालमत्ता अशा व्यक्तीची आहे हे माहीत असून याच केवळ कारणासाठी त्या व्यक्तीविरुद्ध किंवा त्या मालमत्तेविरुद्ध भारतीय दंड संहिते अन्वये (1860 चा 45) दहा वर्षापर्यंतच्या किंवा अधिक कालावधीच्या कारावासास पात्र असेल असा अपराध केल्यास ती जन्मठेपेची व द्रव्य दंडाची शिक्षा होण्यास पात्र ठरेल

- Advertisement -spot_img

Related Articles

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img